Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 2765 articles
Browse latest View live

बापरे... डाएट मोडलं!

$
0
0

आदिती कडवेकर, आहारतज्ज्ञ

काल मित्राच्या लग्नात तीन गुलाबजाम खाल्ले. आता आज नाश्त्याला सुट्टी. परवा आठ दिवस माहेरी गेले होते. तिकडे गेल्यावर कसलं डाएट. आता मात्र फक्त सूप-सॅलड खायचं आणि जास्त व्यायाम करायचा म्हणजे झालं.

काहीतरी वेगळं खाल्ल्यावर असेच काहीसे विचार तुमच्याही मनात येतात का? हे विचार डाएटबद्दल जागरूक असलेल्या प्रत्येकाच्या मनात येत असले, तरी असं काहीतरी करून खरंच सर्व सुरळीत होतं का याचा विचार केला आहे का? त्याहीपेक्षा महत्त्वाचा प्रश्न उरतो, तो म्हणजे डाएट किंवा आहाराची पथ्यं पाळणं म्हणजे तुम्हाला शिक्षा आणि एक दिवस डाएट मोडलं, तर पाप वाटतं का? मला वाटतं, डाएट मोडण्याची स्वतःच्या शरीराला शिक्षा देणं किंवा ते मोडू नये म्हणून कार्यक्रमांना जाणं टाळणं या दोन्ही गोष्टी चुकीच्या आहेत. सण, समारंभ, पार्टी हे आपल्या सामाजिक जीवनाचा अविभाज्य भाग आहेत. अशा वेळेस घेतल्या जाणाऱ्या जड किंवा भरपूर कॅलरी असलेल्या पदार्थांमुळे नंतरचं जेवण टाळण्याची गरज नसते, तर उलट पुढचं जेवण जास्त घेतलेल्या कॅलरीचा समतोल साधणारं, योग्य प्रमाणात तरीही पोटभरीचं खाणं केव्हाही योग्य ठरतं.

आपल्या इतर दैनंदिन कामाइतकाच संतुलित आहार आणि व्यायाम रोज करणं महत्त्वाचं आहे. संतुलित आहार म्हणजे असं अन्न जे तुम्हाला दररोज आवश्यक उर्जा आणि पोषकतत्त्वं योग्य प्रमाणात देतं आणि ज्यामुळे तुमचं मानसिक आणि सामाजिक आरोग्य चांगलं राहातं. अर्थातच सध्याच्या जीवनशैलीत असं रोजच घडणं शक्य नाही. डाएट पाळता आलं नाही, तर काय करावं याच्यासाठी काही टिप्स.

प्रवासाला जाताना किंवा बराच वेळ घराबाहेर जायचं असल्यास जवळ जास्त वेळ टिकणारी फळं, सुकामेवा किंवा घरी बनवलेला चिवडा असे पदार्थ ठेवा. बाहेर खाण्याची वेळ आलीच, तर आरोग्यदायी पदार्थ निवडा. उदा. इडली/साधा डोसा किंवा फ्रुट प्लेट इ. समारंभ वा पार्टीच्या दिवशी किंवा नंतर उपाशी न रहाता नेहमीप्रमाणे समतोल आहार घ्या. नेहमीपेक्षा वेगळ्या जेवणानंतर संध्याकाळी किंवा दुसऱ्या दिवशी सरल कर्बोदकं ऐवजी जटिल कर्बोदकं असणारे पदार्थ खा. उदा. भाज्या घालून केलेले ओट्स किंवा दलिया उपमा. भरपूर भाज्या घालून केलेली मिश्र डाळीच्या पिठांची धिरडी किंवा भाज्या घातलेली ज्वारीची भाकरी.परगावी जात असाल, तर त्या ठिकाणी मिळणाऱ्या पदार्थांची माहिती करून घ्या. उदा. दिल्लीला लस्सीबरोबरच ताकही मिळतं. थोडक्यात सांगायचं, तर टाळणं किंवा न खाणं यापेक्षा योग्य प्रमाण, योग्य पर्याय आणि बाहेर खाण्याची वारंवारता याचा ताळमेळ राखा. दडपण न घेता खा आणि आरोग्य सांभाळा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शीतपेयांचे दाहक चटके

$
0
0

डॉ. अविनाश भोंडवे

उन्हाचा ताण हलका करण्यासाठी आपण पटकन एखादी शीतपेयाची बाटली काढून तोंडाला लावतो. कधीतरी हे करणे ठीक आहे; पण व्यसन लागल्याप्रमाणे रोजच त्याचं सेवन करणं म्हणजे आपणच आपल्या आरोग्याला धोका निर्माण करण्यासारखं आहे.

आजच्या फास्ट जीवनशैलीमध्ये शीतपेयं, कोला, सोडा आणि विविध प्रकारची सॉफ्टड्रिंक्स ही एक अविभाज्य अंग झालेली आहेत. मित्र भेटले, कुणाचं स्वागत करायचं असेल किंवा उन्हाळ्याच्या झळा थोड्या शीतल करायच्या असतील, तर असंख्य प्रकारची शीतपेयं हजर असतात. उच्चवर्गीय आणि मध्यमवर्गीय घरांमध्येसुद्धा पाहुणे आले तर असाव्या, म्हणून शीतपेयांच्या लिटर-दीड लिटरच्या बाटल्या ठेवण्याचा प्रघात सुरू झाला आहे. आंतरराष्ट्रीय साखळीद्वारे चालवल्या जाणाऱ्या अनेक फास्टफूड जॉइंटमध्ये तर खाण्याबरोबर पाण्याऐवजी शीतपेयच मिळतं. एका आकडेवारीनुसार भारतातले तरुण फळांच्या रसापेक्षा या फेसांचा रस अर्थात शीतपेयंच जास्त पितात. अगदी खेड्यापासून महानगरांपर्यंत सर्वच ठिकाणाची हीच परिस्थिती आहे.

भारतातल्या अग्रगण्य शीतपेयांच्या रासायनिक घटकांचा अभ्यास करणाऱ्या एका रसायनशास्त्राच्या अहवालानुसार या शीतपेयांमध्ये शरीरावर विपरीत परिणाम करणाऱ्या अनेक त्याज्य गोष्टी असतात.

आम्लं - सर्वच शीतपेयांमध्ये सायट्रिक आणि फॉस्फोरिक अॅसिड मोठ्या प्रमाणात असतात. त्यांच्या कमीअधिक प्रमाणामुळे ती आंबट लागतात. कुठल्याही रासायनिक पदार्थाची आम्लता ठरवणाऱ्या पी.एच. व्हॅल्यूचा विचार केला, तर या पेयांची आम्लता एक ते तीन एवढी जास्त प्रमाणात असते. आपल्या प्रसाधनगृहातील कमोडची स्वच्छता करणाऱ्या आम्लाएवढी ती तीव्र असते.

कार्बन-डाय-ऑक्साईड - या पेयांची जी 'टँगी टेस्ट' असते, ती त्यात विरघळेल्या कार्बन-डाय-ऑक्साईडवायूमुळेच.

शर्करा - ग्लुकोज, सुक्रोज आणि मक्यापासून बनलेले फ्रुक्टोज अशा अनेकविध रूपात या पेयांमध्ये साखरेची रेलचेल असते. ३०० मि.ली.च्या बाटलीमध्ये सुमारे ३५ ग्रॅम म्हणजे नऊ चमचे साखर असते. शीतपेयाची एक बाटली गट्टम केल्यावर १४० ते १५० एवढ्या कॅलरी पोटात जातात.

मद्यार्क - रासायनिक चाचणीत प्रत्येक शीतपेयाचे नमुने वेगवेगळ्या परीक्षानळीत घेऊन त्यात आयोडीन, पोटॅशियम आयोडाइड आणि सोडियम हायड्रोक्साइड क्रमानं मिसळून हे मिश्रण उकळत्या पाण्यात ३० मिनिटं तापवलं असता, परीक्षानळीत मद्यार्काचा अंश सिद्ध करणारा पिवळ्या रंगाचा साका दिसू लागतो. याचा अर्थ भारतात उपलब्ध असलेल्या सर्व शीतपेयांमध्ये मद्यार्काचा अंश असतो. हा निष्कर्ष खूपच धक्कादायक आणि मनाला सुन्न करणारा आहे. याशिवाय फॉस्फेट्ससारखी मूत्रपिंडाला धोकादायक रसायनं देखील शीतपेयात सापडतात.

दुष्परिणाम

स्थूलत्व - शीतपेयांमुळे अतिरिक्त १५० कॅलरीज तर मिळतातच; पण एवढ्याच कॅलरीज देणारे अन्नपदार्थ सेवन केल्यावर पोट भरल्याची जी भावना आपल्याला होते, ती या पेयांच्या सेवनानंतर होत नाही. त्यामुळे ती व्यक्ती पुन्हा पोटभर जेवण करतेच. साहजिकच अधिक कॅलरीज शरीरात जाऊन वजन वाढतं. जागतिक आरोग्य संघटनेच्या एका पत्रकानुसार शाळकरी आणि तरुण वयातील मुलामुलींच्या अतिरिक्त आणि बेसुमार वजनवाढीचं ही शीतपेयं हे प्रमुख कारण आहे. ज्याप्रमाणे शाळा-कॉलेजांच्या जवळ पान-तंबाखू विकणारी दुकानं नसावीत असा नियम आहे, तसा अशी शीतपेये विकणारी केंद्रंही नसावीत अशी व्यवस्था करावी असा त्या संघटनेचा सल्ला आहे.

मधुमेह व उच्च रक्तदाब - आज जगात विशेषतः भारतात मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचं प्रमाण खूप वाढत आहे. यातील तरुणवयातील रुग्णांचं प्रमाण लक्षणीय आहे.

हाडांवर परिणाम - शीतपेयातील आम्लांमुळे हाडं ठिसूळ बनत जातात. त्यामुळे कंबर, पाठ, हातपाय दुखणं असे त्रास कमी वयात होऊ शकतात. त्याशिवाय या आम्लांमुळे दातांवर परिणाम होऊन ते कमकुवत बनतात आणि लवकर निकामी होतात. एका तज्ज्ञाच्या मते शीतपेयाच्या प्रत्येक घोटानं दातांच्या आवरणाची किमान दोन टक्के झीज होऊ शकते. शीतपेयांच्या अतिसेवनामुळे अस्थमा, तरुण स्त्रियांमधील पी.सी.ओ.एस. हा विकार, वंध्यत्व, तसंच फॉस्फोरिक अॅसिडमुळे मूत्रपिंडांवर परिणाम होणं असे विकार उद्भवू शकतात.

