Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 2765

कारणं कशाला शोधायची?

$
0
0

ब‍‍ऱ्याचजणांना वाटतं की, व्यायाम करण्यासाठी काहीतरी खास कारण असायला हवं. असं काहीही नाही. व्यायाम करण्यासाठी फक्त तुमची इच्छा हवी. कारण व्यायामाला पर्याय नाहीच.

तंदुरुस्ती - नियमित व्यायामाने शरीर तंदुरुस्त होतं. रक्ताभिसरण वाढून हृदय आणि फुफ्फुसांना त्याचा फायदा होतो. सतत आजारी पडणं, टाळायचं असेल तर व्यायाम हवाच.

वजन नियंत्रणात - खाण्याच्या सवयी आणि योग्य व्यायामाची सांगड घातली की आपोआपच वजन कमी व्हायचा मार्ग मोकळा होईल.

आनंदी मूड - व्यायामाने थकवा आणि कंटाळा नाहीसा होऊन मूड आनंदी होतो. तणावही कमी होतो.

जोम वाढेल : व्यायामामुळे आपली शारीरिक क्षमता वाढते. दिवसभराची कामं करण्यासाठी एक जोम मिळतो. व्यायाम न करता आराम केलात तर कंटाळा येउन हालचाल मंदावते.

चांगली झोप - शरीराला उत्तम व्यायाम मिळाला की झोपही चांगली लागते. शिवाय झोपेतून उठल्यावर फ्रेश वाटतं.

अनेकांना भीती वाटते की, व्यायाम बंद केल्यावर स्नायूंचं रुपांतर चरबीत होईल की काय? पण लक्षात घ्या, स्नायू आणि चरबी या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. व्यायाम बंद केल्यावर तुमचे स्नायू पूर्वस्थितीत जाऊन तुम्ही फिटनेसच्या शून्य पातळीवर येता. त्यामुळे वजन किंवा चरबी वाढू शकते. व्यायाम बंद झाल्याने कॅलरीज जाळण्याची प्रक्रिया बंद होते.

लक्षात ठेवा.

व्यायामात नियमितपणा असावा.

व्यायामासाठी दिवसभरातली एक वेळ निश्चित करून घ्या. सकाळ, दुपार किंवा संध्याकाळ व्यायामासाठी राखून ठेवा.

प्रगती केली की त्याची नोंद करून ठेवा. अशाने व्यायामासाठी प्रेरणा मिळेल. तुमचं ध्येय गाठायला मदत होईल.

शब्दांकन : आकांक्षा मारुलकर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 2765

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>