Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 2765

Health Care शरीराच्या वाढीसाठी प्रथिनं उपयुक्त, आहारात या ६ गोष्टींचा करा समावेश

$
0
0

मुंबई टाइम्स टीम
'उत्तम आरोग्य हाच खरा दागिना' असं म्हणतात. आरोग्य सुदृढ राहण्यासाठी आपण प्रयत्नशील असतो. अनेकजण नियमित व्यायाम, योग्य खाद्यपदार्थांचं सेवन यांसारख्या गोष्टींचा अवलंब करून आरोग्य निरोगी ठेवण्याचा प्रयत्न करतात. पण, बहुतांश व्यक्तींकडून सुदृढ शरीरासाठी अत्यावश्यक असलेल्या प्रथिन (प्रोटीन) या घटकाचं योग्य प्रमाणात सेवन केलं जात नाही, असं एका अभ्यासातून सिद्ध झाले आहे. प्रथिनांचं महत्त्वं, कोणकोणत्या पदार्थांतून आपल्याला प्रथिनं मिळू शकतील याबाबत आजच्या लेखातून माहिती जाणून घेऊया.

(घरामध्येच भाजीपाल्याची लागवड करायचीय? जाणून घ्या सोप्या आणि फायदेशीर टिप्स)

प्रथिनं महत्त्वाचीच

प्रथिनं पचायला अत्यंत जड असतात, प्रथिनांमुळे वजन वाढतं यांसारख्या विविध गैरसमजांमुळे अनेकजण आपल्या आहारात प्रथिनांचं योग्य प्रमाणात सेवन करताना दिसत नाहीत. पण, प्रथिनं हा घटक आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. प्रथिनं हा शरीराच्या वाढीसाठी अत्यावश्यक घटक आहे. प्रथिनांच्या योग्य सेवनामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते, असं आहारतज्ज्ञ सांगतात. तज्ज्ञांच्या मते, प्रौढांसाठी प्रति किलोग्रॅम वजनाला साधारणपणे एक ग्रॅम प्रथिनं या प्रमाणात दररोज प्रथिनांचं सेवन केलं गेलं पाहिजे, तर मुलांमध्ये हे प्रमाण एक ग्रॅमपेक्षा किंचित जास्त असावं.
(कोलेस्ट्रॉल आणि उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवायचंय? या घरगुती पेयाचे करा सेवन)

काही जिन्नस आणि त्यातील प्रथिनांचं प्रमाण
१. चीज- २४.१ ग्रॅम (प्रती शंभर ग्रॅम)
२. पनीर- १८.३ ग्रॅम
३. पिनट बटर- २५ ग्रॅम
(करोनाला दूर ठेवायचंय? नाश्त्यामध्ये या पौष्टिक पदार्थांचं करा सेवन)
४. सोया- ३.३ ग्रॅम
५. ओट्स- १३.६ ग्रॅम
६. बाजरी- ११ ग्रॅम
(अति प्रमाणात गोड पदार्थ खाताय? आरोग्याचं होऊ शकते नुकसान)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 2765

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>