Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 2765

'वर्क फ्रॉम होम' ठरू शकतं निद्रानाशाला आमंत्रण

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । जिनिव्हा

जमाना 'वर्क फ्रॉम होम'चा आहे!... हे वाक्य हल्ली भारतातही सर्रास ऐकू येतं. ट्र‌ॅफिकच्या कटकटीतून आणि लोकलच्या लटकंतीतून कार्यालय गाठण्यासाठी होणारी धावपळ टाळण्यासाठी अनेक कर्मचारी वरिष्ठांच्या संमतीनं 'घरबसल्या काम' करू लागलेत. पण दगदग, धावपळ टाळणारी ही संकल्पना वरकरणी आकर्षक वाटत असली तरी ती जास्त धोकादायक ठरू शकते. घरबसल्या काम करणाऱ्यांना निद्रानाशाचा आजार होऊ शकतो, असा निष्कर्ष संयुक्त राष्ट्रसंघाच्या अभ्यासातून पुढं आला आहे.

संयुक्त राष्ट्रसंघाची 'इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन' व युरोफंड या संस्थांनी संयुक्तपणे या संदर्भातील अहवाल तयार केला आहे. युरोपीयन महासंघातील दहा सदस्य देशांसह अर्जेंटिना, ब्राझील, भारत, जपान व अमेरिका अशा १५ देशांत त्यासाठी एक सर्वेक्षण करण्यात आलं. प्रत्यक्ष कर्मचारी व सामाजिक तज्ज्ञांच्या मुलाखती घेऊन 'वर्क फ्रॉम होम'बद्दल त्यांची मतं आजमावण्यात आली. त्यातून काही धक्कादायक निष्कर्ष पुढं आले. हल्ली स्मार्टफोन, लॅपटॉपसह संवादाची अनेक माध्यमं लोकांच्या हातात आली आहेत. या आधुनिक माध्यमांमुळं कार्यालयीन काम आणि खासगी आयुष्यात ताळमेळ ठेवणं सोपं झाल्याचं अहवालात नमूद करण्यात आलं आहे. मात्र, घरबसल्या काम केल्यामुळं कामाचे तास वाढून अतिताण व झोप न लागण्याच्या समस्या निर्माण होत असल्याचं आढळून आलं आहे. टेलिवर्किंगमुळं काम आणि खासगी आयुष्यातील सीमारेषाच पुसली गेली आहे. घरातच असल्यामुळं साहजिकच लोक जास्त काम करू लागलेत. त्याचा परिणाम त्यांच्या प्रकृतीवर होऊ लागला आहे, असं अहवालात नमूद करण्यात आलंय.

'वर्क फ्रॉम होम'मुळं निर्माण होणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी 'पार्ट-टाइम होम' आणि 'पार्ट टाइम ऑफिस' अशी एक शिफारस संयुक्त राष्ट्रसंघाच्या अहवालात करण्यात आली आहे. जेणेकरून कर्मचाऱ्यांना कार्यालयातील सहकाऱ्यांशी योग्य समन्वय राखता येईल व त्यांच्या आरोग्याच्या समस्याही उद्भवणार नाहीत, असं मत अहवालात मांडण्यात आलं आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 2765

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>