शुद्ध ताजी फळं आणि त्यांचा आरोग्यदायी रस तसंच सरबत घरी नियमितपणे बनवणं आजच्या जीवनशैलीत कठीण झालंय. बाहेरसुद्धा ती संपूर्णपणे निर्जंतुक आणि भेसळीशिवाय मिळणं दुरापास्त होत चाललं आहे. पाश्चिमात्य जीवनशैली आदर्श मानणाऱ्या व्यक्तींच्या या शीतपेयांवर साहजिकच उड्या पडतात. कधीतरी हे करणं ठीक आहे; पण व्यसन लागल्याप्रमाणे त्याच्या आहारी जाणं हा या बदलत्या आरोग्यशैलीतला मोठा धोका आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आहार उन्हाळ्यातला

$
0
0

नमिता जैन

क्लिनिकल एक्सरसाइज,

लाइफस्टाइल अॅण्ड वेट मॅनेजमेण्ट एक्सपर्ट

उन्हाच्या झळा दिवसेंदिवस वाढतायत. त्यामुळे भरपूर तहानही लागते आणि आपण खूप पाणी पितो. ते शरीराला उत्तमच पण त्यामुळे काहीवेळा जेवणावर परिणाम होतो. त्यामुळे उन्हाळ्यातल्या आपल्या आहाराबद्दल गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.

कंटाळा आला म्हणून खाऊ नका किंवा खायचा कंटाळा करू नका. तुमच्या रोजच्या आहाराकडे बारकाईने लक्ष द्या. खाण्याच्या कोणत्या सवयी सोडायच्या आणि कशात सुधारणा करायची याचा वेळीच अभ्यास करा. रोज शरीराला पौष्टिक घटक आणि पोषक तत्व मिळतात की नाही, हे आवर्जून पाहा.

दिवसातून कमीत कमी आठ ग्लास पाणी प्या. शिवाय पाण्याचं प्रमाण अधिक असलेले अन्नपदार्थ खाल्ल्याने वजन कमी होण्यास मदत होते. उदा - कलिंगड, संत्री, अननस, टोमॅटो आणि काकडी

हेल्दी आणि लो कॅलरी पदार्थ तयार करण्याच्या अनेक रेसिपी पुस्तकातून मिळतात. यांमुळे वजन तर नियंत्रणात राहतंच शिवाय चवीला चांगले पदार्थ खायला मिळतात. नवीन नवीन रेसिपी वाचा आणि प्रयोग करून बघा. कल्पनाशक्तीला चालना द्या. जेवणाच्या वेळी पदार्थ डायनिंग टेबलवर सजवून ठेवा. भाज्या जास्त शिजवू नका. त्या हलक्या वाफवा. अती शिजवल्याने त्यातली पोषकद्रव्य नाहीशी होतात.

सलाड ड्रेसिंग मध्ये व्ह‌निेगर घालणं पूर्णपणे बंद करा. तळलेल्या पदार्थांऐवजी भाजलेले पदार्थ खायला सुरुवात करा. क्रीम ऐवजी योगर्ट खाऊन बघा. अशाने जास्तीच्या कॅलरी बंद होतील. भूक लागली की सूप प्यायची सवय लावून घ्या. काकडी, कलिंगड, मिक्स भाज्या, कडधान्य अशी सुप्स तयार करून बघा. सुपने पोट भरत शिवाय त्यात पौष्टिक घटक असतात. जेवणाच्या आधी सूप घेतल्याने जेवणातल्या अनावश्यक कॅलरीज टाळता येतात. उन्हाळ्यात गार सूप प्यायल्याने फ्रेश वाटतं.

एकाचवेळी खूप खाणं टाळा. त्याऐवजी चारवेळी थोडंथोडं खा. पण अरबट चरबट खाऊ नका.

ड‌हिायड्रेशन कसं टाळाल ?

तुमच्या आहारात फळं, फळांचे रस आणि नारळपाण्याचा समावेश करा.

बाहेर पडताना नेहमी एक पाण्याची बाटली जवळ ठेवा आणि दिवसभर पाणी पीत राहा.

जर तुम्ही दिवसातून एक तासापेक्षा जास्त व्यायाम करत असाल तर स्पोर्ट‍्स ड्रिंक घेऊने ऊर्जा मिळवायला हरकत नाही.

शब्दांकन : आकांक्षा मारुलकर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ऐकावे शरीराचे

$
0
0

दीप्ती आंबेकर, फिटनेस तज्ज्ञ

व्यायाम करताना मनापेक्षा शरीराचं ऐकावं. लहानसहान गोष्टींमुळे व्यायामाला सुट्टी देण्याची गरज नसते, तसंच शरीर तक्रार करत असतानाही व्यायाम करत राहणं चुकीचंच असतं.

सततच्या बदलत्या हवामानामुळे सध्या सर्दी, खोकला, तापानं ग्रस्त झालेल्यांचं प्रमाण वाढत आहे. अशा परिस्थितीत व्यायामाला सुरुवात करावी की नाही, अशी अनेकांची द्विधा मनःस्थिती झाली आहे. ज्यांचा व्यायाम सुरू आहे, त्यांच्या व्यायामातही अनिश्चितता दिसते आहे. तब्येत बरी नसताना व्यायाम करावा की नाही, असा प्रश्न अनेकांना पडतो. त्यातही काही लोक चार शिंका आल्या, तरी लगेच व्यायाम बंद करतात. याचंच दुसरं टोक म्हणजे काही लोक कितीही आजारी असले, तरी व्यायाम अजिबात चुकवत नाहीत. थोडक्यात आजारी असताना चालायला जायचं की नाही, एरोबिक्स क्लास करावा की नाही, असा प्रश्न आपल्याला पडतो.

अशा वेळेला खालील गोष्टी लक्षात घ्याव्यात

आपल्याला झालेला आजार हा किरकोळ असेल म्हणजे थोडी सर्दी आहे; पण श्वास घ्यायला त्रास होत नाही, अशा वेळेस व्यायाम करायला हरकत नाही. फक्त तो नेहमीपेक्षा कमी वेळ तसंच कमी तीव्रतेनं करावा. उदा. नेहमी एक तास जॉगिंग करत असाल, तर त्या ऐवजी अर्धा तास चालावं.

जेव्हा सर्दीबरोबरच श्वास घ्यायलाही त्रास होत असेल किंवा छातीत कफ झाला असेल, तर एखाद-दुसरा दिवस व्यायाम बंद ठेवणं योग्य ठरेल.

अशक्तपणा तसंच अंगदुखी जाणवत असताना व्यायाम बंद ठेवणंच योग्य असतं.

ताप असताना व्यायाम करू नये. आधीच आपल्या शरीराचं तापमान वाढलेलं असतं आणि त्यात व्यायामामुळे अधिक ऊर्जा निर्माण होऊन शरीराचं तापमान अधिकच वाढेल. ते तब्येतीच्या दृष्टीने योग्य नाही.

व्यायाम नव्यानंच सुरू केला असेल किंवा बऱ्याच दिवसांच्या सुट्टीनंतर सुरुवात केली असेल, तरीही आपल्याला अंगदुखी जाणवते. हातापायाचे स्नायू दुखतात. जिने चढणं-उतरणंही त्रासदायक होतं. अशावेळेस व्यायाम पूर्णपणे बंद न ठेवता कमी तीव्रतेनं सुरू ठेवावा. व्यायाम झाल्यावर स्ट्रेचिंग करावं. एक दोन दिवसांतच अंगदुखी बंद होईल.

काही वेळेला अति व्यायामामुळे स्नायू दुखावले जातात. अशा वेळेला स्नायूंना आराम देणं अतिशय महत्त्वाचं आहे.

आपल्या स्नायूंना किंवा हाडांना तीव्र दुखापत झालेली असल्यास डॉक्टरांचा सल्ल्यानं योग्य उपचारानंतरच व्यायामास सुरुवात करावी.

काहींचा असाही समज असतो की तीन-चार दिवस व्यायाम बंद पडला, तर आत्तापर्यंतच्या सगळ्या मेहनतीवर पाणी पडेल आणि परत शून्यातून सुरुवात करावी लागेल. हा गैरसमज आहे. इतक्या वर्षांच्या मेहनीतनं कमावलेल्या तब्येतीवर केवळ तीन-चार दिवसांनी काही फरक पडत नाही. छोट्या छोट्या कारणांमुळे व्यायामाला सुट्टी देण्याचीही गरज नाही. अशा वेळेला आपण मनाचं ऐकण्यापेक्षा प्रत्येकानं आपली शारीरिक तयारी आणि क्षमता तपासावी.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निम्मे खासगी कर्मचारी नैराश्यग्रस्त

$
0
0

कामाचे आव्हानात्मक स्वरूप, ताणतणाव आणि कामगिरी राखण्यासाठीची आवश्यकता आदी कारणांमुळे भारतात खासगी क्षेत्रातील ४२.५ टक्के कर्मचारी नैराश्य किंवा चिंतेने ग्रस्त आहेत, अशी धक्कादायक माहिती नुकतीच 'असोचॅम'ने केलेल्या एका सर्वेक्षणात उघड झाली आहे. शिवाय नैराश्य आणि चिंता यात गेल्या आठ वर्षांत ४५ ते ५० टक्के वाढ झाली आहे.

कॉर्पोरेट क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या समस्या

नैराश्य ४२.५%
लठ्ठपणा २३%
हाय ब्लडप्रेशर ९%
डायबेटीस ८ %
स्पाँडिलॉसिस ५.५ %

अपुरी झोप

कॉर्पोरेट क्षेत्रातील व्यक्तींना असलेल्या विकारांमागे अपुरी झोप हे प्रमुख कारण असल्याचे अभ्यासात समोर आले. ३८.५ टक्के कर्मचारी सहा तासांहून कमी झोप घेत असल्याचे समोर आले. तर ५७ टक्के कर्मचारी बिलकुल व्यायाम करत नसल्याचे आढळले.


