Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 2765

‘सोफा’ नाही आरामदायी

$
0
0

सोफ्यामुळे वाढतेय मान आणि पाठीचे दुखणे

म. टा. प्रतिनिधी, पुणे

आकर्षक, आरामदायी तसेच मॉडर्न लूक दिसणाऱ्या सोफ्याच्या खरेदीच्या प्रेमात पडलेल्या शहरातील आठ टक्के नागरिकांमध्ये सोफ्यामुळे मानेसह पाठीचे दुखणे वाढत असल्याचे निष्कर्ष पुढे आले आहेत. सोफ्यावर सातत्याने बसून काम करणे अथवा सतत बसून राहण्यामुळे पाठीच्या मणक्याचा आकारच बदलून जात असल्याने मानेसह पाठीचे दुखण्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत.

दुचाकीवर दूरचा प्रवास करणे अथवा दुचाकी खड्ड्यातून गेल्याने मानेचा त्रास सुरू होतो, हे आतापर्यंत अनेकांनी अनुभवले. पण घरातील आरामदायी सोफा पाठदुखीचे कारण ठरू शकतो, असा निष्कर्ष स्पाइनालॉजी क्लिनिकचे अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. किरण शेटे यांनी 'मटा'कडे शेअर केले आहेत.

'सहा महिन्यात क्लिनिकमध्ये आलेल्या २,६०० पेशंटची तपासणी केली. त्यात १,८२० पेशंटना मानेसह पाठीचे दुखणे असल्याच्या तक्रारी होत्या. पण सातत्याने दूरवरचा प्रवास, ४० तास बैठे काम केल्यामुळे तसेच अन्य कारणामुळे अनेकांना हे दुखणे बळावले होते. असे पेशंट त्यातून वगळले. केवळ २०८ अर्थात आठ टक्के पेशंटमध्ये सोफ्यामुळे मानेसह पाठीचे दुखणे उद्भभवले आहे,' असे निरीक्षण डॉ. किरण शेटे यांनी नोंदविले. 'आकर्षक, मॉडर्न लूक दिसणारा, आरामदायी आणि सर्वाधिक महागडा सोफा खरेदी करणे ही फॅशन झाली आहे. पण चुकीच्या प्रकारच्या सोफ्यामुळे आठ टक्के पेशंटच्या मानेसह पाठीचे दुखणे वाढत असल्याचे तपासणीदरम्यान आढळून आले. सोफ्यामुळे पाठीचे दुखणे वाढण्याचा नवा ट्रेंड सुरू झाला आहे. ७० टक्के पेशंटमध्ये मानेसह पाठीचे दुखणे आढळते. त्यात सोफामुळे वेदना देखील होत आहे,' याकडे डॉ. शेटे यांनी लक्ष वेधले.

सोफ्यावर बसल्यानंतर खुब्याचा भाग खाली जातो. तर पाय वर येतात. त्यामुळे मणक्याचा आकार ३० ते ९० डिग्री अंश सेल्सिअसमध्ये बदलतो. वेदनेपूर्वी मणका ९० डिग्रीमध्ये असतो. पण चुकीच्या प्रकारच्या सोफ्यामुळे आकार बदलतो. सोफ्यावर सातत्याने बसून काम करीत राहिल्याने देखील मानेसह पाठीचे दुखणे वाढते. त्याकडे दुर्लक्ष केल्यास दुखणे वाढते. सोफ्यावर पाठीला कोणताही आधार न घेता लॅपटॉपवर सतत काम केल्याने मणक्याचा आकार बदलतोच. पण मणक्यातील आतील चकतीसह सांध्यावर ताण येतो.

सोफा खरेदी करताना काय काळजी घ्याल?

> मांडीचा पुढील भाग बाहेर आणि पाय जमिनीपर्यंत पोहोचायला हवेत. > मांडीसह पाठीला आधार हवा. > सोफ्यावर बसल्यावर फर्म खाली अधिक दाबला जाऊ नये. आधार मिळणे गरजेचे आहे. > ९० ते १४५ डिग्री अंश सेल्सिअसच्या आकारात बसता आले पाहिजे > खुबा आणि गुडघा एका पातळीवर असावे.

काय उपाय करता येईल?

> सोफा फर्निचर घेणे टाळा. > शरीराच्या आकारानुसार फर्निचर बदलले पाहिजे. > सोफ्यावर बसताना पाठीला आधार आवश्यक. > सोफ्याची उंची अधिक असल्यास पाय जमिनीवर पोहोचत नसल्यास फूटरेस्टचा वापरावा. > नियमित व्यायाम हवा. > सोफ्यामुळे स्नायू असंतुलित होता कामा नये.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 2765

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>