Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 2765

स्नायू ताठरलेत?

$
0
0

मुंबई टाइम्स टीम

वर्क फ्रॉम होम आणि इतर गोष्टींमुळे लोकांच्या जीवनशैलीत कमालीचा बदल झाला आहे. शिवाय शारीरिक हालचालीतही घट झाली आहे. चुकीच्या पद्धतीनं बसणं-उठणं, एका जागी फार काळ बसून राहणं यामुळे स्नायू ताठरले असतील. लॉकडाउनमध्ये बऱ्याच लोकांना स्नायू आखडणं, त्यांना सूज येणं यांसारख्या समस्यांना तोंड द्यावं लागत आहे. त्यामुळे स्नायूमध्ये लवचीकता आणि बळकटी आणण्यासाठी काही सोपे व्यायामप्रकार करु शकता.

० स्ट्रेचिंग-स्ट्रेचिंग

व्यायामामध्ये स्ट्रेचिंगला खूप महत्त्व आहे. स्ट्रेचिंगमुळे स्नायूंमधील ताठरपणा दूर होऊन त्यांना बळकटी मिळते. जो अवयवर स्ट्रेच करायचा आहे तो पटकन न ताणता हळूहळू क्रिया करा. सांधे आणि स्नायू यांवर समप्रमाणात ताण येईल असं स्ट्रेचिंग करा.

० फिट राहा

कार्डिओ व्यायाम, पोहणं, चालणं, योगसाधना हे प्रकार हृदयाला फिट ठेवण्यासाठी उत्तम पर्याय आहेत. योगामध्ये कोब्रा स्ट्रेच, मार्जरी आसन आणि बितीलासन करा. तुमच्या शरीरयष्टीनुसार व्यायामप्रकारांची निवड करा.

० स्नायू लवचीक राहण्यासाठी

संपूर्ण शरीराची एकत्रितरित्या हालचाल होईल, असे व्यायाम करा. यामुळे तुमच्या शरीराचा प्रत्येक स्नायूला लवचीकता येईल. योग्य पद्धतीनं केलेल्या स्ट्रेचिंगमुळे तुम्ही स्नायूंचा ताठरपणा दूर करू शकता. तुमच्या स्नायूंना इजा होईल असे व्यायाम करणं टाळा.

००००

चौरस आहार महत्त्वाचा

आरोग्याची घडी उत्तम राहण्यासाठी व्यायामासोबत आहारावर लक्ष देणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. व्यायामानंतर प्रथिनंयुक्त पदार्थांचं सेवन करा. प्रथिनं आणि क जीवनसत्वामुळे हाडांसंबंधी समस्या दूर राहते. शिवाय अस्थिबंधांना देखील बळकटी मिळते; जेणेकरून स्नायू ताठरण्याचा त्रास उद्भवणार नाही.

संकलन- तेजल निकाळजे, साठ्ये कॉलेज

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 2765

Trending Articles