नैराश्याने ग्रस्त कॉर्पोरेट कर्मचाऱ्यांचे सर्वाधिक प्रमाण

१ दिल्ली

२ बेंगळुरू

३ मुंबई

४ अहमदाबाद

५ चंदिगढ

६ हैदराबाद

७ पुणे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धुराचे खुलेआम वलय

$
0
0

महाराष्ट्रात सार्वजनिक ठिकाणी धुम्रपानास तसेच शैक्षणिक संस्थांच्या आवारात तंबाखूजन्य पदार्थ विकण्यास कायद्याने बंदी असतानाही पोलिस कारवाईच करत नसल्याचे चित्र आहे. इतर राज्यात नियम अंमलबजावणीचे प्रयत्न होत असताना राज्यात गेल्या दोन वर्षांत केवळ १२ जणांवर कारवाईचा बडगा उगारला आहे.

एप्रिल २०१२ ते डिसेंबर २०१४ या कालावधीत झालेली कारवाई

राज्ये दंड झालेल्या व्यक्ती जमा झालेली रक्कम

कर्नाटक १.५ लाख १.९ कोटी

आंध्र प्रदेश ७१, ७०५ ५६ लाख

तामिळनाडू ३९, ९१४ ४४ लाख

राजस्थान १५, ७४१ १६ लाख

ओडिशा १०, ४७७ ८ लाख

दिल्ली ९८८५ ६ लाख

महाराष्ट्र १२ १८००


एफडीएकडून राज्यात झालेली कारवाई
दंड झालेले लोक २०१३ २०१४ ५०२१ १०७८ जमा झालेली रक्कम २.१३ लाख १.४२ लाख

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अन्यथा ह्रदयविकाराचे रुग्ण व्हाल!

$
0
0



मटा ऑनलाइन वृत्त । वॉशिंग्टन

जगण्याच्या धावपळीत अनेक अडीअडचणींना आणि संकटांना तोंड देत आपण पुढे जात असतो. कामाच्या रगाड्यात आपली चिडचिड होते तसा रागाचा पारा चढतो. पण आता हे थांबवा. कृतज्ञ व्हा अन्यथा ह्रदविकाराला सामोरे जा, असा इशारा देण्यात आला आहे.

सहकारी, मित्र, डॉक्टर आरोग्य तज्ज्ञ, आरोग्य मासिकं, लेखांमधून आपल्याला अनेकदा (फुकट) सल्ले मिळतात ते आनंदी आणि हसतमुख राहण्याचे. पण हे खरं ठरतंय. कारण आपल्या आरोग्य आणि आनंदासाठी अमेरिकेत संशोधन करण्यात आलं आहे. सतत आनंदी राहिल्याने तुमचा मूड चांगला राहतो. तुम्हाला शांत झोप लागते. सकारत्मक दृष्टीकोन आणि स्वीकारण्याची तयारी ठेवा. तरच तुम्ही ह्रदविकाराचे रुग्ण होण्यापासू वाचू शकता, असं संशोधनातून समोर आलं आहे.

कॅलिफोर्नियाच्या सॅन डियागो इथल्या विद्यापीठातील प्राध्यापक पॉल जे मिल्स यांनी ह्रदयाशी संबंधित एक संशोधन केलं आहे. मिल्स हे विद्यापीठात फॅमिली मेडीसीन आणि पब्लिक हेल्थ या विषयाचे प्राध्यापक आहेत. त्यांनी केलेल्या संशोधनात १८६ महिला आणि पुरुषांनी सहभाग घेतला. संशोधनात खासकरून 'अध्यात्मिकता आणि आभार मानने' या मुद्द्यांवर भर दिला गेला. 'उदार मनाने इतरांचे आभार मानल्यास आणि सतत आध्यात्मिकतेच्या संपर्कात आल्यास तुमचं मन कायम प्रफुल्लीत राहतं. निवांत झोप लागते. संताप येत नाही. त्यामुळे तुमचं ह्रदयही ठणठणीत रहातं. अन्यथा ती व्यक्ती ह्रदयविकाराची रुग्ण होणं आहे, असं संशोधनातून समोर आल्याचं मिल्स यांनी सांगितलं.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोबाइलचा सायलेंट अटॅक

$
0
0

स्वप्निल घंगाळे

सतत 'कँडी क्रॅश' खेळल्याने अमेरिकेत एका तरुणाच्या अंगठ्याचं ऑपरेशन झाल्याची बातमी तुम्ही वाचली असेल. मोबाइलचा असा अतिवापर तुमच्याही अंगाशी येऊ शकतो. कसा ते आम्ही सांगतो...


'अरे, ती बातमी वाचली का कँडी क्रश खेळल्यानं अंगठ्याचं ऑपरेशन झाल्याची', 'हो रे, वेडा होता तो, एवढा वेळ काय खेळत होता?', अशी चर्चा सध्या व्हॉट्सअॅप कट्ट्यांवर रंगली आहे. मोबाइलच्या अतिवापराचं एक प्रकरण अमेरिकेमध्ये समोर आल्यानंतर यावर खूप बोललं जातंय. एखादं व्यसन असल्याप्रमाणे मोबाइलचा वापर केल्यानं काही ना काही व्याधी-विकार जडण्याचं प्रमाण आपल्याकडेही दिसून येऊ लागलं आहे.

स्मार्टफोन थम्ब
फेसबुक लाईक पासून ते मेसेज टाइप करणे, गेम्स खेळणे, फोटो पाहणे यासारख्या सर्वच गोष्टींसाठी अंगठ्याचा सर्वाधिक वापर होतो. त्यामुळे दिवसभर सरासर फिरणा-या अंगठ्याच्या हाडाला कायमची इजा होणे, अंगठाच्या टोकावरील संवेदना नष्ट होण्यासारखे आजार मोबाईलच्या वापरामुळे होतात.
लक्षणे - अंगठ्याला कसलाच भास न होणे, अंगठ्याच्या बुडाशी (जिथे तो तळहाताला जोडला जातो) हाड दुखणे, अंगठा वाकवताना त्रास होणे, अंगठ्याची पेरे दुखणे
सतर्कता - कमीत कमी चॅटिंग करा, जास्त बोलायचे असल्यास थेट फोन करा, सतत एकाच हाताने टायपिंग करणं टाळा

सेल फोन एल्बो
या आजारामध्ये फोनवर बोलताना किंवा चालताना चॅटिंग करताना ब-याच वेळ हात एकाच स्थितीत ठेवल्याने हातामधील स्थायूंच्या संवेदना क्षीण होतात. या आजाराच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत असून यात तरूणांची संख्या मोठी आहे.
लक्षणे - कोपर दुखणे, फोन वापरताना हाताला मुंग्या येणे, सतत क्रॅम्प येणे
सतर्कता - जास्त वेळ फोनवर बोलताना कॉड्स वापरा, तासंतास चॅटिंग टाळा

टेक्स क्लॉ
फोनच्या वजनामुळे किंवा सतत फोन तळहातावर ठेवल्याने मनगट तसेच तळहात दुखावला जातो. वेळीच लक्ष न दिल्यास हा आजार तळहाताला कायमचा निकामी बनवू शकतो
लक्षणे - मनगट जड वाटणे, बोटांना अचानक मुंग्या येणे, तळहात जड वाटणे तसेच तळहात हलवताना त्रास होणे
सतर्कता - सतत फोन वापरू नका, दोन्ही हातांनी फोन वापरा

टेक्स्ट नेक
सतत काय मोबाईलमध्ये डोकावत असतो, या प्रश्नाला ठोस उत्तर नाहीये. मात्र सतत मोबाईलमध्ये डोकं घालून बसल्याने मान तसेच मणक्याला कायमची इजा होऊ शकते.
लक्षणे - मान दुखणे, पाठीला त्रास होणे
सतर्कता - कान आणि खांद्याच्यामध्ये फोन पकडून बोलणे टाळा, आडवे पडून मेसेज करणे टाळा, चालताना चॅटिंग करू नका.

या आजारांशिवाय सारखं फोनची स्क्रीन पाहिल्याने डोळ्यांमधील ओलावा कमी होणे, सतत गाणी ऐकल्याने कानांवर परिणाम होणे, डोके दुखणे यासारखे आजारही फोनच्या अती वापरामुळेच होतात. फोनमुळे अनेकांच्या रिलेशनशिपमध्ये अडचणी येतात तसेच फोनशी संबंधीत मानसिक आजारही काळजीचाच विषय आङे. त्यामुळे फोन वापरताना मर्यादा निश्चीत करणे गरजेचे आहे.

व्यसनासारखा वापर नको
स्मार्टफोनमुळे हाडांच्या संदर्भातले आजार होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे. हे आजार मोबाइल वापराच्या विशिष्ट सवयींमुळे जडतात. मोबाइल आजची गरज आहे. पण ते व्यसन असल्याप्रमाणे त्याचा वापर वाढला आहे. आणि व्यसनाचे दुष्परिणाम होतातच. म्हणून स्मार्टफोनच्या आहारी न जाता, स्मार्टपणे तो वापरणं हा सर्वात उत्तम उपाय आहे.
- डॉ. सुधीर कुळकर्णी, ऑर्थोपेडीक सर्जन



मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आइस्क्रीमची रंगिली दुनिया

$
0
0

डॉ. अविनाश भोंडवे

उन्हाळ्याची तलखी कमी करण्यासाठी आइस्क्रीमचा गारेगार पर्याय हवाहवासा वाटतो. त्याचा अतिरेक वाईटच. कारण आपल्या जिभेवर थंडावा निर्माण करणारं आइस्क्रीम आरोग्यविघातक पदार्थांनी बनलेलं ही असू शकतं.

कडक उन्हात वणवण करताना आइस्क्रीम पार्लरचा बोर्ड वाचताच डोळे शांत होतात, हा आपल्या सर्वांचा अनुभव असतो. आजकाल लग्नमुंजीचे, सांस्कृतिक कार्याचे, किंवा कसलेही सार्वजनिक किंवा घरगुती जेवण असो, त्याचा शेवट आइस्क्रीमनंच करायचा असा नवा पायंडा अवचितपणे पडून गेला.

