Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 2765

धसका

$
0
0

मुंबई टाइम्स टीम

सोनमला स्वाइन फ्लू झाल्याचं स्पष्ट झाल्यानंतर मनोरंजनसृष्टीही या आजारामुळे धास्तावली आहे. सिनेमा, मालिकांच्या सेटवर सगळीकडेच त्यासाठी झाडून विशेष काळजी घेतली जातेय.

स्वाइन फ्लूच्या भीतीने सध्या सगळेच धास्तावले आहेत. 'प्रेम रतन धन पायो'च्या चित्रीकरणादरम्यान सोनमला आलेला ताप हा स्वाइन फ्लूचा असल्याचं समजल्याने कलाकार मंडळींनी या आजाराचा धसका घेतला आहे. टीव्ही मालिका, सिनेमांच्या सेटवर सध्या दिग्दर्शकापासून ते स्पॉटबॉयपर्यंत सगळ्यांचीच काळजी घेतली जातेय. प्रोडक्शन हाऊस यासंदर्भात अधिक जागरुक झालेली दिसून येतायत.

मालिकांच्या सेटवरील माहिती घेतली असता या आजारासाठी विशेष काळजी घेतली जात असल्याचं समजतं. कलाकार, तंत्रज्ञांना या आजाराची लागण होऊ नये यासाठी प्रोडक्शन हाऊसनी खास सूचना दिल्या आहेत. मालिकांच्या सेटवर स्वच्छतेकडे विशेष लक्ष दिलं जातंय. 'असावा सुंदर स्वप्नांचा बंगला', 'का रे दुरावा', 'रुंजी', 'देवयानी' या मालिकांच्या सेटवर स्वच्छतेच्या बाबतीत विशेष काळजी घेतली जातेय. प्रत्येक सेटवर दिवसातून किमान तीन ते चारवेळा साफसफाई केली जाते. स्पॉटबॉयपासून कलाकारांपर्यंत सगळ्यांनाच पिण्यासाठी बाटलीबंद पाणी दिलं जातंय. 'कमला', 'दुर्वा', 'माझे मन तुझे झाले' या मालिकांच्या सेटवर टीममधल्या कुणालाही सर्दी झाली असेल, तापाची लक्षणं जाणवली तर तात्काळ स्वाइन फ्लूची तपासणी करून घेण्याचा सल्ला दिला जातोय. कलाकारसुद्धा आपापल्या पद्धतीने स्वतःची काळजी घेताना दिसून येतायत.

सिनेमाच्या बहुतांश सेट्सवर स्वछतेची विशेष काळजी घेतली जातेय. 'कुणाला सर्दी-खोकला-ताप असल्यास त्यांना सरळ एक-दोन दिवसांची सुट्टी दिली जाते. कलाकार तर हँड सॅनिटायझर्सचा आवर्जून वापर करताना दिसत आहेत', असं प्रोडक्शन युनिटमधल्या एकानं सांगितलं. सोनमच्या घटनेनंतर 'प्रेम रतन धन पायो'च्या सेटवर मात्र या सुरक्षा मास्क्सचा वापर सुरू झाला आहे. गुजरातमधल्या राजकोट जवळच्या गोंडल गावात या सिनेमाचं शूटिंग अजूनही सुरू आहे. आता तिथं या आजाराबाबत विशेष काळजी घेतली जातेय. सगळं प्रोडक्शन युनिट मास्क घालून फिरत आहे.

'प्रेम रतन धन पायो'च्या सेटवर सोनमला स्वाइन फ्लू झाल्याचं कळल्याने आम्हाला धक्काच बसला. दिग्दर्शक सूरज बडजात्या यांच्यासह आमची सगळी टीम सध्या यामुळे विशेष काळजी घेत आहोत. शूटिंग थांबवता येणं शक्य नाही. पण सगळी काळजी घेऊन काम मात्र सुरू आहे. कारण अखेर शो मस्ट गो ऑन!

- स्वरा भास्कर, अभिनेत्री

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 2765

Latest Images

Trending Articles

<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>