Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 2765

त्वचा ठेवा निरोगी

$
0
0

मासिक पाळीच्या काळात शरीरात बरेच जनुकीय बदल होतात. त्यामुळे अनेक महिलांच्या चेहऱ्यावर तारूण्यपिटिका येतात. डाग पडतात. सुरकुत्या येतात किंवा चेहऱ्यावर वांगही येतात. त्यामुळे या काळात त्वचेची जास्त काळजी घेणे गरजेचे असते. त्वचा आरोग्यदायी आणि सुंदर ठेवण्यासाठी विशेष लक्ष द्यावे लागते. आरोग्यदायी त्वचेसाठी काय करावे, हे या काळात जाणून घेणे गरजेचे आहे. 'फेसवॉश'चा वापर पाळीच्या काळात जनुकीय बदल झाल्यामुळे चेहऱ्यावर तारूण्यपिटिका येण्याचा धोका जास्त असतो. त्यासाठी चेहऱ्याला 'फेसवॉश'ने स्वच्छ करत राहावे. असे केल्याने सततच्या 'इन्फेक्शन'पासून बचाव होतो. घाम पुसण्यासाठी टिश्यू पेपरचा वापर करावा. त्यामुळे चेहरा स्वच्छ राहिल. तारूण्यपिटिका येणार नाहीत. आधीच करा फेशिअल महिन्याची 'ती' तारीख येण्यापूर्वी त्वचेची रोमछिद्रातील मळ स्वच्छ करण्यासाठी प्रयत्न करावा. यासाठी फेशिअल सर्वांत चांगला पर्याय आहे. महिन्याची तारीख येण्याच्या दहा ते १२ दिवसांपूर्वीच फेशिअल करणे योग्य ठरते. त्यामुळे त्वचा दुष्परिणामांपासून वाचू शकते. मेकअप टाळा मासिक पाळीच्या काळात मेकअप करणे टाळावे. जितका कमी मेकअप कराल, तितके अधिक चांगले. त्वचा त्यामुळे आरोग्यदायी राहिल. मेकअपऐवजी नैसर्गिक पर्याय निवडावा. बेसन, मध आणि लिंबाचे मिश्रण करुन चेहऱ्याला लावावे. सोबत फळांच्या सालीपासून बनविलेला 'होममेड' मास्क वापरावा. तो त्वचेला चमक देईल. आहारावर लक्ष ठेवा 'त्या' दिवसांमध्ये त्वचेला सुंदर ठेवण्यासाठी ओमेगा-३ फॅटीअॅसिड आणि व्हिटामिन-ई युक्त आहाराचे सेवन केले पाहिजे. अशा आहारामुळे त्वचा मुलायम होते. तारुण्य खुलते. फ्लॅक्स सीड्‌स, मासे, तेल, सुकामेवा घ्यावा. यात अॅण्टी ऑक्सिडेंटचे प्रमाणात अधिक असते. आठ तास झोप घ्यावी. सोबत व्यायाम करावा. त्यातून त्वचेच्या समस्या सुटतील. भरपूर पाणी प्या त्वचेला 'हाइड्रेट' ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्यावे. त्यामुळे त्वचा चमकदार राहते. गुलाबजलचा 'फेसटोनर' म्हणून वापर करणेही फायदेशीर ठरेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 2765

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>