Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 2765

मोबाइलचा सायलेंट अटॅक

$
0
0

स्वप्निल घंगाळे

सतत 'कँडी क्रॅश' खेळल्याने अमेरिकेत एका तरुणाच्या अंगठ्याचं ऑपरेशन झाल्याची बातमी तुम्ही वाचली असेल. मोबाइलचा असा अतिवापर तुमच्याही अंगाशी येऊ शकतो. कसा ते आम्ही सांगतो...


'अरे, ती बातमी वाचली का कँडी क्रश खेळल्यानं अंगठ्याचं ऑपरेशन झाल्याची', 'हो रे, वेडा होता तो, एवढा वेळ काय खेळत होता?', अशी चर्चा सध्या व्हॉट्सअॅप कट्ट्यांवर रंगली आहे. मोबाइलच्या अतिवापराचं एक प्रकरण अमेरिकेमध्ये समोर आल्यानंतर यावर खूप बोललं जातंय. एखादं व्यसन असल्याप्रमाणे मोबाइलचा वापर केल्यानं काही ना काही व्याधी-विकार जडण्याचं प्रमाण आपल्याकडेही दिसून येऊ लागलं आहे.

स्मार्टफोन थम्ब
फेसबुक लाईक पासून ते मेसेज टाइप करणे, गेम्स खेळणे, फोटो पाहणे यासारख्या सर्वच गोष्टींसाठी अंगठ्याचा सर्वाधिक वापर होतो. त्यामुळे दिवसभर सरासर फिरणा-या अंगठ्याच्या हाडाला कायमची इजा होणे, अंगठाच्या टोकावरील संवेदना नष्ट होण्यासारखे आजार मोबाईलच्या वापरामुळे होतात.
लक्षणे - अंगठ्याला कसलाच भास न होणे, अंगठ्याच्या बुडाशी (जिथे तो तळहाताला जोडला जातो) हाड दुखणे, अंगठा वाकवताना त्रास होणे, अंगठ्याची पेरे दुखणे
सतर्कता - कमीत कमी चॅटिंग करा, जास्त बोलायचे असल्यास थेट फोन करा, सतत एकाच हाताने टायपिंग करणं टाळा

सेल फोन एल्बो
या आजारामध्ये फोनवर बोलताना किंवा चालताना चॅटिंग करताना ब-याच वेळ हात एकाच स्थितीत ठेवल्याने हातामधील स्थायूंच्या संवेदना क्षीण होतात. या आजाराच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत असून यात तरूणांची संख्या मोठी आहे.
लक्षणे - कोपर दुखणे, फोन वापरताना हाताला मुंग्या येणे, सतत क्रॅम्प येणे
सतर्कता - जास्त वेळ फोनवर बोलताना कॉड्स वापरा, तासंतास चॅटिंग टाळा

टेक्स क्लॉ
फोनच्या वजनामुळे किंवा सतत फोन तळहातावर ठेवल्याने मनगट तसेच तळहात दुखावला जातो. वेळीच लक्ष न दिल्यास हा आजार तळहाताला कायमचा निकामी बनवू शकतो
लक्षणे - मनगट जड वाटणे, बोटांना अचानक मुंग्या येणे, तळहात जड वाटणे तसेच तळहात हलवताना त्रास होणे
सतर्कता - सतत फोन वापरू नका, दोन्ही हातांनी फोन वापरा

टेक्स्ट नेक
सतत काय मोबाईलमध्ये डोकावत असतो, या प्रश्नाला ठोस उत्तर नाहीये. मात्र सतत मोबाईलमध्ये डोकं घालून बसल्याने मान तसेच मणक्याला कायमची इजा होऊ शकते.
लक्षणे - मान दुखणे, पाठीला त्रास होणे
सतर्कता - कान आणि खांद्याच्यामध्ये फोन पकडून बोलणे टाळा, आडवे पडून मेसेज करणे टाळा, चालताना चॅटिंग करू नका.

या आजारांशिवाय सारखं फोनची स्क्रीन पाहिल्याने डोळ्यांमधील ओलावा कमी होणे, सतत गाणी ऐकल्याने कानांवर परिणाम होणे, डोके दुखणे यासारखे आजारही फोनच्या अती वापरामुळेच होतात. फोनमुळे अनेकांच्या रिलेशनशिपमध्ये अडचणी येतात तसेच फोनशी संबंधीत मानसिक आजारही काळजीचाच विषय आङे. त्यामुळे फोन वापरताना मर्यादा निश्चीत करणे गरजेचे आहे.

व्यसनासारखा वापर नको
स्मार्टफोनमुळे हाडांच्या संदर्भातले आजार होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे. हे आजार मोबाइल वापराच्या विशिष्ट सवयींमुळे जडतात. मोबाइल आजची गरज आहे. पण ते व्यसन असल्याप्रमाणे त्याचा वापर वाढला आहे. आणि व्यसनाचे दुष्परिणाम होतातच. म्हणून स्मार्टफोनच्या आहारी न जाता, स्मार्टपणे तो वापरणं हा सर्वात उत्तम उपाय आहे.
- डॉ. सुधीर कुळकर्णी, ऑर्थोपेडीक सर्जन



मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 2765

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>