Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 2765

लेट्स एरोबिक

$
0
0

दीप्ती आंबेकर, फिटनेस तज्ज्ञ

एरोबिक व्यायामाबद्दल बऱ्याच जणांच्या मनात समज- गैरसमज असतात. या व्यायामप्रकाराची नेमकी माहिती, फायदे- तोटे यांच्याविषयी...

एरोबिक्स ट्रेनिंग म्हणजे काय?

सोप्या शब्दात एरोबिक्स म्हणजे 'ऑक्सिजनच्या सान्निध्यात' किंवा 'ऑक्सिजन बरोबर'. एरोबिक व्यायाम म्हणजे असा व्यायामप्रकार ज्यामध्ये तुमच्या हृद्याची गती वाढते, श्वासोच्छ्श्वासाचा वेग वाढतो आणि जो वेग तुम्ही कमीत कमी २० मिनिटं टिकवू शकता.

काही एरोबिक व्यायाम प्रकारांची उदाहरणं खालील प्रमाणे:

मध्यम ते जलद गतीनं चालणं.

जॉगिंग (संथ गतीनं पळणं)

पळणं (मध्यम गतीने)

सायकलिंग.

पोहणं.

ट्रेडमिलवर चालणं किंवा पळणं.

इलेप्टिकल ट्रेनर, रोइंग मशीनवर व्यायाम करणं.

जिने, टेकडी चढणं.

झुम्बा, एरोबिक्स, पॉवर योगा, अॅक्वा एरोबिक्स, कार्डिओ किक बॉक्सिंग, स्पिंनिंग बाइक अशा प्रकारच्या ग्रुप अॅक्टिव्हिटीमध्ये सहभागी होणं.

या दिलेल्या सर्व व्यायाम प्रकारातील तुमच्यासाठी योग्य असणारा व्यायाम प्रकार कसा ओळखावा? तर खाली दिलेले प्रश्न स्वतःला विचारून बघा.

वरील पैकी कोणता व्यायाम मी सहजरित्या करू शकतो?

मला ग्रुपमध्ये व्यायाम करताना जास्त आनंद मिळतो, की एकट्यानं व्यायाम करायला मला जास्त आवडतो?

मी दिवसाची कोणती वेळ व्यायामासाठी देऊ शकतो आणि त्या वेळेत कोणते पर्याय माझ्यासाठी उपलब्ध आहेत?

मला काही वैद्यकीय, शारीरिक मर्यादा आहेत का, ज्यामुळे काही व्यायाम प्रकाराला मर्यादा येऊ शकतात आणि अशा परिस्थितीत कोणता व्यायाम प्रकार माझ्यासाठी योग्य ठरेल?

कोणता प्रकार मी न कंटाळता सातत्याने करू शकतो?

कोणत्या प्रकारच्या एरोबिक व्यायामानं मला सर्वांत चांगला रिझल्ट मिळेल?

माझ्या आत्ताच्या शारीरिक क्षमतेनुसार कोणत्या व्यायाम प्रकारानं मला सुरुवात करता येईल?

हे आणि अशा प्रकारचे अनेक प्रश्न स्वतःला विचारून आत्तासाठीचा सर्वोत्तम व्यायाम प्रकार तुम्ही निवडू शकता. दर दोन ते तीन महिन्यांनी त्याचं अवलोकन करून त्या वेळच्या फिटनेसप्रमाणे नवीन प्रकारचा एरोबिक प्रकार निवडू शकता. तसंच, ऋतूप्रमाणे प्रकार बदलू शकता, म्हणजेच पावसाळ्यात घराबाहेर पडणं शक्य होत नसेल, तर घरातील (इनडोअर) व्यायाम प्रकार निवडणं योग्य ठरेल.

एरोबिक व्यायाम प्रकारचे फायदे

अतिरिक्त चरबी तसंच वजन कमी होतं.

हृदय, फुप्फुस तसंच रक्तवाहिन्यांची काम करण्याची क्षमता वाढते. स्टॅमिना वाढतो.

शरीरातील रक्ताभिसरण सुधारतं. रक्तदाब, मधुमेह, हृदयाशी संबंधित आजार होण्याचा धोका कमी होतो.

ज्यांना वरील आजार आहेत त्यांच्या तब्येतीत खूपच चांगला फरक दिसून येतो. एरोबिक प्रकारच्या सातत्यानं केलेल्या व्यायामानं मधुमेह तसंच रक्तदाबाच्या गोळीचा डोस कमी झाल्याची किंवा पूर्णपणे गोळ्या बंद झाल्याची अनेक उदाहरणं आहेत.

मानसिक ताण कमी होतो. आत्मविश्वास वाढतो.

आपली चपळता वाढते.

शारीरिक तोल, हाता-पायाच्या हालचालींचा समन्वय सुधारतो.

असे अनेक फायदे तुम्ही एरोबिक प्रकारच्या व्यायामानं अनुभवू शकता. आपली शारीरिक क्षमता वाढेल तसतसा व्यायामाचा प्रकार किंवा त्याची तीव्रता, वेग यामध्ये बदल करत राहा. तुम्हाला रिझल्ट नक्कीच मिळेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 2765

Latest Images

Trending Articles

<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>