Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 2765

आरोग्यासाठी अमृत अंकुरित लसूण

$
0
0

पुणे टाइम्स टीम

लसणाचे फायदे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहेत; पण अंकुरित लसणाला बेकार समजून आपण अनेकदा फेकून देतो. मात्र, अंकुरित लसूण सर्वसामान्य लसणापेक्षाही जास्त लाभदायक असतो. लसणाचे नियमित सेवन केल्यामुळे कोलेस्ट्रॉल, रक्तदाब आणि हृदयरोगासारख्या आजारांमध्ये लाभ होतो; पण जर्नल ऑफ अॅग्रिकल्चर अँड फूड केमिस्ट्रीत प्रकाशित एका शोध प्रबंधानुसार अंकुरित लसणाचं सेवन केल्यामुळे या आजारांपासून लवकर बरं होण्यासाठी मदत मिळते.

सुरकुत्यांपासून बचाव

लसणातील अँटिऑक्स‌िडंट्स शरीरातील फ्री रॅडिकल्स संपवण्यासाठी लाभदायक ठरतात. त्यामुळे अकाली वृद्धत्व रोखलं जातं. अंकुरित लसणात उपलब्ध असलेले अँटिऑक्सिडंट्स तुम्हाला अकाली वृद्धत्वापासून रोखतात. जर्नलमध्ये प्रकाशित लेखानुसार, हा लसूण सुरकुत्यांपासूनदेखील तुमचा बचाव करतो.

हृदयासाठी वरदान

अंकुरित लसूण फाइटोकेमिकल कार्सिनोजन क्रियेला लगाम लावतात. याउलट एन्झाइमच्या गतीला वाढ देतात. ब्लॉक होणं हे हृदयाच्या दृष्टीने अत्यंत हानीकारक आहे. एका शोधानुसार, अंकुरित लसणात ताज्या लसणाच्या तुलनेत अँटिऑक्स‌िडंटचं प्रमाण जास्त आहे. जे हृदयासाठी अत्यंत लाभदायक आहे.

जास्त अँटिऑक्स‌िडंट

सर्दी, खोकल्यापासून तुम्ही त्रस्त असाल, तर अंकुरित लसणाचं सेवन केलं पाहिजे. एका अध्ययनानुसार पाच दिवसात अंकुरित झालेल्या लसणाचं सेवन केल्यामुळे अँटिऑक्सिडंटची मात्रा मोठ्या प्रमाणावर मिळते. हे अँटिऑक्स‌िडंट विविध प्रकारच्या संक्रमणापासून वाचवतं.

स्ट्रोकपासून बचाव

लसणात नायट्राइटचं प्रमाणदेखील अधिक असतं. त्यामुळे रक्ताभिसरण करणाऱ्या वाहिन्यांना रूंद करण्याचं काम ते करतात. स्ट्रोकच्या विरुद्ध एक उत्तम उपाय म्हणूनही ते काम करतं.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 2765

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>