विनाकारण सतत भूक लागते, असं वाटल्यास अधूनमधून घोटघोट पाणी पिता येईल. सर्व प्रकारच्या भाज्या पोटात जाणं आवश्यक आहे. सुरुवात आवडीच्या भाजीनं करा आणि मग हळूहळू गड सर करत चला.
चार आठवड्यांचा फूड प्लॅन
या प्लॅनमध्ये दर आठवड्यात आहारात एक नवीन बदल करायचा आहे. दुसऱ्या आठवड्यात पहिला बदल कायम ठेवून नवीन बदल स्वीकारायचा आहे. म्हणजे हा प्लॅन पूर्ण झाल्यावर चार स्मार्ट आणि पौष्टिक सवयी अंगवळणी पडतील...
l दररोज फळं खायची. आठवड्याभरात किमान चार वेगवेगळी फळं पोटात जायला हवीत. सफरचंद, संत्री प्रवासात घेऊन जाणं सोयीचं ठरतं
l शीतपेयांना रामराम ठोका. नारळ पाणी, साधं पाणी, औषधी चहा यांना प्राधान्य द्या. पदार्थ तळण्याऐवजी वाफावून किंवा बेक करून घ्या. उदा. चिप्सच्याऐवजी फॅट फ्री पॉपकॉर्न खाण्यास पसंती द्या.
l रात्रीच्या जेवणाआधी सूप घ्या किंवा सॅलड खा. मग थोडं कमी जेवलात तरीही चालेल.
l शक्य तितके पौष्टिक पदार्थ आहारात सामील करा. छोटे बदलही खूप सकारात्मक फरक पाडू शकतात. उदा. व्हाइट ब्रेड ऐवजी ब्राऊन ब्रेड खाणं.
व्यायामाला पर्याय नाही!
l आरशात स्वतःकडे बघितल्यावर छान वाटायला हवं असेल तर स्वतःची काळजी घ्यायला हवी. थोडा व्यायाम करणंही गरजेचं आहे. शारीरिक हालचालींमुळे सगळा ताण कंटाळा पळून जातो. व्यायाम केल्यामुळे तग धरून राहण्याची क्षमता वाढते आणि मग जीवन जगताना एक वेगळीच मजा येऊ लागते.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट