Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 2765

घोटा, गुडघा, मांड्या, जांघा, कंबर व पाठीतील वेदना दूर पळवून सांध्याना मजबूती देणारं त्रिकोणासन नक्की ट्राय करा!

$
0
0


प्रांजली फडणवीस

योगामध्ये अशी बरीच आसने आहेत, जी निसर्गातील विविध वस्तू किंवा जीव यांच्या आकार रचनेवरून निर्माण झालेली आहेत. त्या प्रत्येक आसनामध्ये त्या वस्तू किंवा जीवाचे विशेष गुण आत्मसात करण्याचा प्रयत्न केला जातो, जसे वृक्षासन, ताडासन, पर्वतासन. ही सर्व आसने केल्यावर व्यक्तीच्या शरीर-मनामध्ये पर्वताप्रमाणे स्थिरता निर्माण होते. त्याच प्रकारचे पुढचे आसन म्हणजे त्रिकोणासन. ज्या आकृतीला तीन कोन, तीन भुजा आणि तीन बिंदू आहेत तो त्रिकोण. हा खाली पसरट आणि वर निमुळता होत गेलेला आकार आहे. अशाच प्रकारचा आकार त्रिकोणासनामध्ये घेतला जातो. अशा त्रिकोणासनामध्ये दोन्ही पायांमध्ये असलेली स्थिरता जास्त मजबूत केली जाते; कारण त्रिकोणासनाचा जो पाया आहे, तो आपल्या दोन्ही पावलांद्वारे स्थिर केला जाते. पायापासून निघणाऱ्या दोन भुजा म्हणजे आपले दोन्ही पाय कमरेपाशी मिळतात, तिथे त्रिकोणासनाचा तिसरा बिंदू निर्माण होतो. अशा प्रकारे निर्माण केलेला त्रिकोण हा कमरेच्या मध्यबिंदूपाशी सर्वांत स्थिर असतो. त्यामुळे हिप जॉइंट (खुब्याचा सांधा) आणि पेल्व्हिस (कमरेचा भाग) स्थिर होण्यासाठी त्रिकोणासनाचा चांगला उपयोग होतो.

(वाचा :- गॅस व अ‍ॅसिडीटीवर स्वयंपाकघरातील 'हे' ५ पदार्थ आहेत रामबाण, चुटकीसरशी दूर होईल पोटदुखी!)

कृती : दोन्ही पायांमध्ये दोन ते तीन फुटांचे अंतर घेऊन उभे राहणे. डाव्या पायाची पावलाची दिशा वळवणे. टाच शरीराच्या दिशेने आत आणि पाऊल बाहेर वळवणे. या स्थितीत डाव्या बाजूचा जांघेचा भाग, मांडीचा भाग आणि खुब्याचा भाग पूर्णपणे उघडला जातो. हळूहळू दोन्ही हात खांद्याच्या रेषेत सरळ करणे, श्वास घेणे आणि श्वास सोडत हळूहळू डावा हात डाव्या पावलाच्या मागे जमिनीवर टेकणे. उजवा हात वर छताच्या दिशेने ताणून घेणे. मान वळवून हाताकडे पाहणे.

(वाचा :- पीरियड्समधील ‘या’ चुकांमुळे वाढू शकते २ ते ३ किलो वजन, यावर उपाय काय?)

दक्षता : डाव्या बाजूला आपण झुकतो, त्या वेळेस पाठीचा कणा पावलाच्या रेषेमध्ये न राहता तो थोडा पुढच्या दिशेने वाकला जातो. अशा वेळेस छताकडे असलेला उजवा हात पाठीतून मागे वळवणे आणि त्या प्रमाणामध्ये पाठ जेवढी मागे वळवली जाईल, तेवढे हे त्रिकोणासन व्यवस्थित होते.

(वाचा :- लठ्ठपणा दूर करण्यासाठी नीता अंबानी रोज करायची 'ही' २ कामे, तुम्हीही करू शकता ट्राय!)

फायदे : त्रिकोणासनाचा उपयोग पायाचा घोटा, गुडघा आणि कंबर या तीन सांध्यांसाठी आहे. पोटरीचे स्नायू आणि मांडीचे स्नायू व्यवस्थित ताणले जातात, मोकळे होतात. त्यातील व्यंग आणि त्रास कमी होतो. डाव्या बाजूला झुकल्यानंतर उजव्या बाजूचा मांडीचा आणि जाघेंचा भाग, पोटाचा भाग उघडला जातो. त्यामुळे हर्निया, उजव्या बाजूचे अपेंडिक्स, मोठ्या आतड्याचा भाग, गर्भाशयाचा भाग, किडनी या सर्व अवयवांना सकारात्मक ताण मिळतो. तेथील रक्तसंचलन सुधारण्यास मदत होते. उजव्या बाजूचे कमरेचे स्नायू ताणले जातात, मोकळे होतात. पाठीच्या कण्याची उजवी बाजू व्यवस्थित ताणली जाते. मान आणि खांदे मोकळे होण्यासाठी हे आसन उपयुक्त आहे.

(वाचा :- जिभेवर साचलेला सफेद घाण थर असतो आजाराचं लक्षण, ‘या’ नैसर्गिक पद्धतीने करा २ मिनिटांत जीभ साफ!)

त्रिकोणासन दोन्ही बाजूंनी करावे. ज्यांना असंतुलनाचा त्रास आहे, अशा व्यक्तींनी भिंतीला टेकून त्रिकोणासन करावे. त्रिकोणासन साधारण ३० सेकंद ते एक मिनिटापर्यंत करावे. ज्यांना मानदुखीचा त्रास आहे, त्यांनी मान वळवून वर छताच्या दिशेने पाहू नये.

(वाचा :- लठ्ठपणा, पीरियड पेन, त्वचारोग अशा अनेक समस्या दूर करायला प्या धण्यांचे पाणी, शुगरही राहते नियंत्रणात!)

(लेखिका योगथेरपिस्ट आहेत.)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 2765

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>