Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 2765

बदल हवाच!

$
0
0

नमिता जैन

‌- क्लिनिकल एक्सरसाइज, लाइफस्टाइल अॅण्ड वेट मॅनेजमेण्ट एक्सपर्ट

रोजच्या रोज आपल्यात बरेच बदल होत असतात. तसं आपली खाण्याची पद्धत आणि व्यायामाचं वेळापत्रक बदलण्याची गरज असते.

सुरुवातीला वजन कमी करण्याच्या वेळी तुम्ही किती जाड होतात हे आठवा. पण नियोजित व्यायाम आणि आहाराने तुम्ही वजन कमी करून फिटनेसकडे कसे आलात याचा आढावा घ्या. सतत एकाच प्रकारचं नियोजन करून कंटाळा येणं साहजिक आहे. त्यामुळे व्यायामाचा उत्साह कायम ठेवण्यासाठी त्यात बदल करत रहा.

४२ वर्षांचा महेंद्र गेल्या एक वर्षापासून जिमला जातो. त्याचा सुरुवातीचा वेट लॉस खूप चांगल्या पद्धतीने झाला. मित्रांकडून खूप कौतुकही झालं. पण त्यानंतर मात्र त्याची व्यायामातली प्रगती अचानक थांबली. कारण त्याला त्याच त्या प्रकारच्या व्यायामाचा कंटाळा येऊ लागला. मग थोडा बदल केल्यावर त्याची गाडी पुन्हा रुळावर आली. एक वर्ष व्यायाम करून त्याच्या शरीराला त्या व्यायामाची सवय झाली होती त्यामुळे काहीसे कठीण प्रकार करायला त्याने सुरुवात केली. आव्हानात्मक प्रकार, जास्त वजन उचलणं, ट्रेडमिलवर जास्त वेळ धावणं अशा गोष्टी त्याने केल्या. त्याचं वजन कमी व्हायची प्रक्रिया पुन्हा एकदा चालू झाली.

सहा आठवड्याने एकदा व्यायामाचे प्रकार बदलणं आवश्यक आहे. रोज ट्रेडमिल करून कंटाळत असाल तर त्यातून ब्रेक घ्या. त्याऐवजी पोहणे, किक बॉक्सिंग, मैदानी खेळ करून बघता येतील.

नुसतं कार्डिओ ट्रेनिंग करणं फायद्याचं ठरत नाही. एका दिवसात धावणं, चालणं, जॉगिंग करून थकायला होणं साहजिक आहे.

सोबत असली तर व्यायाम चांगला आणि परिणामकारक होऊ शकतो. तुमच्यापेक्षा वेगाने चालणाऱ्या मित्राकडे पाहून तुम्हालाही उत्साह मिळेल. एकमेकांत स्पर्धा लावलीत तर त्याचा दोघांना फायदो होईल.

रोजच्या रोज एक गोष्ट केल्यावर कंटाळा तर येणारच. त्यामुळे नवा उत्साह येण्यासाठी नव्या व्यायामाची मदत घ्या.

एकट्याने व्यायाम करायला कंटाळा येत असेल तर कंपनी शोधा. जिममध्ये जाण्यासाठी छानसा ग्रूप असेल तर व्यायाम आणखी आनंदी होईल.

घरी बसायला आवडत असेल तर फिटनेस सीडी लावून व्यायाम करता येईल. नाहीतर जिम आहेच.

खूप उकाड्यात बाहेर व्यायाम करायचा त्रास वाटत असेल तर सरळ थंड पाण्याच्या स्विमिंग पूलमध्ये पोहायला जा. बाहेर खूप थंडी असेल तर जिमच्या उबदार वातावरणात सावकाशीने व्यायाम करा. तापमान बघून कोणता व्यायाम करायचा याचा अंदाज घ्या.

- शब्दांकन : आकांक्षा मारुलकर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 2765

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>