Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 2765

उन्हाळ्यात व्यायाम करताना...

$
0
0

उन्हाळ्यात अनेक जण व्यायाम करायला कंटाळा करतात. पण असा कंटाळा करून चालणार नाही. उलट उन्हाळ्यात योग्य आणि नियमित व्यायाम करायला हवा. योगा, सायकलिंग, चालणं तसंच पोहणं आदी सहज-सोप्पे व्यायाम करणं उन्हाळ्यात आवश्यक आहे. उन्हाळ्यात तुमच्या रोजच्या आहारामध्ये विविध फळं आणि फळांचे रस आदींच्या समावेश असणं आरोग्याला फायदेशीर ठरतं, याविषयी... उन्हाळ्यात योग्य फिटनेस राखण्यासाठी कोणतं ध्येय निश्चित करायला हवं? उन्हाळ्यात शरीराची अधिक हालचाल करायचा कंटाळा येतो. पण या काळात योग्य फिटनेस राखण्यासाठी कार्यक्षम राहाणं आवश्यक आहे. शरीराची भरपूर हालचाल करत राहा. नेहमी सकारात्मक आणि उत्साही ‌राहा. व्यायामाचा कंटाळा करू नका. इतर महिने जसा नियमित व्यायाम करता तसा पुढेही चालू ठेवा. पोहणं, नृत्य, किकबॉक्सिंग तसंच अॅरोबिक्स आदींचा व्यायामात समावेश करा. यामुळे तुम्हाला अधिक उत्साही राहाता येईल. उन्हाळ्यात व्यायाम करताना कोणती काळजी घ्यायला हवी ? उन्हाळ्यात व्यायाम करताना अधिक ताहान लागते. कारण यावेळी आपल्या शरीरातील पाणी घामाच्या रूपाने शरीराच्या बाहेर पडत असतं. म्हणूनच दररोज १० ते १२ ग्लास पाणी पिणं आवश्यक आहे. तुम्ही रोज व्यायाम करत असाल तर पाण्याचं प्रमाण योग्य असायलाच हवं. व्यायामाला सुरुवात करण्याच्या एक तास आधी एक ग्लास पाणी पिणं फायदेशीर ठरेल. तसंच व्यायामादरम्यान दर पंधरा मिनिटाला एक ग्लास तर व्यायाम संपल्यावर अर्ध्या तासाने दोन ग्लास पाणी पिण्याची सवय लावा. जेणेकरून व्यायाम करतान तुम्हाला अधिक थकवा येणार नाही. उन्हाळ्यात कोणते व्यायाम प्रकार करणं फायदेशीर ठरतं? योगासने, प्राणायाम, सायकलिंग, चालणं तसंच पोहणं आदी सहज-सोप्पे व्यायाम करणं उन्हाळ्यात फायदेशीर ठरतं. पोहणं - पोहणं हा उन्हाळ्यातला सर्वोत्तम व्यायाम आहे. कारण यात कोणत्याही प्रकारचं वजन उचलावं लागत नाही. शिवाय हाडांवर तसंच साध्यांवर कोणत्याही प्रकारचा ताण पडत नाही. पोहण्यामुळे शरीराला थंडावा मिळतो आणि योग्य प्रमाणात कॅलरी जाळण्याचं काम देखील होतं. सायकलिंग - सायकलिंगसुद्धा उन्हाळ्यात व्यायामासाठी चांगला पर्याय आहे. हाडांच्या आणि स्नायूंच्या बळकटीसाठी सायकल चालवणं फायदेशीर ठरतं. भर उन्हात सायकल न चालवता, संध्याकाळच्या वेळी सायकल चालवा. सायकलिंगमुळे संपूर्ण शरीर कार्यक्षम राहातं. चालणं - जर तुम्हाला घरच्या घरी चालायचं असेल तर ट्रेडमिलचा वापर करा. त्यामुळे घराच्या बाहेर न पडता चालण्याचा व्यायाम सहज होतो. जर तुम्हाला बाहेर जायला आवडत असेल, तर रस्त्यावर, बागेत किंवा समुद्रकिनारी कुठेही तुम्ही चालू शकता. वर सांगितल्याप्रमाणे भर उन्हात चालू नका. पहाटे किंवा संध्याकाळी चालायला बाहेर पडा. योगा आणि प्राणायाम - योगासनांमुळे शरीर आणि मनाला शांती मिळते. नियमित योगासनं करणं कधीही फायदेशीर ठरतं. उन्हाळ्यात कुठे व्यायाम करणं टाळायला हवं ? उन्हात व्यायाम केल्याने उष्माघाताचा धोका संभवतो. यामुळे शरीरातली ऊर्जा निघून जाते. लगेच थकवा येतो. दुपारच्या वेळी कडक उन्हात घराबाहेर व्यायाम करणं टाळा. घरा बाहेर व्यायाम करायचा असेल तर सकाळी लवकर किंवा संध्याकाळी सावलीत व्यायम करा. तसंच तुम्ही घरच्याघरी देखील व्यायाम करू शकता. त्याशिवाय जिमलाही तुम्ही जाऊ शकता. हे लक्षात ठेवा... उन्हाळ्यात घराबाहेर पडताना पाण्याची बाटली नेहमी जवळ ठेवा. जर तुम्ही जास्त व्यायाम करत असाल तर स्पोर्ट‍्स ड्रिंक घ्यायला हवेत. एक तासापेक्षा अधिक व्यायाम करत असाल तर इलेक्ट्रोलेट घ्यायला हरकत नाही. व्यायामा दरम्यान अधून-मधून थोडी विश्रांती घ्या. उन्हाळ्यात जास्त ताकदीचे व्यायाम करणं टाळा. तसंच खूप वेळ व्यायाम करू नका.

- नमिता जैन क्लिनिकल एक्सरसाइज, लाइफस्टाइल अॅण्ड वेट मॅनेजमेण्ट एक्सपर्ट शब्दांकन- कल्पेशराज कुबल, कॉलेज क्लब रिपोर्टर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 2765

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>