Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 2765

सतर्क रहा स्वाइन फ्लू टाळा

$
0
0

शब्दांकन - संपदा जोशी, कॉलेज क्लब रिपोर्टर

रंगपंचमी तोंडावर आलीय. पण स्वाइन फ्लूचं सावटही आहेच. त्यामुळे यंदा रंग खेळताना नेमकी काय काळजी घ्यावी याबद्दल सांगताहेत, डॉ. प्रदीप आवटे.

होळी आणि रंगपंचमी आता अगदी तोंडावर आली आहे. यादिवशी मित्र-मैत्रिणींच्या घरी जाऊन एकमेकांना रंगवण्याची मजा निराळीच. आजकाल तर सार्वत्रिक होळीसुद्धा अनेक ठिकाणी साजरी केली जाते. पण त्याचवेळी राज्यावर स्वाइन फ्लूसारख्या रोगाचं सावटही आहेच. त्यात अवकाळी पावसामुळे वातावरणही बिघडलंय. मग यंदाची होळी कशी साजरी करायची, हे मोठ्ठं टेन्शनचं आहे.

यंदा होळी खेळताना धम्माल करण्यासोबतच काळजी घेणंही गरजेचं आहे. अवेळी पडणारा पाऊस, थंडी अशा सगळ्याच ऋतुंचं जणू एक‌ विचित्र मिश्रणच झालं आहे. हे वातावरण स्वाइन फ्लूूला पोषक आहे. थंड वातावरणात वा-याचा वेग कमी होतो आणि स्वाइन फ्लू हा संसर्गजन्य असल्याने त्याचे विषारी किटाणू गार हवेत तरंगून पसरण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे रोगाची लक्षणं आढळल्यास दुर्लक्ष करू नका. थोडीशी काळजी घेतली तरी आपली होळी आनंदात साजरी होईलच. शिवाय स्वाइन फ्लूपासून बचावही होईल. गरज आहे, ती आपण थोडं सतर्क राहण्याची.

हे करा

सर्दी, ताप, खोकला, घशात खवखव जाणवणं, अंगदुखी, जुलाब, उलट्या इत्यादी लक्षणं आढळल्यास त्वरित डॉक्टरांकडे जा.

आजारी पडला असाल तर नियमित गोळ्या-औषधं घ्या. डॉक्टरांच्या सल्ल्यांचं नियमित पालन करा.

रंगपंचमी खेळायला जाताना हातरुमाल जवळ ठेवा.

खोकताना, शिंकताना नाका-तोंडावर रुमाल धरा.

वारंवार स्वच्छ पाण्याने हात धुवा.

पाणी उकळून प्या.

हे करू नका

स्वाईन फ्लूची लक्षणं दिसत असली तर सार्वजनिक ठिकाणी होळी खेळायला जाणं टाळा.

वातावरण फारसं चांगलं नसल्याने बाहेरचं खाणं टाळाच.

एकमेकांना हाताने रंग लावू नका. त्याऐवजी पिचकारीने रंग उडवा. जेणेकरून दूषित जंतूंचा संसर्ग पसरणार नाही.

होळीच्या दिवशी मद्यपान करु नका. नशा करू नका.

स्वाइन फ्लूसंदर्भात अधिक माहिती खालील वेबसाइटवर मिळू शकेल. www.mohfw.nic.in www.who.int

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 2765

Latest Images

Trending Articles

<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>