Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 2765

मनगटदुखीच्या समस्येचा सामना करत आहात? खबरदारीचे ४ उपाय

$
0
0

मुंबई टाइम्स टीम
दीर्घकाळ चालणाऱ्या वर्क फ्रॉम होममुळे अनेक जण पाठ आणि कंबरदुखीनं त्रस्त आहेत. त्यात बराच वेळ लॅपटॉप किंवा मोबाइलवर काम करावं लागत असल्यामुळे मनगटदुखीची तक्रार करणाऱ्यांचं प्रमाण वाढलं आहे. याकडे वेळची लक्ष दिलं नाही तर गंभीर परिणामांना सामोरं जावं लागू शकतं. यासाठी काय खबरदारी घेणं, हे आजच्या लेखातून जाणून घेऊ या.

० बराच काळ लॅपटॉपवर काम केल्यानं अंगठ्यात आणि मनगटात वेदना होऊ लागतात. विश्रांती न घेता सतत काम केल्यानं मनगटावर ताण येतो. परिणामी, मनगटातील ऊतींवर ताण येऊन वेदना होतात.

(Naukasana नौकासनाचा नियमित सराव केल्यास पोटावरील चरबी होईल कमी)


उपाय काय?
दीर्घकाळ की-बोर्डवर काम करताना मध्ये-मध्ये ब्रेक घ्या. टाइप करताना मनगटाची स्थिती व्यवस्थित असू द्या. लॅपटॉपवर काम करताना मनगटाला आधार मिळेल, याची काळजी घ्या. मनगटावरील ताण कमी करण्यासाठी इर्गोनोमिक कीबोर्ड आणि फोम किंवा जेल व्रिस्ट रेस्ट वापरुन पाहा. वेगळा कीबोर्ड आणि माऊस वापरा.

(Exercise At home पाठदुखी दूर करण्यासाठी घरातच करा सोपे व्यायाम)

० दोन बोटांच्या मध्यभागात वेदना होणं किंवा त्या भागात सूज येणं आणि बोटाच्या आकारात बदल दिसून येणं, ही संधिवाताची लक्षणं असू शकतात. यामुळे मनगटाचे स्नायूही दुखू लागतात.
(कंबरपट्ट्याची गरज कधीच भासू नये, यासाठी करा हे सोपे व्यायाम प्रकार)

उपाय काय?

अशी लक्षणं दिसल्यास त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्या. आवश्यक त्या चाचण्या करून घ्या. यावर उपचार करण्यासाठी विशिष्ट औषधोपचार आहेत.

(कित्येक तास एकाच जागी बसून काम करताय? तुमच्या आरोग्यावर होताहेत दुष्परिणाम)


० मनगट दुखणं, अधूनमधून बोटांना मुंग्या येणं (विशेषतः रात्री) ही स्नायूंसंबंधित त्रासाची लक्षणं असतात. मनगटात एक मीडियन नस असते. त्यावर दाब आल्यानं तीव्र स्वरुपाच्या वेदना होतात.

उपाय काय?
झोपताना हात उशीवर ठेवा. जर वेदना तीव्र स्वरुपाच्या असतील तर तातडीनं डॉक्टरांचा सल्ला घ्या.

(आठवड्यातून इतका वेळच व्यायाम करणं आरोग्यासाठी उत्तम, WHOची महत्त्वपूर्ण सूचना)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 2765

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>