हिवाळ्याचे दिवस आल्यानंतर बाजारात विविध प्रकारच्या चिक्की विक्रीसाठी येतात. तीळ आणि गुळाची चिक्की, याशिवाय दाणे आणि गुळाची चिक्की आवडीनं खाल्ली जाते. ड्रायफ्रुट्स असलेली चिक्कीही मिळते. याचा स्वाद चांगला असतोच, शिवाय आरोग्याच्या दृष्टीनंही ही चिक्की लाभदायी ठरते. हिवाळ्याच्या दिवसांत मिळणाऱ्या चिक्कीत लोह, व्हिटॅमिन, मिनरल आणि अँटीऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणावर असतात, त्यामुळे चिक्की तुम्हाला अनेक रोगांपासून वाचवू शकते. एकंदरितच चिक्कीमुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यात मदत होते. त्याचे आणखी फायदे...
ऊर्जेचा चांगला स्रोत
रक्तातील कोलेस्ट्रॉल कमी करेल.
रक्तातील लिपिड प्रोफाइल चांगलं राखण्यास मदत.
स्ट्रोकपासून करणार बचाव.
रक्ताचं शुद्धीकरण. लोह भरपूर असल्यानं हिमोग्लोबिन वाढवण्यास मदत.
शरीराचं वजन नियंत्रित करण्यासाठी लाभदायक.
अँटी अॅलर्जी गुणानं भरपूर.
रक्त कोशिकांचं रक्षण करून वय वाढण्यापासून रोखण्यास उपयोगी.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट