Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 2765

सेल्फीने क्रेझी किया रे!

$
0
0


डॉ. सागर मुंदडा, एमबीबीएस, एमडी, मेंदू-मनोविकार व व्यसनमुक्तीतज्ज्ञ

पाच वर्षांपूर्वी गुगल, फेसबुक, इंस्टाग्राम या गोष्टींना स्वत:पासून लांब ठेवणारी मंडळी आता याच्याशिवाय जगूच शकत नाहीत. अगदी बाळाचं नाव ठरवण्यापासून त्याला कोणत्या कॉलेजमध्ये घालायचं हे सर्रास गुगल केलं जातं. जगात आताच्या घडीला काय चालू आहे? एका चुटकीसरशी कळतं. एवढंच काय तर तंत्रज्ञानाच्या अद्भूत किमयेने मानवी आयुष्य खूप सुखकर झालं आहे. यामुळे संवादाची दरीही कमी झाली आहे. पूर्वी परदेशी स्थिरावलेल्या आपल्या नातेवाईकाला फोन करणं फार खर्चिक ठरे. पण आता आधुनिक तंत्रज्ञानाने व्हिडीओ कॉलिंग करण्याचीही सोय उपलब्ध झाली आहे. आज तंत्रज्ञान आपल्या एवढं जवळ आलं आहे आणि आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे. हे जसे तंत्रज्ञानाचे फायदे अधिक प्रभावी असले तरी त्याचे परिणामही तेवढेच गंभीर आहेत. तंत्रज्ञानाच्या परिणामांची माहिती आपण आजच्या लेखातून घेऊयात.

l सेल्फीटीस
जवळच्या मित्राला खूप दिवसांनी भेटलो की काढ सेल्फी..छानसा ड्रेस घातला की काढ सेल्फी..असं हे सेल्फीचं वेड आज सगळ्यांना लागलं आहे. दोन वर्षांपूर्वी आलेल्या या सेल्फीच्या तंत्राने सगळ्यांना भुरळ घातली आहे. याला भरीस भर म्हणून दिवसागणिक विविध फिचर्ससह बाजारात येणारे स्मार्टफोन. या सेल्फीच्या हौशीचं रुपांतर सवयीमध्ये आणि त्याचं रुपांतर व्यसनामध्ये झालं आहे. एखादा फर्स्ट क्लास सेल्फी मिळवण्यासाठी इमारतीच्या गच्चीच्या टोकावरुन सेल्फी काढणं, समुद्र किनाऱ्यावरील अतिधोकादायक ठिकाणी सेल्फी काढणं, असे गैरप्रकार घडू लागले आहेत. फेसबुकवर जास्तीत जास्त लाइक मिळवण्यासाठी असे सगळे प्रकार केले जातात. शिवाय याला अंहकाराचीही झालर दिली जाते. अशी चुकीची पावलं न उचलता स्वत:वर काही बंधन घालून घेणं हेच योग्य होय.

l डिजिटल एमेंशिया
पूर्वी कुटुंब सदस्यांचे फोन नंबर आपल्याला अगदी पाठ असत. किंवा एखाद्या डायरीमध्ये त्याची नोंद केली जाई. कालांतराने त्याची जागा गुगलने घेतली. तंत्रज्ञानावर डोळे झाकून विश्वास ठेवून आपल्या बुद्धीला ताण कमी देऊ लागलो. आपल्या कोणत्या समस्येवर उपाय हवे असतील तर आपण लगेच गुगल करतो. एवढंच काय तर आपल्याला काही त्रास होत असेल तर ती लक्षणं आपण लगेच गुगल करतो आणि स्वत:च डॉक्टर आहोत या भ्रमात गुगलवर सांगितल्याप्रमाणे औषध घेऊन मोकळे होतो. याचे परिणाम अर्थात भोगावे लागतातच. परिणामी, क्षुल्लक गोष्टीसाठी गुगल करु लागल्याने आपण नवीन काही शिकण्यापेक्षा आपल्याकडे आहे त्या ज्ञानाचा आपल्याला विसर पडू लागला आहे. यालाच डिजिटल एमेंशिया असं म्हणतात.
संकलन-शब्दुली कुलकर्णी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 2765

Latest Images

Trending Articles

<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>