Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 2765

उच्च रक्तदाबाचा धोका टाळायचाय? या ४ गोष्टींकडे चुकूनही करू नका दुर्लक्ष

$
0
0

मुंबई टाइम्स टीम
तणावग्रस्त जीवनशैलीचा आरोग्यावर परिणाम होत असतो. त्यापैकी एक म्हणजे उच्च रक्तदाबाचा त्रास होय. उच्चरक्तदाबाच्या समस्येकडे वेळीच लक्ष न दिल्यास त्याचे आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेषत: हृदयावर गंभीर परिणाम होतात. म्हणून वेळीच लक्ष देणं गरजेचं आहे.

उच्च रक्तदाब म्हणजे काय?

उच्च रक्तदाबाचा संबंध थेट हृदयाशी असतो. शरीरातील सर्व अवयवांना शुद्ध रक्त पुरवणं आणि अशुद्ध रक्त पुन्हा मूत्रपिंडाकडे आणि फुफ्फुसांकडे नेण्याचं काम हृदय करतं. पण, अनेक कारणामुळे रक्ताभिसरण प्रक्रियेत अडथळे निर्माण होतात. त्यामुळे रक्तवाहिन्यांववर दाब येतो आणि उच्च रक्तदाबाचा त्रास होतो.&

जीवनशैलीत बदल आवश्यक
उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासठी जीवनशैलीत योग्य बदल करणं गरजेचं आहे. म्हणून सकाळी झोपेतून उठल्यानंतर ते अगदी रात्री झोपेपर्यंतच्या कामाचं नियोजन करणं आवश्यक आहे. तसंच संतुलित आहार घेण्यावर भर द्यायला हवा. विशेष म्हणजे स्वत:पासून ताणाला दूर ठेवायला हवं.
(करोनाला दूर ठेवायचंय? नाश्त्यामध्ये या पौष्टिक पदार्थांचं करा सेवन)
करा नियोजन
- साधारण सात ते आठ तास झोप घ्या. रात्री लवकर झोपून लवकर उठण्याचा प्रयत्न करा.
- लॉकडाउन असल्यानं घरातच ३० ते ४५ मिनिटं फेऱ्या मारा, व्यायाम करा. हे शक्य नसेल तर आवडीच्या गाण्यावर नाचा.
- शरीराची हालचाल होणं, हा त्यामागचा मुख्य उद्देश आहे. साधारण २० ते २५ मिनिटं योगासनं किंवा प्राणायाम करा. तुमच्या शारीरिक क्षमतेनुसार सूर्यनमस्कार घाला.
- कोवळ्या उन्हात बसा. त्यामुळे शरीराला मुबलक प्रमाणात ड जीवनसत्व मिळतं.
(कित्येक तास एकाच जागी बसून काम करताय? तुमच्या आरोग्यावर होताहेत दुष्परिणाम)
तणावाशी दोन हात

- ऑफिसमधील टेन्शन ऑफिसमधे सोडून या. सध्याच्या काळात वर्क फ्रॉम करताना देखील काळजी घेणं आवश्यक आहे.
- घडलेल्या चुका सुधारता येत नाहीत, पण त्यातून धडा घेत भविष्यातील चुका टाळता येऊ शकतात. अशानं मनावरील ताण हलका होऊन सकारात्मक ऊर्जा मिळते.
- सकाळी १०-१५ मिनिटं ध्यानधारणा करा.
(पावसाळ्यात खबरदारी न घेतल्यास या गंभीर श्वसन विकारांचा होऊ शकतो त्रास)
आहारावर लक्ष असू द्या
- मॅग्नेशियमचं प्रमाण जास्त असलेल्या भाज्या किंवा फळांचा आहारात समावेश करा. सर्व प्रकारच्या बिया, काजू आणि हिरव्या पालेभाज्या खा. दररोज एक चमचा दुधीच्या बिया किंवा दोन-तीन काजू खा. दररोज एक वाटी हिरवी भाजी खाल्ल्यानं शरीरातील मॅग्नेशियमचं प्रमाण संतुलित राहतं. यामुळे चांगली झोप लागण्यास मदत होते.
- स्निग्ध पदार्थांचं सेवन करणं टाळा. उच्च रक्तदाबाचा त्रास टाळायचा असेल तर चरबीचं प्रमाण जास्त असलेले (तूप,आणि तेलकट) आणि अधिक मसालेदार पदार्थ खाणं टाळा.
- आहारातील मीठाचं प्रमाण संतुलित असू द्या. वरुन जास्ती मीठ घेणं टाळा. ज्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे त्यांच्यासाठी हे आवश्यक आहे. दररोज तीन ते पाच ग्रॅम म्हणजेच एक टीस्पून मीठ पुरेसं आहे. अनेक जण वरून मीठ घेतात. ही सवय चुकीची असून आरोग्यासाठी घातक आहे. सैंधव मीठ वापरणं उपयुक्त ठरतं.
संकलन - लीना देशमुख, आरकेटी कॉलेज

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 2765

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>