Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 2765

सप्लिमेंट्स येतील अंगाशी

$
0
0

--कल्पेशराज कुबल, कॉलेज क्लब रिपोर्टर

झटपट तब्येत कमावण्यासाठी किंवा ती कमी करण्यासाठी तरुणाई सप्लिमेंट्सचा बिनधास्त वापर करतेय. पण हे अतिसेवन तंदुरुस्तीला घातक ठरणारं आहे. आजच्या 'न्यूट्रिशन डे'निमित्ताने नोंदवलेलं हे निरीक्षण..

हिरोंचे डोल्लेशोल्ले पाहून पिळदार शरीरयष्टी झटपट कमावण्यासाठी सप्लिमेंट्स घेणं, तसंच झिरो फिगर मेंटेन करण्यासाठी रोजच्या आहाराऐवजी न्युट्रिशन टॅब्लेट घेण्याकडे तरुणाईचा कल आहे. यामुळे आहारची पथ्यं पाळण्याची गरज नसते तसंच, जो काही निकाल हवाय तो लवकर मिळण्याची शक्यता जास्त असते. पण हा शॉर्टकट 'अंगाशी' येण्याची शक्यता जास्त असते. न्युट्रिशन टॅब्लेट खाण्याने आपण अनेक शारीरिक व्याधींना विनाकारण आमंत्रण देत असतो.

स्वतःला सुंदर, स्मार्ट प्रेझेंट करण्यासाठी आजची पिढी वजन कमी करतानाच डोल्लेशोल्ले कमावण्याकडे लक्ष देते. व्यायामासोबत बऱ्याचदा मसल्स वाढवणाऱ्या किंवा कमी करणाऱ्या पावडर्स, गोळ्या घेण्याकडे मुलामुलींचा कल असतो. खरंतर यासाठी योग्य प्रमाणात सकस आहार घेणं आवश्यक आहे. पण अलिकडे विविध जाहिरातींना भुलून न्युट्रिशन टॅब्लेट, सप्लिमेंट्स पावडर, डायट सप्लिमेंट्स आदींचं सेवन करण्याचं प्रमाण वाढलं आहे. परंतु, सकस आहाराची जागा कोणतेही न्युट्रिशन टॅबलेट घेऊ शकत नाही असं आहारतज्ज्ञांना वाटतं. टॅब्लेटऐवजी दूध, अंडी, तूप, पालेभाज्या, कडधान्यं, फळं, गूळ, शेंगदाणे या नैसर्गिक आहाराचं योग्य प्रमाणात सेवन होणं आवश्यक आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 2765

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>