Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 2765

अचानक मध्यरात्री पोटदुखी सुरु झाली तर करा हे घरगुती उपचार!

$
0
0

दैनंदिन आयुष्यात ब-याचदा आपण असे काही पदार्थ खातो जे आपल्या शरीराला मानवत नाहीत. म्हणजेच यामुळे आरोग्याला नुकसान होते किंवा ते व्यवस्थित पचत नाहीत आणि पोटदुखीचा त्रास होऊ लागतो. कुटुंबातील लोकांना किंवा तुम्ही स्वत:ही या त्रासातून गेला असालच. त्यात ही पोटदुखी नेमकी मध्यरात्री किंवा रात्रीच्या जेवणानंतर सुरु होते. पोटदुखी ही अनेक गंभीर आजारांची सुरुवातही असू शकते म्हणूनच यावर वेळेत उपचार करणं आवश्यक असतं. आज आपण अशाच एका उपायबाबत जाणून घेणार आहोत ज्यामुळे या समस्येवर सहजपणे मात करता येऊ शकते.


काय असतं याचं कारण?

या घरगुती उपायाबाबत जाणून घेण्याआधी तुम्हाला हे माहित करुन घेणं गरजेचं आहे की या पोटदुखीमागे नेमकं काय कारण असतं? काही प्रकरणांमध्ये तुम्हाला वैद्यकिय मदत घ्यावी लागेल. याव्यतिरिक्त पोटदुखीची समस्या बद्धकोष्ठता, पचनक्रिया व्यवस्थित न झाल्याने आणि कधी कधी छातीत जळजळ झाल्यानेही होऊ शकते. जर अशी सामान्य लक्षणे तुम्हालाही दिसून येत असतील तर तुम्ही खाली दिलेले उपाय ट्राय करु शकता.


पोटदुखीचा घरगुती उपचार

पोटदुखीची समस्या दूर करण्यासाठी तुम्हाला घरात उपलब्ध असलेल्या सामग्रीचाच वापर करावा लागेल.

  • सामग्री

१ चमचा बारीक केलेले आले

१ चमचा चहापावडर

१ चमचा मध

१ चमचा लिंबू रस


  • बनवण्याची कृती

सर्वात आधी २ ग्लास पाणी घेऊन ते उकळवायला ठेवा

पाणी उकळू लागलं की त्यात आल्याचे तुकडे आणि चहापावडर टाका आणि ५ मिनिटे चांगले उकळू द्या

नंतर त्यात मध टाकून एक मिनिटांनंतर गॅसवरुन उतरवून ते थंड होण्यासाठी ठेवून द्या

हे द्रव्य एका ग्लासमध्ये घेऊन त्यात लिंबूचा रस मिसळून त्याचे सेवन करा

तुम्ही हे दिवसातून दोन ते तीन वेळा पिऊ शकता

पण एक गोष्ट लक्षात ठेवा की जर तुम्हाला कोणता गंभीर आजार असेल तर वेळ न दवडता डॉक्टरकडे जाऊन योग्य उपचार घ्या.


या द्रव्याचा काय होतो फायदा?

नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नोलॉजी इन्फॉर्मेशन अनुसार आलं आणि मधात अस काही खास गुणधर्म असतात जे पोटदुखीच्या समस्येवर रामबाण ठरतात. तसेच वैज्ञानिक रिसर्चमध्येही ही गोष्ट सिद्ध झाली आहे की आलं आणि मध एकत्रित प्यायल्यास पोटाच्या विकार दूर होतात. त्यामुळे जर तुम्हाला मध्यरात्री पोटदुखीचा त्रास होऊ लागला तर तुम्ही हे उपाय नक्की ट्राय करु शकता.

(वाचा :- मध आणि लिंबूचे एकत्रित सेवन केल्यास...)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 2765

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>