Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 2765

सणानंतरही राहा फीट

$
0
0

मुंबई टाइम्स टीम

सण-समारंभ एन्जॉय करणं जितकं महत्त्वाचं तितकंच महत्त्वाचं असतं सणानंतर तब्येत सांभाळणं, आपल्या दैनंदिन रुटीनमध्ये कंटाळून न जाणं. दिवाळीनंतर अनेकजणी आजारी पडतात किंवा त्यांना थकवा जाणवू लागतो. काही सहज शक्य असणाऱ्या गोष्टी फॉलो केल्या तर तुम्ही हे टाळू शकता.

सणवार साजरे करण्यासाठी अख्खं कुटूंब एकत्र येतं. सगळेजण आनंदात, मजेत सण साजरा करतात. दिवाळीसारखा मोठा सण असेल तर विचारायलाच नको. खाणं-पिणं, फटाके फोडणं, शॉपिंग, आऊटिंग यांची रेलचेल असतेच. या सगळ्यात श्रम करण्याची वेळ अधिक प्रमाणात येते ती महिलांवर. त्यामुळे अनेकदा सणानंतर महिलांच्या तब्बेतीवर याचा परिणाम झालेला पाहायला मिळतो.

सणाच्या काळात अवेळी जेवण, अपूर्ण झोप, प्रवास, तेलकट, तूपकट पदार्थ, यामुळे तब्बेत बिघडू शकते. लहान मुलांवरही याचे परिणाम होतात. याची सर्व जबाबदारी घ्यावी लागते ती घरातील महिलांना. त्यामुळे सण साजरे करतानाच थोडी काळजी घेतली, तर सणाचा काळ आनंदात जाईलच पण सणानंतरही तुम्ही आनंदाने तुमचं रुटीन सुरू कराल.

दिवाळीमध्ये लांबचा प्रवास करणार असाल तर रात्रीचा आणि शक्यतो ट्रेनचा पर्याय निवडा, ज्यामुळे पुरेशी झोप घेता येईल.

दिवाळीत तेल व तूपाचे पदार्थ अधिक प्रमाणात खाल्ले जातात. त्यामुळे अशावेळी हॉटेलिंगचे प्रमाण कमी करा, जेणेकरुन तब्बेत बिघडणार नाही.

फराळाचे पदार्थ दिवसातून एकदाच ठराविक वेळी खा. येता-जाता सतत हे पदार्थ खाणं टाळा.

जास्त धूर येणाऱ्या फटाक्यांपासून दूर राहा. तसेच लहान मुलांनाही दूर ठेवा.

फटाके फोडताना भाजण्याची किंवा लहान मुले धडपडण्याची शक्यता असते. अशावेळी फर्स्ट एड किट तयार ठेवा.

सतत गोडाचे पदार्थ न खाता काही पौष्टिक भाज्या, ज्यूस यांचा समावेश जेवणामध्ये ठेवाच.

रात्री उशीरापर्यंत जागरण करणे टाळा, तसेच दुपारी काहीवेळ विश्रांती घ्या.

डबाबंद पदार्थ शक्यतो खाऊ नका. खाण्याची वेळ आल्यास ते चांगल्या प्रतीचे आहेत की नाही याची खात्री करुन घ्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 2765

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>