Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 2765

हेडफोन्सची अदलाबदल करताय? सावधान!

$
0
0

पुणे टाइम्स टीम

आपण अनेकांना एकमेकांचे हेडफोन्स लावून गाणी ऐकताना पाहिलं असेल. एकमेकांचे हेडफोन्स वापरून बोलताना पाहिलं असेल. ही हेडफोन्सची अदलाबदल मित्रमैत्रीण, नातेवाईकांमध्ये अगदी सर्रास होताना दिसते. तुम्हीही असं करत असाल, तर सावधान! ही सवय वेळीच बंद करा. आपले हेडफोन्स कुणासोबतही शेअर करू नका. यामुळे आरोग्यविषयक काही समस्यांना तोंड द्यावं लागू शकतं, असं एका संशोधनात समोर आलं आहे.

फंगल इन्फेक्शनचा धोका

कानाच्या दुखण्याशी संबंधित सात टक्के लोकांना हा फंगल इन्फेक्शनचा त्रास होतो. बारीक फोडांसारखी समस्यादेखील अनेकांना असते. तुम्ही एखाद्या इन्फेक्टेड व्यक्तीचे इअरफोन्स वापरले, तर त्याच्या माध्यमातून तुम्हालाही फंगल इन्फेक्शन होऊ शकतं. आणखी एका संशोधनानुसार, जास्त वेळेपर्यंत इअरफोन्स वापरल्याने कानांना नुकसानदेखील होऊ शकतं.

ताप आला असल्यास...

तुमच्या जवळपासच्या कुणालाही ताप आला असेल किंवा कानात एखादी जखम झाली असेल, तर त्याच्या कानात संक्रमण असण्याची पूर्णपणे शक्यता आहे. त्यामुळे जर ताप आलेल्या व्यक्तीचे इअरफोन्स वापरले, तर तुम्ह‌ालाही तापाशी संबंधित संक्रमण होऊ शकतं. त्यामुळे एकमेकांच्या अशा वस्तू, किमान आजारपणात तरी वापरण्यापासून स्वतःला आवर घालणं आवश्यक आहे.

किडीचा प्रादुर्भाव

आपले इअरफोन्स कुठेही सोडून देण्याची सवय आपल्याला असते. अशात काही कीटक आपली अंडी त्यात घालतात. इअरफोन्समध्ये आर्द्रता असल्याने त्यात अनेक कीटकांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. तसे इअरफोन्स वापरल्याने कानाला संक्रमण होऊ शकतं. त्यामुळे अनेक दिवसांपासून धूळ खात पडलेले इअरफोन्स केवळ एक फुंकर मारून वापरणं टाळावं. ते नीट स्वच्छ करण्याची काळजी घ्यावी.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 2765

Latest Images

Trending Articles

<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>