Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 2765

प्रथिनांचा उत्तम स्रोत

$
0
0

कडधान्यं का?सध्या 'करोना'शी दोन हात करण्यासाठी रोगप्रतिकारशक्ती वाढवणं गरजेचं आहे. त्यासाठी कडधान्यं मदत करतात. तसंच, पचनक्रिया सुरळीत पार पडण्यासाठी ज्या रसायनांची गरज असते ती मोड आलेल्या कडधान्यांतून मिळतात, शिवाय कॅलरी कमी असल्यामुळे डाएट करणाऱ्यांना याचा फायदा होतो. फायदे काय?अ, ब, क आणि ई जीवनसत्त्वाचा स्रोतसहज पचनकॅलरींचं कमी प्रमाण प्रथिनांचा स्रोतपोटॅशिअम, कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, लोह आणि झिंक याचा योग्य प्रमाणात समावेशमोड कसे आणावेत?तुम्हाला आवडत असलेलं किंवा मिक्स कडधान्य स्वच्छ धुवून घ्या, नंतर किमान आठ तास भिजत घाला. त्यातील पाणी काढून घ्या आणि सुती कापडात बांधून ठेवा. व्यवस्थित मोड आल्यावर निवडून त्याचा वापर करा.पर्याय काय?मोड आलेली कडधान्यं शिजवून नुसतीही खाऊ शकता. लिंबाचा रस, कांदा-टोमॅटो-कोथिंबीर किंवा शेव घालून चवीष्ट सॅलेड किंवा चाटही तयार होऊ शकते. तसंच, सूप, सँडविच, स्टू किंवा इतर पदार्थांमध्येही त्याचा समावेश करू शकता.अॅलर्जी असेल तर...मोड आलेल्या कडधान्यांमुळे अॅलर्जी येण्याचं प्रमाण कमी आहे; पण एखाद्याला अॅलर्जी आल्यास त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. फ्रेश असतं बेस्टमोड आलेली ताजी कडधान्यं खावीत. मोड कोरडे पडले असतील, तर ते खाऊ नये. त्यामुळे अपाय होण्याची शक्यता असते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 2765

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>