आहार घटकः चांगलं आइस्क्रीम म्हणजे एक 'मिनी' चौरस आहारच असतो. एका कपात १५ ग्रॅम कर्बोदकं, ७ ग्रॅम स्निग्ध पदार्थ, २ ग्रॅम प्रथिनं मिळतात. त्यामध्ये अ, क, ड, ई, के तसंच बी-६, बी-१२, थायमिन, रायबोफ्लेविन, नायसिन ही जीवनसत्त्वं असतात. मनामध्ये लालूच निर्मिणाऱ्या आइस्क्रीमच्या एका छोट्या कपामधून शरीराला तब्बल १३७ कॅलरीज मिळतात. मात्र, ते सतत आणि वारेमाप खाण्यामुळे अतिरिक्त वजनवाढ होते. काही ब्रँडमध्ये १६ टक्के स्निग्धपदार्थ असतात, त्यामुळे रक्तातील कोलेस्टेरॉल वाढतं. उच्च रक्तदाब, हृदयविकार अशा आजारांना ती कारणीभूत ठरू शकतात. आइस्क्रीम हे गोडच असते; कारण त्यात सुक्रोज, ग्लुकोज, फ्रुक्टोज, माल्टोज, झायलीटॉल अशा तऱ्हेतऱ्हेच्या शर्करांचा पाक असतो. शिवाय सॅकरिन, अॅस्पार्टेट अशा कृत्रिम माधुर्य निर्माण करणाऱ्या रसायनांचासुद्धा परिपोष असतो. अतिसाखरेनं वजन वाढून मधुमेह होण्याची भीती असते, तर या कृत्रिम मधुरता निर्माण करणारी रसायनं कर्करोगाला निमंत्रण देतात.

आजच्या बदलत्या आरोग्यशैलीचा अविभाज्य हिस्सा बनलेल्या या आइस्क्रीममध्ये असं काय काय असतं?

डायएथिल ग्लायकॉलः पूर्वी आइस्क्रीम घट्ट होण्यासाठी अंड्यातला पांढरा बलक वापरायचे, आता हे रसायन वापरतात. खरं तर याचा वापर एखाद्या वस्तूचा रंग काढण्यासाठी, काही यंत्रं थंडीत गोठू नयेत म्हणून, प्लास्टिक उद्योगात पॉलिएस्टर रेझिन्स बनवण्यासाठी केला जातो. अमेरिकेत हा पदार्थ टूथपेस्टमध्ये यत्किंचितही वापरायला कडक बंदी आहे; पण तो सर्वांच्या या आवडत्या खाद्यामध्ये सर्रास वापरला जातो.

पिपरोनॉल (हेलिओट्रॉपिन) ः व्हॅनिला या वनस्पतीचा वापर आइस्क्रीममध्ये केला जायचा. आता नैसर्गिक व्हॅनिलाची जागा पिपरोनॉल किंवा हेलिओट्रॉपिनने घेतली आहे. हे सौम्य विषारी रसायन आहे

एथिल अॅसिटेट ः पायनापलचा स्वाद निर्माण करणारं हे रसायन चामड्याच्या वस्तूंना रंग देण्यासाठी वापरलं जातं.

अल्डीहाइड सी-१७ ः लाल रंगाचं हे ज्वालाग्राही रसायन, केमिकल डाय म्हणून प्लास्टिक आणि रबर उद्योगात वापरलं जातं.

एमिल किंवा पेंटील अॅसिटेट ः केळ्याचा स्वाद देणारं हे रसायन ऑइलपेंट पातळ राहण्यासाठी वापरतात.

या शिवाय ब्युटीराल्डीहाइड, बेन्झील अॅसिटेट, प्रॉपिलिन ग्लायकॉल, सोडियम बेन्झोएट, पोटॅशियम सॉर्बेट, पॉलिसॉर्बेट ८० वगैरे असंख्य रसायनं आपल्या रसनेला भुरळ पाडणाऱ्या आइस्क्रीममध्ये असतात.

त्यामुळे आइस्क्रीमचा आनंद एका मर्यादेत उपभोगणं आणि त्यातल्या घटकांवर लक्ष ठेवणं, आरोग्यासाठी महत्त्वाचं आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

व्यायाम करावा नेटका

$
0
0

नमिता जैन

आधीच उन्हाने अंगाची काहिली होत असते. त्यात उन्हाळा म्हणजे तर हक्काच्या सुट्ट्यांचा महिना. त्यामुळे काहीशी शिथीलता आलेली असते. अशात व्यायाम करणं म्हणजे महाकठीण काम... तरीही हे गणित जुळवायचं कसं?

उन्हाळ्यात फिटनेसच्या दृष्टीने कोणतं ध्येय निश्चित करायला हवं ?

शरीराची भरपूर हालचाल करत राहा. उत्साही ‌राहा. व्यायामाचा कंटाळा येणार नाही, यासाठी युक्त्या प्रयुक्त्या लढवा. पोहणं, किकबॉक्सिंग, नृत्य, अरोबिक्स अशा गोष्टींचा व्यायामात समावेश केलात की आपोआप उत्साही वाटू लागेल.

उन्हाळ्यात व्यायाम करताना कोणती काळजी घ्यायला हवी ?

व्यायामाच्या वेळी तहान लागणं ही नेहमीची तक्रार असते. सतत घाम आल्यामुळे शरीरातल्या पाण्याचं प्रमाण कमी होतं आणि तहान लागते. म्हणूनच दररोज १० ते १२ ग्लास पाणी पिणं आवश्यक आहे. तुम्ही रोज व्यायाम करत असाल तर पाण्याचं प्रमाण योग्य असायलाच हवं. व्यायामाला सुरुवात करण्यापूर्वी एक तास एक ग्लास पाणी, व्यायामादरम्यान दर पंधरा मिनिटाला एक ग्लास तर व्यायाम संपल्यावर अर्ध्या तासाने दोन ग्लास पाणी पिण्याची सवय लावून घ्या.

उन्हाळ्यात कोणते व्यायाम करणं फायदेशीर ठरू शकतं?

पोहणे - पोहणं हा उन्हाळ्यातला सर्वोत्तम व्यायाम आहे. यात कोणत्याही प्रकारचं वजन उचलावं लागत नाही. शिवाय हाडांवर कोणत्याही प्रकारचा ताण पडत नाही. उन्हाळ्यात थंडावा मिळण्याबरोबरच कॅलरी जाळण्याचं काम होत असल्याने पोहण्याचा पर्याय चांगला आहे.

सायकलिंग - सायकलिंगसुद्धा व्यायामासाठी चांगला पर्याय ठरू शकतो. हाडांच्या आणि स्नायूंच्या बळकटीसाठी सायकल चालवणं फायदेशीर ठरतं. संध्याकाळच्या वेळी सायकल चालवायला हरकत नाही. सायकलवरून ऑफिसला जाणं हाही एक छान पर्याय असेल.

चालणे - जर तुम्हाला घरच्या घरी चालायचं असेल तर ट्रेडमिल वापरून बघा. त्यामुळे घराच्या बाहेर न पडता चालण्याचा व्यायाम सहज होतो. जर तुम्हाला बाहेर जायला आवडत असेल तर रस्त्यावर, बागेत, टेकडीवर किंवा समुद्रकिनारी असं कुठेही तुम्ही चालू शकता.

योगा आणि प्राणायाम - योगासनांमुळे शरीर आणि मनाला शांती मिळते.

उन्हाळ्यात कोणता व्यायाम टाळायला हवा ?

दुपारच्या वेळी कडक उन्हात घराबाहेर व्यायाम करणं टाळा. उन्हात व्यायाम केल्याने उष्माघाताचा धोका संभवतो. यामुळे शरीरातली उर्जा निघून जाते. लगेच थकवा येतो. बाहेर व्यायाम करायचा असेल तर सकाळी लवकर किंवा संध्याकाळी सावलीत करू शकता. याला दुसरा पर्याय म्हणजे घरातच व्यायाम करण्याला प्राधान्य द्या. त्यासाठी जिमला जाऊ शकता किंवा योगवर्गातही जाऊ शकता.

मंत्र आरोग्याचा

तुमच्या आहारामध्ये फळं आणि फळांचे रस नक्कीच असू द्या. नारळपाणी पिण्याचीही सवय ठेवा.

घराबाहेर पडताना पाण्याची बाटली कायम जवळ ठेवा.

जर तुम्ही जास्त व्यायाम करत असाल तर स्पोर्ट‍्स ड्रिंक घ्यायला हवेत. एक तासापेक्षा अधिक व्यायाम होत असेल तर इलेक्ट्रोलेट घ्यायला हवं.

व्यायाम करताना योग्य वेळी विश्रांती घ्या.

उन्हाळ्यात जास्त ताकदीचे व्यायाम करणं टाळा शिवाय खूप जास्त वेळ व्यायाम करू नका.

शब्दांकन : आकांक्षा मारुलकर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घरगुती फेसपॅक

$
0
0

उन्हाळ्यात त्वचेची काळजी घेण्यासाठी आपण बरेच उपाय करत असतो. पण घरच्याघरी करता येतील, असेही काही उपाय आहेत. काही घरगुती फेसपॅकबद्दल...

लिंबू आणि कोरफड

लिंबाचा रस आणि कोरफडीच्या पानांचा रस एकत्र करून चेहऱ्याला लावल्याने स्कीन टॅन कमी होतं.

दही आणि बेसन

दही आणि बेसनाचं मिश्रण चेह‍‍ऱ्यावर आणि हातांवर वगैरे लावावं. ते सुकल्यावर गरम पाण्याने धुवून टाकावं. त्यामुळे त्वचा मऊ आणि तेजस्वी होते.

चंदन आणि गुलाबपाणी

सनबर्नपासून त्वचेचं संरक्षण करण्यासाठी हे उत्तम मिश्रण आहे. हा फेसपॅक लावल्याने ताजंतवानंही वाटेल.

मध आणि हळद

मध आणि हळदीचं मिश्रण करून लावल्यास त्वचेवर खूप चांगले परिणाम दिसतील. कारण हे एक उत्तम घरगुती मॉइश्चरायझर आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उन्हात बाहेर पडायचंय?

$
0
0

अर्चना रायरीकर, आहाततज्ज्ञ

उन्हात कामासाठी बाहेर पडणाऱ्यांची मोठी कसरत असते. त्यांनी योग्य काळजी घेतली, तरच उन्हाळा त्यांना बाधणार नाही.

'उन्हं डोक्यावर आलीत, बाहेर पडू नका', 'फारच ऊन आहे, बाहेरची कामं संध्याकाळीच करू' असे संवाद आपण सध्या ऐकतोय. ज्यांना कामाची वेळ ठरवण्याची मुभा आहे, अशांसाठी हे ठीक आहे. मात्र, ज्यांना सकाळ असो किंवा दुपारचं टळटळीत ऊन, बाहेर पडून त्या-त्या वेळी काम करावंच लागतं अशांनी तब्येतीला सांभाळूनच राहावं. याबाबत तज्ज्ञ काय सांगतात, ते पाहू या.

बाहेर पडताना...

