Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 2765

जंक फूडला आरोग्यदायी पर्याय

$
0
0

जंक फूड खाल्ल्यानं वजन वाढणं, रक्तातील कोलेस्टेरॉल वाढणं, स्थूलता येणं, आळस येणं आणि त्याच्याशी निगडित विकार सर्रास वाढायला लागले आहेत. सतत जंक फूड खाल्ल्यानं लहान मुलांमध्ये स्थूलता वाढायला लागली आहे. हे माहीत असूनही काहीजण केवळ सवय जडल्यामुळे जंक फूड आहारातून कमी करू शकत नाहीत; पण या टिप्सचा उपयोग केला, तर नक्कीच तुम्ही जंक फूड टाळू शकता.  कधीही घराबाहेर पडताना शक्यतो पोटभर खाऊनच बाहेर पडा, म्हणजे अचानक भूक लागल्यानं मैद्यापासून बनलेले, लगेच मिळणारे पदार्थ खायची गरज भासणार नाही. लहान मुलांसोबत बाहेर पडत असाल सोबत तर घरी असलेला कोरडा खाऊ ठेवा. सतत पिझ्झा, बर्गर, नूडल्स, मैद्याचे पदार्थ किंवा चीज, बटर, तेल, तुपानं माखलेले पदार्थ खाण्याऐवजी कमी कॅलरींचे पदार्थ जसे पोळी-भाजी, डोसा, उत्तपा, पराठा, थालीपीठ किंवा असे भारतीय पदार्थही बाहेर जाऊन आपण खाऊ शकतो. तहान लागली म्हणून कोला ड्रिंक किंवा कार्बोनेटेड पेय घेण्याऐवजी बाहेरच सहज मिळणारं नारळपाणी, ताक, लिंबूपाणी, नीरा, सरबत, लस्सी पिणं कधीही शरीरासाठी उत्तमच. सध्या उकाडा आहे म्हणून थंड आइस्क्रिम किंवा थंड मिठाई किंवा गोड थंड पेये याबाबतीत स्वतःवर नियंत्रण ठेवा. कारण उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर वजन अचानक वाढल्याची तक्रार करणारे लोक कमी नाहीत. वजन कमी करणं किंवा आहारातून जंक फूड कमी करणं हे सर्वस्वी तुमच्या स्वतःवर अवलंबून असतं. काय आणि किती खा, हे तुमचे आहारतज्ज्ञ वेळोवेळी तुम्हाला सांगतील. पण बाहेर गेल्यावर ते सगळं विसरून जाऊ नका. रोजची डाएट डायरी बनवा आणि खाल्लेल्या प्रत्येक पदार्थाची नोंद त्यात करा. म्हणजे तुम्ही काय-काय खाल्लं हे तुम्हाला लक्षात राहील.
निशिगंधा वझे-दिवेकर, आहारतज्ज्ञ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 2765

Trending Articles