Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 2765

दातों की बात

$
0
0

थंडी पुन्हा जाणवू लागलीय. मकरसंक्रांत तर येऊन गेली पण थंडीमुळे अनेकांच्या दातांवर मात्र पुन्हा एकदा संक्रांत येताना दिसतेय. हिवाळ्यातील वातावरणात वारंवार बदल होत असतात. हे बदल दातदुखीला आमंत्रण देत असतात. कारण दात त्या बदलाशी जुळवून घ्यायला असमर्थ ठरतात. म्हणूनच थंडीत दातांची काळजी कशाप्रकारे घ्यावी, यासाठी दंतसौंदर्य तज्ज्ञ डॉ. करिश्मा जराडी यांनी काही टिप्स दिल्या आहेत.

दातांच्या म्हणजे डेन्टीनच्या संरक्षणासाठी लावण्यात आलेले इनॅमल म्हणजे बाह्य आवरण हे हिवाळ्यात सैल होते आणि ते निघून जाण्याचीही शक्यता असते. जोरात ब्रश करणं म्हणूनच टाळावं. अति प्रमाणातील आम्लारी पदार्थ किंवा पेयांच्या सेवनामुळेही इनॅमलला धक्का बसतो. दाताने चावण्याच्या किंवा मिटण्याच्या क्रियेमुळे हा त्रास जाणवतो. हिरड्यांचा त्रास, डेन्टीनची कमतरता यामुळे दुखण्याला सुरुवात होते. हिवाळ्यात दातांचा त्रास जाणवत असेल तर दंतवैद्याकडून त्याची तपासणी करुन घ्यावी. वैद्यांच्या सल्ल्यानुसार फ्लोरिडेटेड डेन्सेन्सिटायझिंग टूथपेस्ट किंवा माऊथ रिंजच्या वापराने व्यवस्थितपणे करावा. त्यामुळे दातांच्या वेदना कमी होतात आणि ते मजबूत राहतात.

शक्यतो नाजूकपणे ब्रश करा. मऊ ब्रश वापरा. साधे दही, ताजी आणि सालं असलेली फळं खाणं उत्तम. सायट्रिक अॅसिड असलेल्या पेयांपासून दूर राहा. सोडा, शीतपेयं, संत्र्याचा रस हे प्रमाणातच घ्या. चांगलं अन्न खा. द‌विसातून ३-४वेळा ब्रश करणं शक्य नसेल तर सफरचंद खाणं उत्तम. त्यामुळे दातांबरोबर श्वाससुद्धा ताजातवाना राहतो.


Viewing all articles
Browse latest Browse all 2765

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>