दुपारच्या उन्हात बाहेर पडणार असाल, तर घरून काहीतरी खाऊन बाहेर पडा. उपाशी पोटी बाहेर पडलात, तर उन्हाचा त्रास होऊ शकतो.

निघण्यापूर्वीच्या आहारात हलकं अन्नच असू द्या. पोटभर किंवा मसालेदार जेवून बाहेर पडू नका. यामुळे अॅसिडिटीचा त्रास होऊ शकतो.

सोबत सनकोट, स्कार्फ, टोपी, हँडग्लोज, पायमोजे असू द्यात, ज्यामुळे ऊन्हाची तीव्रता जाणवणार नाही आणि टॅनिंगचा त्रासही होणार नाही. सनस्क्रीन लोशन लावणंही महत्त्वाचं आहे.

रात्रीचं जेवणही कमी मसालेदार आणि हलकं असू द्यात.

घरी आल्यानंतर...

उन्हातून घरी आल्यानंतर काही काळ शांत बसा. लगेचच घटाघटा पाणी पिऊ नका किंवा जेवू नका. थंड पाण्यानं हातपाय धुतल्यानंतर दही-भात, ताक-भात, सॅलेड असा आहार घ्या.

पाण्याची बाटली सोबत असावीच. उन्हात घामावाटे शरीरातील इलेक्ट्रोलाइट बाहेर पडत असतात. त्यामुळे उन्हात लवकर थकायला होतं. नुसतं पाणी प्यावंसं वाटत नसेल, तर लिंबू सरबत सोबत बाळगावं. यातील मीठामुळे सोडियम मिळेल आणि साखरेमुळे एनर्जी.

कोकम सरबत किंवा पुदिना, वाळा, धने-जिरे घातलेल्या पाण्याचाही पर्याय आहे.

पाण्याचा अंश असलेली फळंही सोबत न्या. यामुळे भूक भागेल आणि शरीराची पाण्याची गरजही. टरबूज, कलिंगड, नारळाचं पाणी.

उपाशी पोटी पाणी पिऊ नका. उन्हात फिरत असताना तर नाहीच नाही. यामुळे पोट दुखण्याची शक्यता असते. या काळात भूक कमी लागते किंवा उन्हाच्या तीव्रतेनं खाण्याची इच्छा होत नसली, तरी काहीतरी खाल्लच पाहिजे.

बाहेर खायची वेळ आलीच, तर चांगल्या स्वच्छ ठिकाणी खा. फळं, फळांचा ज्यूस, फ्रूट प्लेट खाणार असल्यास ती तुमच्या समोर कापलेली असावीत. ती झाकून ठेवलेली पाहिजेत. सभोवताली माशांचा वावर असेल, तर ते ठिकाण टाळलेलंच बरं. यामुळे शरीरावर उलटे परिणाम होतील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कच्च्या सिमला मिरचीने मधुमेह आटोक्यात

$
0
0

नव्या संशोधनातील निष्कर्ष

नवी दिल्ली : सिमला मिरची प्रमाणाबाहेर खाणे पचनासाठी घातक असले, तरीही एका विशिष्ट प्रमाणात खाल्लेली कच्ची सिमला मिरची आरोग्यासाठी फायद्याची असते, असे नुकत्याच करण्यात आलेल्या अभ्यासामध्ये आढळून आले आहे. कच्च्या सिमला मिरचीने मधुमेह आटोक्यात राहतो आणि यामुळे मेदवृद्धीही रोखता येते, असे हा अभ्यास सांगतो.

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीच्या तज्ज्ञांनी याबाबत काही निरीक्षणे नोंदविली आहेत. सध्याच्या बदललेल्या जीवनशैलीमध्ये अतिशय कमी वयातच अनेक आजार होतात. मेदवृद्धी आणि मधुमेहाचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी सिमला मिरची उपयोगी पडू शकते, असे तज्ज्ञांना वाटते. डॉ. अशोककुमार म्हणाले, 'पिवळी मिरची आणि हिरवी मिरची यांच्यामध्ये अनेक अनन्यसाधारण गुणधर्म आहेत. पित्त वाढण्यासाठी सिमला मिर्ची कारणीभूत ठरू शकते. मात्र, कच्ची मिरची खाल्ल्याने अनेक फायदे होऊ शकतात. रक्तातील साखरेचे प्रमाण मर्यादित राहते. कर्बोदकेही वाढतात. त्यामुळे सॅलेड म्हणून सिमला मिरची खाण्यासाठी प्राधान्य दिले पाहिजे.'

सिमला मिरचीमध्ये लाल रंगाची सिमला मिरची काहीअंशी आरोग्यासाठी घातक ठरू शकते. या मिरचीचा आहारातील वापर कमी करण्याकडेच आपला कल असला पाहिजे, असेही तज्ज्ञांनी म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भारतीय तरुणीच्या मेंदूमध्ये जुळे भ्रूण

$
0
0

अमेरिकन डॉक्टरांनी केले यशस्वी ऑपरेशन

वृत्तसंस्था, लॉस एंजलिस

गर्भनलिकेत भ्रूण राहण्याच्या समस्येला अनेक महिलांना सामोरे जावे लागते. परंतु, नुकताच अमेरिकेत डॉक्टरांसमोर एक धक्कादायक प्रकार समोर आला. एका २६ वर्षीय भारतीय महिलेच्या चक्क मेंदूमध्ये जुळे भ्रूण आढळून आले. या महिलेला ब्रेन ट्युमर असल्याच्या शक्यतेने तिची शस्त्रक्रिया करताना डॉक्टरांना हाडे, केस आणि विशेष म्हणजे, दात असलेले जुळे भ्रूण आढळले.

यामिनी करानाम असे या महिलेचे नाव आहे. ती मूळची हैदराबादची असून, इंडियाना विद्यापीठात पीएचडी करीत आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरपासून वाचताना आणि बोलताना त्रास जाणवू लागल्याने ‌तिने डॉक्टरांकडे धाव घेतली. नंतरच्या काळात तर जेवणेही तिला त्रासदायक होऊ लागले. डोक्यातील वेदना तिला असह्य होऊ लागल्या होत्या. डॉक्टरांनी तपासणी केली असता, त्यांना यामिनीच्या मेंदूच्या मध्यभागी वाटाण्याच्या आकाराएवढी गाठ आढळली. तिला पिनिअल ट्युमर असल्याचे निदान करण्यात आले. या वर्षाच्या मार्चमध्ये लॉस एंजलिसच्या स्कलबेस इन्स्टिस्ट्यूटमधील मेंदूवरील गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियांमध्ये निष्णात डॉ. रायर शाहिनियान यांच्याकडे यामिनीने उपचार घेण्यास सुरुवात केली. डॉक्टरांनी यामिनीची इंडोस्कोपी केली असता, त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला.

हाडे, केस आणि दात असलेले भ्रूण त्यांना यामिनीच्या मेंदूत आढळले. डॉ. शाहीनियान यांनी यशस्वीरित्या ते काढून टाकले. यामिनी लवकरच पूर्ण बरी होईल, असा त्यांना विश्वास आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उंच व्हायचंय, काय करू?

$
0
0

हर्षल मळेकर

'सर, मला उंची वाढवयाची आहे. काय करू?', 'कॉलेज सुरू होईपर्यंत माझी उंची वाढू शकेल का? काय करावं लागेल?', 'माझं वय अठरा वर्ष पूर्ण झालंय, आता माझी उंची वाढेल का?' हे आणि असे प्रश्न सध्या जिममध्ये विचारले जात आहेत. सुट्टीमध्ये उंची वाढवण्यासाठी जिमची पायरी चढणाऱ्या तरुणांची संख्या मोठ्या प्रमाणावर दिसून येतेय.

दहावी-बारावीच्या तसंच कॉलेजांच्याही परीक्षा संपल्यानं मोठ्या टेन्शनमधून सुटल्यासारखं मुलांना वाटतंय. पुढे अडीच-तीन महिन्यांची सुट्टी आहे. त्यामुळे या सुट्टीत काय करायचं यासाठी अनेक गोष्टी करण्याचे प्लॅन्स मुलांनी ठरवले आहेत. सुट्टीचा उपयोग करून घेत अनेकांना उंची वाढवायची असते. त्यामुळे या एका कारणासाठी जिममध्ये खूप गर्दी पाहायला मिळतेय. 'दहावीची मुलं शाळेतून कॉलेजच्या जगात एंट्री करणार असतात. कॉलेजला जाताना त्यांना छान दिसायचं असतं. त्यासाठी अनेकजण जिमची पायरी चढतात. प्रत्येक जिममध्ये या काळात गर्दी दिसून येते. सुट्टीच्या काळात जिममध्ये येणारी बहुतांश मुलं उंची वाढवयाचीय हे ठरवून येतात. मुलांनाच कशाला, पालकांनाही मुलांच्या उंचीची चिंता असते. त्यामुळे सुट्टीमध्ये ते करुन घेण्यावर पालकांचा भर असतो', असं जिममधले ट्रेनर्स सांगतात.

दहावी-बारावीला असलेले विद्यार्थी वर्षभर अभ्यासात बुडालेले असतात. अभ्यासाच्या नादात खाण्या-पिण्याकडेही दुर्लक्ष झालेलं असतं. सुट्टीचा उपयोग करत त्यांची तब्येत सुधारावी यासाठी अनेक पालकही मुलांना व्यायामशाळेत घालण्यासाठी आग्रही असतात. उंचीसाठी मुलांना पुलअप्स, सूर्यनमस्कार, दोरीच्या उड्या, स्ट्रेचिंगचे व्यायाम, सायकलिंग हे व्यायाम करण्याचा सल्ला दिला जातो.

'काही मुलं जिममध्ये येतात तेव्हा आधीच विचारतात, 'आम्हाला बॉडी बिल्डर व्हायचं नाही. पण उंची वाढेल असं काहीतरी सांगा. अनेकांना फास्ट रिझल्ट हवा असतो. काहींना मात्र पिळदार शरीरयष्टीही कमवायची असते. सुट्टीच्या काळात जिम जॉइन करणाऱ्यांपैकी जेमतेम ३० टक्के मुलंच पुढेही जिममध्ये येणं सुरू ठेवतात', असं जिममध्ये ट्रेनर असलेल्या निशिकांतनं सांगितलं.

