Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 2765

शरीराला येणारी खाज चुटकीसरशी दूर करतील हे घरगुती उपचार!

$
0
0

तुम्ही निरिक्षण केलं असेल तर बहुतांश लोकांची त्वचा ही मुळातच कोरडी आणि रुक्ष असते. त्वचा रुक्ष असल्यामुळे अशा लोकांना सतत अंगाला खाज सुटण्याची समस्या निर्माण होते. यासोबतच दुषित पाणी आणि औषधांचं सेवन केल्यानेही त्वचेवर खाज येऊ शकते. याव्यतिरिक्त शारीरिक स्वच्छता न राखणं हे देखील खाजेचं मोठं कारण बनू शकतं. या समस्येपासून कायमची मुक्ती मिळवून देण्यासाठी आम्ही आज तुम्हाला असा एक उपाय सांगणार आहोत जो तुम्ही घरात बसून पूर्ण करु शकता. या उपायामुळे तुम्हाला कोणताही साईड इफेक्टस अथवा अॅलर्जी होणार नाही. म्हणूनच तुम्हालाही त्वचेच्या या समस्येपासून सुटका मिळवायची असेल तर आजच ट्राय करा हा उपाय!


अंघोळीच्या पाण्यात मिसळा या २ गोष्टी

कधी कधी दुषित पाणी हे त्वचेच्या खाजेमागील सर्वात मोठे कारण असल्यामुळे तुम्हाला अंघोळीच्या पाण्याची जास्त काळजी घ्यावी लागेल. हा घरगुती उपाय करण्याआधी तुम्हाला या गोष्टीची खात्री केली पाहिजे की ते पाणी स्वच्छ आणि कोणताही कचरा नसलेलं आहे. त्यानंतर या अंघोळीच्या पाण्यात आपल्याला एक चमचा बेकिंग सोडा आणि २ ते ३ चमचे लिंबूचा रस मिसळावा. ही सामग्री तुम्हाला स्वयंपाकघरात सहज उपलब्ध होईल.


खाज दूर करण्यास हा उपाय कसा आहे रामबाण?

नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नोलॉजी इन्फॉर्मेशन अनुसार लिंबू आणि बेकिंग सोडा या दोन्ही गोष्टींमध्ये त्वचा मऊशार (Soothing Effect) करण्याचे गुणधर्म आढळून येतात. त्यासोबतच लिंबू आणि बेकिंग सोडा त्वचेवरील जळजळ आणि खाज दूर करण्यासाठी आवश्यक असणारे घटक शरीरात निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. पण हा घरगुती रामबाण उपचार फक्त शरीरावरील खाज कमी करण्यासाठीच वापरला जातो. त्यामुळे जर तुम्हाला त्वचेचा कोणता अन्य गंभीर आजार असेल तर तातडीने डॉक्टरांचा सल्ला व औषधे घेणे उत्तम!

(वाचा :- करोनापासूनच्या बचावासाठी करताय घरगुती उपचारांचा अतिरेक? मग हे आजार घालतील विळखा!)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 2765

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>