Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 2765

टेन्शन नको... बी हॅपी

$
0
0

कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यापासून ते अभ्यास आणि त्यानंतर करिअरचं टेन्शन तरुण मंडळींचा सतत पिच्छा पुरवत असतात . मग त्याचे आरोग्यावरही गंभीर परिणाम होतात. अशावेळी जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून कसं पाहावं, चांगले विचार कसे करावेत? याविषयी...

एखादी गोष्ट तुमच्या हाताबाहेर गेली आहे. म्हणून त्याच टेन्शन येणं साहजिकच आहे. पण कॉलेजमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये हे टेन्शन दिवसेंदिवस वाढू लागलं आहे. आयुष्यात घडणाऱ्या गोष्टींबद्दल सतत वाईट वाटत राहणं, काम पटपट करणं, पण त्यातील लहान-लहान गोष्टींनी कंटाळा येणं, इतरांकडे दुर्लक्ष करणं, एकाजागी शांत बसू न शकणं, एखादी गोष्ट हाताबाहेर गेली आहे असं सतत वाटत राहाणं यापैकी काही गोष्टी तुम्हाला तुमच्या आयुष्यात जाणवत असतील, तर तुमच्या डोक्यावरील ताण तणाव वाढत आहे, हे ध्यानात घ्यायला हवं. वेळीच मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घेत उपचार केल्यास हे टेन्शन दूर होऊ शकतं. तुमचं टेन्शन वाढतंय हे फक्त भावनिक लक्षणांच्या द्वारेच कळतं, असं नाही. अनेकदा या तणावाचे तुमच्या शरीरावरही परिणाम होतात. अंगात त्राण न राहाणे, डोकेदुखी, शारीरिक संबंधातून मन उडणं, हृदयाचे ठोके वाढणं, सतत अॅसिडीटी होणं, तोंड कोरडं पडणं, आदी लक्षणं तुम्हाला तणावाखील आहात हे दर्शवतात. काही गोष्टी तरुणाईने आपल्या दैनंदिन आयुष्यात केल्या तर हा तणाव दूर होऊ शकतो. प्रत्येक गोष्ट शाश्वत आहे. नकारात्मक परिस्थिती तुम्हाला नकारात्मक बनवत असते. त्यामुळे अडकून न राहता पुढे जा. सकारात्मक दृष्टिकोनातून जगाकडे बघायला सुरु करा. तुमच्या डोक्यावरील तणाव कमी होण्यास सुरुवात होईल. 'मी हे करू शकतो', 'या शाश्वत गोष्टी आहेत', 'कठीण काळ आता संपणारच आहे', असं स्वतःला सांगायला शिका. यातून तुम्ही अनेक समस्यांना तोंड देण्यास समर्थ होता. तणाव नेहमीच शरीरासाठी वाईट असतो हा समज चुकीचा आहे. अनेकदा आयुष्यात आपल्याला हव्या असलेल्या गोष्टी मिळवण्यासाठी हा तणावच तुमच्या कामी येतो. पण जेव्हा तो मर्यादेपलीकडे जातो, तेव्हा वेळीच उपचार करणं गरजेचं आहे. शिवाय प्रत्येकाला येणारा तणाव सारखाच नसतो. प्रत्येक जण एक गोष्ट आपापल्या पद्धतीनुसार करत असतो. त्यामुळे प्रत्येकाला येणारा तणाव हा सुद्धा वेगळा असतो. अनेकदा तुमचं वाढत जाणारं टेन्शन तुम्हाला कळतही नाही. कारण प्रत्येक वेळी तुम्हाला या तणावाची लक्षण दिसून येतीलच असं नाही. अनेकदा औषधांचा परिणाम म्हणून सुद्धा तुम्हाला तणाव जाणवू शकतो. रोजच्या जीवनातील बदल आणि वागण्यातील बदल तुम्हाला हा तणाव दाखवून देऊ शकेल. अशा वेळी त्यावर मात करण्यासाठी तरुणाईने सज्ज व्हायला हवं. तुम्हाला काही प्रश्न असल्यास sagargs2009@gmail.com यावर इ-मेल करा.
-डॉ. सागर मुंदडा मानसोपचारतज्ज्ञ जे. जे. हॉस्पिटल शब्दांकन : दीपेश वेदक, कॉलेज क्लब रिपोर्टर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 2765

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>