मुलांची उंची वाढावी अशी पालकांचीही इच्छा असते. त्यामुळे मुलं तर येतातच शिवाय अॅडमिशनच्या वेळी पालकही त्यांच्याबरोबर येतात. प्रत्येक सुट्टीमध्ये उंची वाढवण्यासाठी जिममध्ये प्रवेश घेणाऱ्यांची संख्या वाढते. सुट्ट्यांचा काळ हा जिमसाठी पीक सीझन असतो. तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली स्ट्रेचिंग, हँगिंग, विशिष्ट आसनं असे व्यायाम केल्यानं उंची वाढण्यास निश्चितच मदत होते. व्यायाम गंभीरपणे मात्र करायला हवा.

विकी गोरक्ष, फिटनेसतज्ज्ञ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पाय थिरकतात... फिटनेस आणि थेरपीसाठी!

$
0
0

करुणा पुरी

फिटनेस आणि थेरपीसाठी नृत्य ही कला सर्वसामान्यांमध्ये प्रिय होईल, असं भाकीत काही वर्षांपूर्वी केलं असतं, तर कदाचित विश्वास बसला नसता. सध्या मात्र त्याचाच ट्रेंड आहे. 'इंटरनॅशनल डान्स डे'निमित्त या ट्रेंडचा घेतलेला आढावा...

नृत्यातून नेमकं काय मिळतं किंवा तो कशासाठी करायचा, असं कोण्या डान्सरला विचारलं, तर काही दिवसांपर्यंत आत्मिक शांतता, समाधान, आनंद अशी उत्तरं मिळत होती. म्हणजे केवळ आवडीपोटी डान्सला पसंती दिली द्यायची. मग तो भारतीय पारंपरिक नृत्यप्रकार असो वा एखादा पाश्चात्य. आता बदलत्या जीवनशैलीत डान्सला फिटनेस आणि थेरपीच्या दृष्टीनं नवं परिमाण मिळू पाहातंय.

विशेष मुलांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी भरतनाट्यम, कथक, ओडिसी आदी पारंपरिक नृत्यप्रकारांचा उपयोग होतो. अशा मुलांसाठी थेरपी म्हणून वेगळ्या पद्धतीनं आणि शैलीनं हे नृत्यप्रकार शिकवण्याचं प्रमाण जास्त आहे. फिटनेसच्या दृष्टीनं सांगायचं, तर आजकाल प्रत्येक जिममध्ये झुंबा, अॅक्वा झुंबा, मसाला भांगडा, बॉलिवूड असे डान्सचे नवे प्रकार घेतले जातात आणि त्या क्लासला कॅलरी जाळण्याचा नवा ट्रेंड म्हणून प्रचंड गर्दीही होते.

फिटनेससाठी...

झुंबा, अॅक्वा झुंबा, किड्स झुंबा, मसाला भांगडा, बॉलिवूड यातून फिटनेस मिळवणाऱ्यांची संख्या जास्त आहे. झुंबामध्ये लॅटिन आणि काही प्रमाणात इंटरनॅशनल म्युझिकमधून साल्सा, मॅरिंगे अशा दहा नृत्यप्रकाराच्या बेसिक स्टेप दिल्या जातात. 'डान्स हा सगळ्यांच्याच आवडीचा विषय, त्यात त्याचा फिटनेससाठी कल्पक वापर होत असेल तर कुणाला आवडणार नाही? उत्साह वाढवणारं म्युझिक, ग्रुप अॅक्टिव्हिटीमुळे झुंबाला पसंती मिळते. न थांबता सलग एक तास झुंबा केला, तर ५०० ते ८०० कॅलरी जाळल्या जातात. तेच इतर कार्डिओ व्यायामात १५ मिनिटं ते अर्धा तासात १५०-२०० कॅलरी जळतात. हे गणित पाहता झुंबाला पसंती मिळतेय. हीच गोष्ट अॅक्वा झुंबा, किड्स झुंबा, मसाला भांगडा, बॉलिवूड यालाही लागू होते,' असं झुंबा प्रशिक्षक श्वेता कुलकर्णीनं सांगितलं.

दिला आत्मविश्वास

डाउन सिंड्रोम असलेल्या ऋचा चितळेला भरतनाट्यम डान्सर केतळी काळेनं मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केलाय. ऋचाची आई चंदना सांगतात, की भरतनाट्यम शिकल्यामुळे ऋचाचा आत्मविश्वास आणि स्मरणशक्ती वाढण्यास मदत झाली. सुरुवातीचे सहा महिने केतकी यांनी तिला एकटीला शिकवलं. त्यानंतर मग इतर विद्यार्थ्यांमध्ये आणलं. आज ताई काय शिकवणार हे तिच्या लक्षात राहतं. इतर मुलांप्रमाणे आपणही डान्स शिकू शकतो, यामुळे ती आनंदी असते याहून मोठं सुख आमच्यासाठी नाही.

थेरपी म्हणून...

विशेष मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी, त्यांना 'सोशल' करण्यासाठी, व्यक्तिमत्त्व विकासासाठी तसंच आपणही सर्वसामान्यांप्रमाणेच आहोत, ही भावना त्यांच्यात निर्माण करण्यासाठी कथक, भरतनाट्यम अशा पारंपरिक नृत्यांची मदत होते. प्रसिद्ध कथक नृत्यांगना शिल्पा दातार पंधरा वर्षांपासून कर्णबधीर मुलांना कथक शिकवत आहेत. 'सुरुवातीला त्यांच्यासोबत माझं आणि कथकचं नातं तयार करायलाच अडचण येत होती. एकमेकांमध्ये संवादच होत नव्हता. त्यांच्यापर्यंत पोहोचण्यात आपण कमी पडतोय यामुळे मन निराश व्हायचं; पण मी प्रयत्न सोडले नाहीत. कालांतरानं ट्युनिंग जुळत गेलं. तसंच, मी त्यांची भाषा शिकल्यानंही फायदा झाला. ही त्यांच्यासाठी थेरपी आहे आणि माझ्यासाठी परमानंद. यामुळे त्यांच्यात आत्मविश्वास वाढतोच; शिवाय आपणही कथक शिकू शकतो याचा आनंद वेगळाच,' असं दातार सांगतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जसे खाल तसे दिसाल

$
0
0

आदिती कडवेकर, आहारतज्ज्ञ

खाण्याबाबत आधी बेफिकिर राहून नंतर कडक डाएट करणं काही बरं नव्हे. त्यापेक्षा योग्य आहारालाच जीवनशैली बनवणं केव्हाही चांगलं. त्यासाठी काही टिप्स.

जसे खाल तसे दिसाल, या उक्तीप्रमाणे तुम्ही काय खाता, किती खाता, कसं खाता यावर तुमचं आरोग्य अवलंबून असतं. अन्न हे पूर्णब्रह्म असलं, तरी त्याचं सेवन योग्य प्रमाणात होणं हेही तितकंच गरजेचं आहे. तसं झालं तरच त्या अन्नातून योग्य ऊर्जा, आवश्यक पोषण मिळून हवा असलेला परिणामही साधता येतो. म्हणूनच फक्त वजन कमी करायचं आहे किंवा वाढवायचं आहे यासाठी शिक्षा वाटण्याइतपत चुकीचं 'डाएट' करण्यापेक्षा योग्य आहारालाच तुमची जीवनशैली बनवा.

पुढे सांगितलेल्या काही टिप्स कटाक्षानं पाळल्यात, तर तुम्हाला योग्य आहाराचे नियम पाळणं नक्कीच सोपं जाईल.

रोज किमान ६-७ तासांची शांत झोप घ्या. यामुळे सर्व इंद्रियांना आराम मिळून दिवसभरातील झीज भरून काढण्यास मदत मिळेल.

सकाळी उठल्यावर रिकाम्यापोटी चहा, कॉफी तत्सम पेय घेऊ नका. चहा- कॉफीमुळे जाग तर येईल; पण त्यातल्या कॅफिनमुळे शरीराला काहीही पोषण मिळणार नाही. त्याऐवजी एखादं फळ किंवा रात्रभर पाण्यात भिजवलेलं सुकं फळ खा. यामुळे रात्रभर न खाल्ल्यानं खालावलेली रक्तातील साखरेची पातळी सुधारेल.

नाश्ता कधीही टाळू नका. ब्रेकफास्टचा अर्थच रात्रभर पेशींना झालेला उपवास सोडणं असा आहे.

नाश्त्यामध्ये पोटभरीचे पदार्थ उदा. पोहे, उपमा, पराठा, थालीपीठ खा. सकाळी चयापचय क्रिया वाढलेली असते, त्यामुळे पोषकतत्त्वांनी युक्त असाच नाश्ता घ्या.

दुपारचं जेवण योग्य प्रमाणात, तर रात्रीचं जेवण हलकं घ्या; कारण दिवस मावळेल तशी चयापचय क्रिया मंदावत जाते.

तीन मुख्य खाण्याच्या वेळांमधे ताक आणि सलाड, फळ, शहाळं, सुकामेवा, फुटाणे अशा छोट्या खाण्याचा समावेश करा. यामुळे दोन खाण्यातील अंतर कमी होईल. म्हणजेच दर दोन-तीन तासांनी खाल्लं जाईल. त्यामुळे शरीरास नियमित कॅलरीज, पोषक तत्त्वं मिळतीलच; शिवाय शरीरात चरबी साठण्याचं प्रमाण कमी होईल.

६-७ भागात खाणं विभागल्यामुळे भूक आणि खाण्याचं प्रमाण याचा ताळमेळ साधला जाईल.

रात्रीचं जेवण झोपण्यापूर्वी दोन- अडीच तास आधी करा म्हणजे ते व्यवस्थित पचेल.

प्रत्येक घास हळू व व्यवस्थित चावून खा. यामुळे अन्नाचं विघटन होऊन ते पचतं आणि योग्य प्रमाणातही घेतलं जातं; कारण पोट भरल्याचा संदेश मेंदूला मिळण्यास १५-२० मिनिटं लागतात.

खाण्याबरोबरच पाण्याच्या प्रमाणाकडेही लक्ष द्या. किमान ८-१० ग्लास पाणी प्या.

शक्य तितकं घरचं, ताजं अन्न घ्या. बाहेरच्या खाणं सतत शिजवल्यामुळे त्यातली पोषणमूल्यं कमी झालेली असतात.

शिळं अन्न शक्यतो खाऊ नका. त्यातली पोषणमूल्यं नष्ट झालेली असतात.

या सर्वांबरोबरच महत्त्वाचं म्हणजे आठवड्यातून किमान ४-५ दिवस योग्य तो व्यायाम करा.

