Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 2765

मानेचे दुखणे

$
0
0

- प्रांजली फडणवीस

स्मार्टफोन पाहताना, पुस्तक वाचताना आपली मान सरळ खाली जाते; परंतु कम्प्युटरवर काम करत असताना स्क्रीनवर नजर स्थिर असल्यामुळे आपली मान खाली न जाता हनुवटीच्या दिशेने पुढे आलेली असते. त्यामुळे मानेचा एक विशिष्ट कोन तयार होतो आणि त्या स्थितीमध्ये आपण कमीत कमी चार ते सहा तास काम करत असतो. या स्थितीमुळे 'पॅरा स्पायनल मसल्स', जे 'डीप मसल्स' आहेत, ते अवघडलेल्या स्थितीमध्ये तासन् तास राहिल्यामुळे मानेचे स्नायू आखडतात. परिणामी, मान अवघडणे, मान दुखणे, खांद्यावर, पाठीवर सूज येणे, हात दुखणे, हाताला मुंग्या येणे अशा तक्रारी सुरू होतात.

अनेक तरुण-तरुणींमध्ये 'स्ट्रेटनिंग ऑफ सर्व्हायकल स्पाइन' हा विकार मोठ्या प्रमाणावर आढळतो. त्याचं एक कारण म्हणजे मानेचा एकाच स्थितीमध्ये होणारा अतिवापर. यावर उपाय म्हणजे सर्वप्रथम काम करताना मानेच्या योग्य स्थितीबाबत जागरूकता वाढवणे.

आपल्या मानदुखीचे सर्वांत महत्त्वाचे कारण म्हणजे एका स्थितीत अनेक तास बसून काम करणे. मराठीत आपण याला मान मोडून काम करणे, असेच म्हणतो! पण मग ही मानदुखी टाळण्यासाठी काय करता येईल?

- काम करताना दर अर्ध्या-एक तासानंतर आहे त्याच जागेवर मानेचे हलके व्यायाम करावेत. मानेची हालचाल करणे खूप गरजेचे आहे.

- मान डावीकडे वळवावी, हनुवटी डाव्या खांद्याच्या दिशेने वळवावी आणि ती खांद्याच्या रेषेत आणण्याचा प्रयत्न करावा. या स्थितीमध्ये पाच श्वास थांबावे; तशीच क्रिया उजव्या बाजूनेही करावी. दोन्ही बाजूंना मान वळविण्याच्या या क्रियेची तीन आवर्तने करावीत.

- डावा कान डाव्या खांद्याच्या दिशेने खाली आणावा, पाच श्वास थांबावे; तसेच उजवा कान उजव्या खांद्याच्या दिशेने खाली आणावा. दोन्ही मिळून हा प्रकार तीनदा करावा.

- 'ऑफिस चेअर'वर दोन्ही हात डोक्याच्या मागे ठेवून मान सावकाश वर उचलावी. दोन्ही हातांच्या मदतीने डोक्याचा मागचा भाग हातावर दाबावा. असे दहा वेळेस करावे.

- 'ऑफिस टेबल'वर दोन्ही हात एकमेकांत गुंफून ठेवावेत. त्यावर कपाळ टेकवावे आणि हातावर डोक्याचा कपाळाचा भाग दाबून सैल करावा. असे दहा वेळेस करावे.

(लेखिका योगथेरपिस्ट आहेत.)

---

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 2765

Latest Images

Trending Articles

<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>