Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 2765

टाळा त्वचेचं नुकसान!

$
0
0

मुंबई टाइम्स टीम

व्यायामामुळे आपली त्वचा तजेलदार होते. पण जर तो योग्य पद्धतीने केला गेला नाही तर त्याचे सर्वाधिक तोटे तुमच्या त्वचेला भोगावे लागू शकतात. व्यायाम करण्याची चुकीची पद्धत तुमच्या त्वचेला नुकसान कसं पोहोचवते, ते जाणून घेऊ या...

व्यायाम करताना मेकअप असणं

व्यायाम करत असताना आपल्या शरीरावरील बारीक छिद्रं खुलतात, ज्याद्वारे घाम शरीराच्या बाहेर जातो. अशा वेळी तुमच्या चेहऱ्यावर मेकअप असेल तर घाम आणि मेकअप एकत्र मिसळून ती छिद्र बंद होऊ शकतात. जे पुटकुळ्या येण्यासाठी कारण ठरू शकतात. त्यामुळे व्यायाम सुरु करण्याआधी चेहरा स्वच्छ धुवा.

टॉवेल न घेऊन जाणं

व्यायाम केल्यानं त्वचेवरील बारीक छिद्र खुलतात, ज्यामुळे त्वचासंसर्ग होण्याचा धोका जास्त असतो. अशा परिस्थितीत दुसऱ्या व्यक्तीने वापरलेल्या जिममधील वस्तू तुमच्या वापरात आल्या तर तुम्हाला त्यामुळे त्वचा संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे जिमला जाताना कायम स्वतःचा टॉवेल सोबत घेऊन जा आणि वेळोवेळी घाम पुसत राहा. तसंच कायम तुमचे केस चेहऱ्यापासून लांब ठेवा किंवा वर बांधा.

पाणी कमी पिणं

जिम करताना घामावाटे शरीरातील पाणी बाहेर पडतं. त्यामुळे तुम्ही सारखं पाणी पिणं गरजेचं आहे. जेणेकरुन शरीरातील पाण्याचं प्रमाण वाढेल. भरपूर पाणी प्या जेणेकरून तुमच्या त्वचेचा मुलायमपणा कायम राहील. जर तुम्ही पाणी पित नसाल तर व्यायामानंतर तुमची त्वचा तजेलदार दिसणार नाही.

व्यायाम-डाएटमधील समतोल

व्यायामानंतर पोषणयुक्त आहार घेणं अत्यंत आवश्यक आहे. तुम्ही जर व्यवस्थित डाएट पाळत नसाल तर तुमची त्वचा तजेलदार दिसणार नाही. हे टाळण्यासाठी खूप वेळ उपाशी राहणं टाळा. व्यायाम झाल्यानंतर लगेच प्रथिनयुक्त द्रव्य पदार्थाचं सेवन करा. तसंच व्यायामानंतर तासाभराच्या आत पोषणयुक्त आहार घ्या.

घामाचे कपडे नकोच!

व्यायाम केल्यांनतर लगेच आंघोळ करा आणि स्वच्छ धुतलेले कपडे परिधान करा. जर तुम्ही व्यायामानंतर लगेच आंघोळ केली नाही तर शरीरावर घाम तसाच राहील. ज्यामुळे तुमची त्वचा श्वास घेऊ शकणार नाही. परिणामी, खाज सुटणं, फोड येणं, पुरळ उठणं यासारख्या समस्या उद्भवू शकतात.

शब्दांकन- तेजल निकाळजे, साठ्ये कॉलेज

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 2765

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>