लक्षात घ्या प्रत्येकाची आहाराची गरज वय, उंची, लिंग, शारीरिक आजार अशा वेगवेगळ्या गोष्टींवर अवलंबून असते. तरीही या छोट्या छोट्या गोष्टींचा अवलंब करून योग्य जीवनशैलीकडे पाऊल टाकण्यास नक्कीच मदत होईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हसत खेळत व्यायाम

$
0
0

नमिता जैन

क्लिनिकल एक्सरसाइज,

लाइफस्टाइल अॅण्ड वेट मॅनेजमेण्ट एक्सपर्ट

उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या आहेत. यंदा मुलांना वेगवेगळ्या शिबीरात अडकवण्याऐवजी व्यायामाची सवय लावली तर?

वाढ‌त्या वयांच्या मुलांसाठी शरीराची किमान हालचाल गरजेची असते. अगदी लहान वयापासूनच हलक्या फुलक्या व्यायामाची सवय मुलांना लावली तर त्यांच्या आरोग्यासाठी ते अतिशय उपयुक्त ठरतं. अगदी ३ वर्षांपासूनच तुम्ही मुलांना थोड्याथोड्या व्यायामाची सवय लावू शकता. व्यायाम केल्यामुळे मुलं दमतात त्यांना भूक लागते. त्यांच्या पोटात कोणत्याही सबबींशिवाय अन्न जातं आणि या सगळ्याचा परिपाक म्हणून त्यांची वाढ चांगली होते. आरोग्य उत्तम राहतं.

मुलांचे व्यायाम म्हणजे जिममध्ये जाऊन करायचे अवजड किंवा अवघड व्यायाम नव्हेत. त्यांच्यासाठी व्यायाम म्हणजे थोडीशी हालचाल. मुलांना घरात बसवून ठेवण्यापेक्षा मोकळ्या मैदानात खेळायला घेऊन जा. धावणं, उड्या मारणं, फुटबॉल किंवा चेंडूने खेळायला लावणं अशा गोष्टी तुम्ही त्यांना करायला लावू शकता. मुलांच्या शाळेतल्या विविध क्रीडामहोत्सवांसाठी प्रोत्साहन द्या. मुलं खेळासाठी करणा‍ऱ्या प्रयत्नांना दादही द्या.

सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुलांवर व्यायामाची जबरदस्ती नको. त्यांना व्यायामाचा तिटकारा येईल, असं काहीही करू नका. किंवा मोठ्यांसाठी जसं व्यायामाचं काटेकोर वेळापत्रका आखलं जातं तसं मुलांसाठी ठेऊ नका. उलट त्यांचा व्यायाम अधिक आनंददायी करण्याचा प्रयत्न करा. सोपी योगासनं, जिम्नॅस्टिक्सचं मुलांना प्रशिक्षण द्या. फुटबॉल, क्रिकेटसारखे मैदानी खेळ खेळायला लावा. या सर्वांमुळे आपल्या शरीराचा तोल कसा राखावा, खेळताना डोळे आणि हात-पायांचा योग्य समन्वय कसा राखावा, या गोष्टी मुलं आपोआप शिकतील. मुलांचं टीव्ही पाहणं, त्यांचा अभ्यास, कॉम्प्युटर वा व्हिडीओ गेम्स या सा‍ऱ्या गोष्टींतून व्यायामालाही वेळ काढा. गृहपाठ, खेळ आणि व्यायाम याचं योग्य ते वेळापत्रक बनवा.

व्यायामाचे फायदे

हाडं आणि स्नायू बळकट होतात.

शारीरिक क्षमता वाढते.

आत्मविश्वास वाढतो.

एकाग्रता साधता येते.

ताण कमी होतो.

झोप छान लागते.

आजारांची शक्यता कमी होते.

मुलांसाठी सोप्पे व्यायाम

सायकल चालवणं

कुत्र्याला फिरायला नेणं

पतंग उडवणं

पोहणं

उड्या मारणं

नाचणं

मित्र-मैत्रिणींसोबत मैदानावर खेळणं.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आरोग्याची गुरुकिल्ली

$
0
0


तुडुंब भरलेले सभागृह, अगदी खुर्च्यांच्या रागांमधल्या मोकळ्या जागेत जमिनीवर आणि स्टेजवरही ठिय्या मांडून बसलेले प्रेक्षक, आहाराविषयीच्या शंकाचे निरसन करून घेण्यासाठीची उत्सुकता अशा वातावरणात ठाण्याच्या जोशी-बेडेकर कॉलेजच्या थोरले बाजीराव पेशवे सभागृहात रंगलेल्या 'म. टा. संवाद'मध्ये आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर यांनी प्रेक्षकांशी संवाद साधला. आहार आणि आरोग्य यांविषयी लोकांच्या मनात असलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना पारंपरिक भारतीय आहाराचे महत्त्व, घरच्या जेवणाची लज्जत 'महाराष्ट्र टाइम्स'च्या यूथ आयकॉन ठरलेल्या दिवेकर यांनी पटवून सांगितली. 'जे आवडते तेच खा' असा मूलमंत्र देत चौरस आहाराचे महत्त्व पटवून दिले. करिना कपूरसारख्या अभिनेत्रीपासून ते कॉर्पोरेट जगतातील उच्चपदस्थांपर्यंत अनेकांना सल्ला देणाऱ्या आणि विक्रमी खपाची तीन पुस्तके लिहिणाऱ्या दिवेकर यांच्यासोबतच्या संवादाने अनेकांच्या प्रश्नांचे निरसन झाले.

नियोजनबद्ध आहार कोणता?

आपला भारतीय संस्कृतीतील आहार योग्य आहे. भाजी, पोळी, भात, आमटी, पोहे, उपमा हे पदार्थ अतिशय पौष्टिक आहेत. आपण आपला आहार सोडून अन्य पदार्थांचे पर्याय शोधतो. म्हणून खाद्यसंस्कृती बदलते आहे. आपले वेगळेपण आपणच जपले पाहिजे. आपल्या चौरस आहाराची किंमत आपल्यालाच समजत नाही, याची खंत आहे.

वाढलेली चरबी कशी कमी करावी?

आपल्या खाण्या-पिण्याला शिस्त असेल, तर चरबी वाढणार नाही. वाढली तरी कमी होण्यासही मदत होईल. सलग ३० मिनिटे एका जागेवर बसू नका. आपण शरीराचा पुरेसा वापर करीत नाही म्हणून चरबी वाढते. दरवर्षी अर्ध्या किंवा एक किलोने वजन वाढते. वजन वाढते, याचा अर्थ आपण आळशी होत आहोत, हे समजून घ्या. म्हणून गरज आहे ती `मूव्ह मोअर अँड सिट लेस` या मंत्राची.

कोणती फळे खावीत?

आंबा, केळे, सीताफळ, चिकू आणि द्राक्ष ही फळे प्रत्येक भारतीयाच्या आहारात आवर्जून आलीच पाहिजेत. आरोग्यासाठी केळे हे सर्वोत्तम असल्याचा दुजोरा आता जगभरातून मिळत आहे. बाळाच्या आहारातही आईच्या दुधानंतर फळांमध्ये केळ्याचाच समावेश होतो.

मधुमेहासाठी आहार कसा असावा?

खरं तर मधुमेहींनी जे पदार्थ खाल्ले पाहिजेत, तेच पदार्थ डॉक्टर टाळण्यास सांगतात. मात्र, भात, केळं आणि तुपाचा समावेश आहारात अवश्य असावा. दोन जेवणांमध्ये फार अंतर ठेऊ नये, व्यायाम भरपूर करावा आणि अगदी झोपेपर्यंत टीव्ही पाहणे टाळावे.

शुगर-फ्रीचा वापर करावा का?

शुगर फ्री आहारातून वर्ज्यच करा. आहारात जेवढी साखर आवश्यक असते, तेवढी खावी. लाडू, हलवा यासारख्या घरी बनणाऱ्या गोड पदार्थांत वापरली जाणारी साखर आरोग्यासाठी चांगली असते. ऊस आणि गूळ यांना एकमेकांशी रिप्लेस करू नये. आवश्यकतेनुसार पदार्थात साखर किंवा गुळाचा वापर करावा. शरीरातील उष्णता वाढवायला गुळाची मदत होते.

वाढतं वजन आणि ताण यांचा संबंध कसा आहे?

वाढत्या ताणामुळे वजन वाढतं. फर्गेट, फर्गिव्ह आणि फॉर्वर्ड या सूत्रानुसार जीवन जगायला सुरवात केल्यास आयुष्यातील तणाव कमी होतील.

कडधान्य कशी खावीत..

आपण उसळ करताना कडधान्य शिजवून घेतो. त्यामुळे मोड आलेली कडधान्ये कच्ची कशासाठी खायची? ती उकडून, उसळ करून खाणेच योग्य.

जेवणात कोणते तेल आणि किती वापरावे?

शेंगदाण्याचे घाण्यावरून करून आणलेले तेल स्वयंपाकासाठी सर्वोत्तम आहे. शंभर ग्रॅम शेंगदाण्याचे २५ ते ३० टक्के तेल निघते. बाकी चोथा वाया जातो. तेल बनविण्याची पारंपरिक पद्धत अतिशय शुद्ध आहे. आहारात तेल बदलण्याची गरज नसते. पिशव्या किंवा डब्यांमध्ये मिळणारे आणि हृदयाच्या आकाराचे चित्र डब्यांवर दिसणारे तेल आरोग्याला योग्य नाही. तेल जेवढे वापरावेसे वाटते, तेवढे वापरावे. लोणचे, तळलेला पापड, भजी हे पदार्थ आहारात आलेच पाहिजेत. जास्त तेल पोटात जाईल, म्हणून ते खाणे टाळू नये.

आहारातून ड जीवनसत्त्व कमी झाल्यास काय होते?

शरीरात हवे असलेले फॅट मिळत नाहीत, म्हणून ड जीवनसत्व कमी होते. वेळेवर त्यावर उपाय न केल्यास हाडे दुखतात, केस गळतात, त्वचेवर डाग पडतात. मधुमेह किंवा कॅन्सर होण्यापर्यंत ही पातळी जाऊ शकते.

आजकाल बिझी रुटीनमुळे व्यायाम करणे अनेकांना शक्य होत नाही. व्यायामाला दुसरा काही पर्याय आहे का?

