Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 2765

‘चव’दार पाणी

$
0
0

उन्हाळ्यामध्ये हिटला बीट करण्यासाठी नुसतं पाणी पिण्यापेक्षा वेगवेगळ्या फ्लेव्हर्सचं पाणी प्यायला मिळालं तर? पाण्याला आंबा-तुळस, संत्र-काकडी, सफरचंद-दालचिनी अशा चवींचा ट्विस्ट आणणं शक्य आहे आणि त्यासाठीच मार्केटमध्ये आल्यात इन्फ्युजर बाटल्या... Mrinmayi.Natu@timesgroup.com उन्हाळ्यामध्ये घशाला कोरड पडली की कोल्डड्रिंक्स, एनर्जी ड्रिंक्स घटाघटा प्यायली जातात. पण त्यामुळे शरीरात साखर आणि कॅफेनचं प्रमाण मात्र वाढतं. काहींनी मात्र हिटला बीट करण्यासाठी पर्याय शोधून काढलाय तो फ्लेव्हर्ड पाण्याचा. त्यासाठी खास इन्फ्युजर बाटल्या मार्केटमध्ये मिळतायत. मार्केटमध्ये मिळणाऱ्या रेडिमेड फ्लेव्हर्ड पाण्यामध्ये शरीरासाठी नुकसानकारक ठरतील अशा गोष्टीही असू शकतात. शरीरात कॅफेनचं प्रमाण वाढल्यास डिहायड्रेशनही होऊ शकतं. तसंच हे पाणी खिशाला परवडणारं नसतं. अशावेळी हल्ली फळांच्या फ्लेव्हरचं पाणी नैसर्गिक पेयाचा सर्वोत्तम पर्याय समजला जातोय. पाण्यात फळं, भाज्या, मसाले, फुलं इन्फ्युज करण्याचा नवीन ट्रेंड या उन्हाळ्यात प्रामुख्यानं दिसून येतोय. यात वाळा, पुदिना, तुळस, आंबा, पीच, बेरी यांचा समावेश आहे. घरातल्या घरात हे चवदार पाणी बनवणंही अगदी सोपं आहे. सध्या पाण्यात फळांचे तुकडे काही मिनिटं टाकल्यास त्याची चव पाण्याला येते. पण जर हे पाणी शाळा, कॉलेज, ऑफिसमध्ये न्यायचं असेल तर तशा प्रकारे पाणी इन्फ्युज करणाऱ्या खास बाटल्यांचाही पर्याय आहे. इतर फळांच्या तुलनेत लिंबू, संत्री यासारखी फळं चटकन इन्फ्युज होतात. विविध प्रकारच्या बेरीज पाण्यात इन्फ्युज व्हायला काही तास लागतात. त्यानंतर त्याचा पाण्याला हलका रंग येतो. या सगळ्यात औषधी वनस्पतींच्या पानांना पाण्यात इन्फ्युज होण्यासाठी तुलनेनं सर्वाधिक वेळ लागतो. फळांचे तुकडे जितके कमी-जास्त तितकी त्यांची चव बदलते. फ्लेव्हर इन्फ्युज केल्यानंतर जर फळं, भाज्या बाहेर काढल्या तर हे पाणी जास्त टिकण्याची शक्यता असते. खनिजं आणि जीवनसत्त्व असलेली ही चवदार पेयं तुम्हाला ताजंतवानं करण्यासाठी उपयुक्त ठरतील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 2765

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>