Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 2765

कौन्सिलिंगची गरज आहे?

$
0
0

डॉ. सागर मुंदडा, एमबीबीएस, एमडी, मनोचिकित्सक

'लहानपण देगा देवा', असं आपण नेहमीच आनंदाने बोलतो. पण सध्याच्या स्पर्धात्मक जगात लहानग्यांनाही अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं. त्या समस्या नेमक्या कोणत्या आणि अशा मुलांचं कौन्सिलिंग करणं किती फायदेशीर असतं याविषयी...

अभ्यास करताना किंवा इतर दैंनदिन कामं करणं लहानग्याला अवघड जातं, असं बऱ्याच पालकांची तक्रार असते. तसंच आमचा पाल्य गेल्या काही दिवसापासून शाळेत जायला घाबरतो किंवा शाळेतून आल्यावर हिरमुसलेला असतो असंही बऱ्याच पालकांच्या निदर्शनास येतं. या सगळ्यासाठी कौन्सिलिंग करणं अत्यंत गरजेचं आहे. लहानग्यांना काय-काय समस्या भेडसावतात याची माहिती आपण मागील भागात घेतली. तसंच या भागात लहान मुलांना आणखीन कोणत्या समस्यांना सामोरं जावं लागतं याची माहिती घेऊयात.

Peer Pressure- ‘आपले सगळे मित्र एखादी गोष्ट करतात. त्यामुळे आपणसुद्धा ती गोष्ट केली पाहिजे. नाही तर आपल्याला ग्रुपमध्ये घेणार नाहीत’, अशा दबावाखाली बरीचशी शाळकरी मुलं असतात. याच दबावामुळे बहुतांश मुलं दारू पिणं, धुम्रपान करणं किंवा इतर चुकीच्या सवयींच्या आहारी जातात. अशावेळी इतर मुलांच्या दबावाला बळी न पडता स्वतःचा आत्मविश्वास टिकवणं हे त्या मुलांसमोर आव्हान असतं. दबावाला बळी पडलेल्या आणि त्यामुळे चुकीच्या मार्गावर गेलेल्या मुलांना कौन्सिलिंगची गरज असते.

व्यसन- शाळकरी मुलांमध्ये व्यसन करण्याचं प्रमाण वाढलंय. अगदी कोवळ्या वयात अशा चुकीच्या सवयींचे शारीरिक आणि मानसिक परिणामही गंभीर असतात. आपला पाल्य अशा चुकीच्या सवयींच्या आहारी गेला आहे, हे कळताच अनेक पालक टोकाची भूमिका घेतात. असं न करता पालकांनी आपल्या पाल्याचं तज्ज्ञांच्या मदतीने कौन्सिलिंग करावं.

लैंगिकता- कोवळ्या वयात लैंगिकता यासारख्या विषयाची माहिती जाणून घेण्याची खूप उत्सुकता असते. बहुतांश मुलं लैंगिकतेबद्दल इंटरनेट किंवा मित्रांकडून जाणून घेतात. लहान वयात मुलं चुकीच्या गोष्टींकडे आकर्षित होतात. अशावेळी त्या मुलांना लैंगिक शिक्षण देणं गरजेचं असतं. यामुळे त्यांच्या मनातील गैरसमजूती तर दूर होतातच शिवाय त्यांच्यासोबत काही चुकीचं होत नाही ना याबाबतही ते सर्तक होतात.

तणाव- सध्याच्या स्पर्धात्मक जगात लहानग्यांना अगदी पहिल्या इयत्तेपासून जीवघेण्या स्पर्धेला सामोरं जावं लागतं. तसंच अपेक्षांचं ओझंही पालकांवर लादलं जातं. कौन्सिलिंगद्वारे त्यांच्या मनातील भावनांना वाट मोकळी करुन दिली जाते.

अप्टीट्युड आणि आवड- बऱ्याचदा पालक आपल्या अपेक्षांचं ओझ पाल्यांवर टाकतात. त्यापेक्षा आपल्या पाल्याला कशात रुची आहे, कशाची आवड आहे हे पालकांनी ओळखलं पाहिजे. तज्ज्ञांच्या मदतीने पालकांनी पाल्याचं कौन्सिलिंग करावं. जेणेकरुन पाल्याची आवड ओळखता येईल.

कौन्सिलिंगचे फायदे अनेक असल्याने पालक आणि शिक्षकांनी याचं मनापासून स्वागत केलं पाहिजे.

संकलन-शब्दुली कुलकर्णी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 2765

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>