आजच्या युगात आपण नवीन गाडी घेतली, तरीसुद्धा ती नियमितपणे चालवतो. बाहेरगावी गेलो, तरी शेजारी किंवा नातेवाईकांना गाडी सुरू ठेवायला सांगतो. व्यायामाचेसुद्धा तसेच आहे. व्यायामाला कोणताही पर्याय नाही, तो नियमितपणे केलाच पाहिजे. अंग दुखतं, म्हणून व्यायाम करत नाही, अशी सबब अनेक जण देतात. पण खरे तर व्यायाम करत नाही, म्हणून अंग दुखतं. व्यायाम करण्यासाठी आठवड्यात फक्त १५० मिनिटे लागतात. आठवड्याच्या व्यायामाचे नीट प्लानिंग करून ते वेळापत्रक पाळले जायला हवे. व्यायाम अनेकदा उद्यावर ढकलला जातो, त्याचं योग्य नियोजन होत नाही, त्याचं गांभीर्य लोकांच्या लक्षात येत नाही.

दोन- दोन तासाने खा, असे सांगितले जाते. हे योग्य की अयोग्य?

सकाळी उठल्या उठल्या आपण चहाने सुरुवात केली, तर दिवसभराची भूक मरते आणि दिवसभराचे रुटीन बिघडते. दोन- दोन तासाने खावे. सकाळी उठून एखादं केळ खाल्लं की, आपण नंतर नीट नाश्ता करू शकतो. सकाळी नाश्त्याला डोसा, घावन, थालीपीठ असं खावं. त्यानंतर जेवणाआधी पन्हं, कोकम सरबत यासारखं पेय घेऊन त्यानंतर आपण नियमित जेवण घेऊ शकतो. त्यानंतर मध्ये एखाद- दुसरं फळ, संध्याकाळी चार ते सहाच्या मध्ये पुन्हा सकाळच्या नाश्त्याप्रमाणे आहार घेतला की, आपल्याला रात्री फार भूक लागत नाही. मग रात्री पेज किंवा भात खावा, म्हणजे आपल्याला शांत झोप लागू शकते.

घरी केलेले चिवडा, लाडू खाण्याची योग्य वेळ कोणती?

चिवडा आणि लाडू आपण कधीही खाण्यासाठीच तयार करून ठेवतो. चिवड्यासारखी व्हर्सेटाइल गोष्ट कोणतीच नाही. चिवडा कशातही मिक्स करून खाऊ शकतो, त्यामुळे चिवडा कोणत्याही वेळी खाता येईल. लाडूसुद्धा संध्याकाळी ५-६च्या आसपास किंवा सकाळी नाश्त्यालासुद्धा लाडू चांगला.

वाढत्या वयाबरोबर कसा व्यायाम करावा ?

वयानुसार आपलं शरीर बदलतं, पण ते बिघडू देऊ नये. आपलं रुटीन नियमित फॉलो केलं पाहिजे. आठवड्याला १५० मिनिटे व्यायाम केला, तर ते कोणत्याही वयाला चालतं. वय वाढलं म्हणून व्यायाम कमी करण्याची गरज नाही.

सकाळी उठून गरम पाणी प्यायल्याने चरबी कमी होते, असा समज आहे. यात किती तथ्य आहे?

सकाळी उठल्यावर आवड म्हणून गरम पाणी पिण्यास काहीच हरकत नाही. पण त्यामुळे चरबी अजिबात कमी होत नाही. सकाळी उठल्यावर साधं, माठाचं किंवा गरम कोणतेही पाणी आपण पिऊ शकतो.

साखरेऐवजी गूळ वापरल्याने फायदा होतो का ?

प्रत्येक गोष्टीचा एक विशिष्ट गुणधर्म असतो. त्यामुळे ज्या गोष्टीत साखर वापरण्याची गरज आहे, त्यात साखर वापरली पाहिजे आणि ज्या गोष्टीत गूळ वापरण्याची गरज आहे, त्यात गूळच वापरला पाहिजे. अन्यथा पदार्थाची चव बिघडते. साखर ही चांगलीच आहे. उगाच साखरेच नाव वाईट आहे. साखरेने उष्णता कमी होते, तर गुळाने उष्णता वाढते. त्यामुळे आपण पदार्थानुसार साखर किंवा गूळ वापरावा.

तुमच्या कामाची सुरुवात कशी झाली?

मी काम साधारण १९९९ मध्ये काम सुरु केलं. त्यावेळी सामान्य माणसे फिटनेस तज्ज्ञांकडे वळत नसत. त्यावेळी लाली धवन आणि फराह यांना मी सर्वप्रथम मार्गदर्शन केलं. त्यानंतर २००३ सालापासून आपल्या अर्थव्यवस्थेत बदल झाला. अनेक लोक या शाखेकडे वळू लागले आणि मग माझं या क्षेत्रातलं नियमित काम सुरू झालं.

केस, त्वचेसाठी काय सल्ला द्याल?

केस गळण्यापासून वाचण्यासाठी तसेच तजेलदार त्वचेसाठी आहारात भात, नारळ, तूप यांचा समावेश हवा. आहारामध्ये हळदीचा समावेश असण्याची गरज आहे. हळद केसांच्या वाढीसाठी फायदेशीर आहे.

आपला दिवस कसा असतो?

मी ज्या शहरात असेन, त्यानुसार दिवस प्लॅन करते. ऋतूमानानुसार आणि स्थानिक पदार्थांना आहारात प्राधान्य देतेत. रोज सकाळी पोहे खाते. सध्या उन्हाळ्यामुळे कोकम आणि पन्हं घेते. जे आवडतं, तेच पदार्थ खाते. जे पदार्थ शरीराला लागतात, ते आवर्जून खाते. कारण, आपण जे खातो, तेच आपल्या चेहऱ्यावर दिसते.

............

महिलांचे नोकरी करण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे घरात पतीने मदत केली, तरच कुटुंबाचे आरोग्य उत्तम राखण्यास पत्नीला मदत होऊ शकते. नोकरी करून पुन्हा घरातील कामांचा डोंगर सांभाळताना महिलांची कसरत होते. त्यामुळे स्वयंपाकातील लहान कामांमध्ये मदत केल्यास कमी वेळात उत्तम स्वयंपाक तयार होण्यास निश्चित मदत होईल.

दर दोन तासांनी खा

फळ किंवा सुका मेव्याने दिवसाची सुरुवात करा

नाश्त्याला पोहे, उपमा, शिरा खा

जेवणापर्यंतच्या वेळेत सरबत घ्या

जेवणानंतर एखादे फळ खा

संध्याकाळी गूळ, तूप, पोळी किंवा फोडणीचा भात

रात्री ८.३० च्या दरम्यान हलका आहार घ्या

हलका आहार घेतल्याने झोप चांगली लागते आणि दुसऱ्या दिवशी व्यायाम करण्यास उत्साह राहतो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वयंपाकाच्या पद्धती

$
0
0

नमिता जैन

क्लिनिकल एक्सरसाइज, लाइफस्टाइल अॅण्ड वेट मॅनेजमेण्ट एक्सपर्ट

तुम्ही काय बनवता यापेक्षाही तुम्ही ते कसं बनवता याला महत्व आहे. स्वयंपाकाच्या काही पद्धती कोलेस्ट्रोल, चरबी, कॅलरी कमी करून पदार्थांची पौष्टिकता करतात. अशाच काही पद्धतींबद्दल...

वाफवून घ्या

ही एक फॅट फ्री पद्धत आहे. यात पदार्थांची नैसर्गिक चव, रंग आणि पौष्टिकता टिकून राहते. उकळत्या पाण्याच्या पातेल्यावर चाळणी ठेऊन त्यात पदार्थ वाफवले जातात. यासाठी तेल अजिबात लागत नाही. अनेक पोषक घटक यात शिल्लक राहतात कारण पाण्याचा थेट संबंध भाज्यांशी येत नाही. वाफवायच्या पाण्यात थोडे हर्ब घातले तर वेगळाच सुगंध येईल.

प्रेशर कुकरचा वापर

प्रेशर कुकरमुळे अन्न लवकर शिजतं. यात चरबी कमी प्रमाणात तयार होत असल्याने आरोग्याला उत्तम. शिजायला कमी वेळ लागत असल्याने यात पोषक घटक टिकून राहतात. या पद्धतीत घट्ट झाकणामुळे वाफ आत कोंडली जाऊन त्यातून पदार्थ शिजायला मदत होते. तापमान वाढून वाफेमुळे पदार्थ शिजतात.

उकळवा

मोठ्या गॅसवर उकळत्या पाण्यात अन्न शिजवणं ही एक पद्धत आहे. यात तेलाचा शून्य वापर होतो. पण या पद्धतीत विटामिन ब आणि क हे पाण्यात विरघळून जात असल्याने ते नष्ट होऊन जातात. यावर उपाय म्हणून आधीपासून उकळलेल्या पाण्यात भाज्या शिजवल्या तर त्या लवकर शिजतील आणि त्यातली जीवनसत्व निघून जाणार नाहीत. भाज्या शिजवलेलं पाणी फेकून देऊ नका. त्यात मोठ्या प्रमाणावर पौष्टिक घटक असल्याने त्याचा वापर सूप किंवा रस्सा बनवण्यासाठी करा.

हलकंसं तळण

या पद्धतीला सॉते असंही म्हणतात. यात मोठ्या गॅसवर अगदी कमी तेलावर पदार्थ तळले जातात. जास्त तापमान आणि सतत हलवल्या जाण्याच्या पद्धतीमुळे पदार्थ जळत किंवा चिकटत नाहीत. पदार्थ तव्यावर ठेवण्यापूर्वी तवा चांगला तापला आहे ना याची खात्री करून घ्या. तवा जास्त खोलगट नसलेला आणि मोठा असेल या अंदाजाने घ्या. पदार्थ तळल्यावर कोरडे राहतील अशाच ठिकाणी ठेवा.

भाजून घ्या

या पद्धतीत कोरड्या उष्णतेत ओव्हनमध्ये पदार्थ बनवले जातात. यात पदार्थांतील पाण्याचं रुपांतर वाफेत होऊन ओव्हन मधल्या कोरड्या हवेत ते शिजतात. या पद्धतीत भरपूर कॅलरी असलेले केक, पेस्ट्री किंवा कुकीज अशा पदार्थांचा पौष्टिक आहारात समावेश होत नाही. बेकिंगमध्ये साखर, तेल, बटर, तूप यांचा वापर टाळला तर ते आरोग्यासाठी उत्तम.

शब्दांकन : आकांक्षा मारुलकर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 2765 articles
Browse latest View live


<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>