Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 2765

हायपोथायराईडिझम आणि योगोपचार

$
0
0

डॉ. वैशाली तौर, औरंगाबाद

अाजकाल थायरॉइड ग्रंथीचे आजार इतके सर्वसामान्य झालेत की प्रत्येक १० जणांमध्ये ६-७ जणांना हे आजार होतात. सर्वजण रूग्ण मला थायरॉइड झालाय, असे म्हणत असल्याचे आपण नेहमी ऐकतो, परंतु थायरॉइड झालाय म्हणजे नेमक काय हे त्यांना माहिती नसते. आपल्या शरिरात अंतस्त्रावी ग्रंथी असतात. थायरॉइड ग्रंथी ही त्यापैकीच एक अत्यंत महत्त्वाची ग्रंथी. आपल्या शरीरात श्वासनलिकेच्या वर आणि स्वरयंत्राच्या दोन्ही उजव्या डाव्या भागात फुलपाखराच्या आकाराची थायरॉइड ग्रंथी असते. मेंदूत स्थित असलेली पिट्युटरी ग्रंथी TSH हार्मोनच्या माध्यमातून थायरॉइड ग्रंथीला थायरॉइड हार्मोन्स बनविण्याचे आदेश देते. त्यानुसार ही ग्रंथी दोन प्रकारचे हार्मोन तयार करते. एकाला T3 (triodothyronine) आणि दुसऱ्याला T4 (Thyroxine) म्हणतात. हे दोन हार्मोन्स शरीरातील चयापचय क्रियेसाठी अत्यंत महत्त्वाचे असतात. शरीरात उर्जा निर्माण करणे त्यांचे विनिमय करून आपले काम करायला इतर अवयवांना मदत करणे तसेच शरीराच उष्णता नियंत्रण करणे हे या हार्मोन्सचे काम. श‌रीरात काही कारणांमुळे थायरॉइड हार्मोन्स कमी पडणे म्हणजे हायपोथायरॉइडिझम होय.

पुरुषांच्या तुलनेत महिलांना शारीरिक आणि मानसिक ताण तणावांचा सामना जास्त प्रमाणत करावा लागतो. धावपळीची जीवनशैली आत्मसात करणाऱ्या महिलांमध्ये हायपोथायरॉइड‌िझम ही सर्वसामान्य गोष्ट बनलीय. १०० रुग्णांमध्ये ८० रूग्ण या महिला असतात.

कारणे : पिट्युटरी ग्रंथीत गडबड झाली तर TSH योग्यत्या प्रमाणात निर्माण होत नाही, आयोडिनची कमतरता, आनुवांशिकता, जन्मजात हा आजार असू शकतो. अत्यंत ताण-तणावाची जीवनशैली, काही कारणास्तव ऑपरेशन करून थायरॉइड ग्रंथीचा काही भाग किंवा पूर्ण ग्रंथी काढून टाकली असेल तर, तसेच हृदयरोग, मानसिक गरोग आणि कर्करोगात वापरण्यात येणाऱ्या काही औषधींच्या दुष्परिणामामुळे हा आजार होऊ शकतो. गरोदरपणात तसेच रजोनिवृत्तीच्यावेळी हा आजार होऊ शकतो.

दुष्परिणाम : या आजाराचा वेळीच उपचार केला नाही तर हृदयरोग, सांधे दुखणे, वजन वाढणे, वंध्यत्व, गर्भपात होणे, रूग्ण कोमात जाणे यासारखे गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात.

लक्षणे : थकवा, नैराश्य, एनर्जी किंवा उत्साहाचा अभाव, चिडचिडेपणा, हृदयाची गती कमी होणे, थांडी सहन न होने, अवाजवी व सतत वजन वाढणे, कोरडी त्वचा, चेहरा सुजणे, सांधेदुखी, स्नायू दुखणे, आखडणे, कोलेस्टेरॉलची पातळी वाढणे, नख आणि केस ढिसूळ होणे, मासिक पाळी संदर्भात त्रास, जसे वेळेवर न येणे किंवा जास्त रक्तस्त्राव होणे, प्रचंड झोप येणे, मलबद्धता इत्यादी. अर्थात प्रत्येक रूग्णामध्ये सगळी लक्षणे दिसतीलच असं नाही आणि वरची लक्षणे असलेला प्रत्येक माणूस हायपोथायरॉइडचा रूग्ण असेलच असे नाही, परंतु यातली एक किंवा अनेक लक्षणे सातत्याने दिसत असतील तर लवकर डॉक्टरांकडे जावे.

योगोपचार: हायपोथायरॉइड‌िझमचा उपचार करताना योगास अत्यंत महत्त्व आहे. योगानुसार आपल्या शरीरात जी विविध चक्रे आहेत त्यापैकीच महत्त्वाचे असलेले विशुद्धी चक्र. या विशुद्धी चक्राचा थायरॉइड ग्रंथीशी संबंध आहे. हायपोथायरॉइडिझामसाठी उपचार घेत असताना योगाचे सखोल ज्ञान असलेल्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखालीच उपचार घ्यावेत. कारण व्यक्तीपरत्त्वे आणि रूग्णाच्या आजाराच्या गंभीरतेनुसार योगोपचारात बदल होऊ शकतो.

आसन : शरीरातील स्नायू आणि सांध्यामधील ताठरपणा घालवण्यासाठी करण्यात येणारी प्रारंभीक स्थितीतील आसने, मानेची आसन, मार्जरी आसन, हलासन, मत्स्यासन, जानू शिर्षसन, विपरितकरणी आसन इ.

प्राणायाम : नाडी शोधन प्राणायाम, कपालभाती, उज्जायी, अस्त्र‌िका प्राणायाम

ध्यानधारणा : दररोज किमान ३० मिनिटे ध्यानधारणा करावी

मंत्रसाधना : दररोज किमान २० मिनिटे मंत्रसाधना करावी

सूर्यनमस्कार : सूर्यनमस्काराची १० ते १५ आवर्तने करावीत

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 2765

Latest Images

Trending Articles

<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>