Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 2765

ताणाला मारा बाण

$
0
0

संकलन - पूनम पाटील, कॉलेज क्लब रिपोर्टर

आजच्या धावपळीच्या आणि स्पर्धेच्या जगात आपल्यावर सगळ्यात जास्त अधिराज्य गाजवणारा घटक म्हणजे तणाव. त्याचीच काही कारणं आणि त्यावरील उपाय.

ध्वनी प्रदूषण- मोठ्या आवाजामुळे आपल्यावरचा ताण कळत नकळत वाढत असतो. आवाजामुळे हृदयविकारासारखे आजारही होऊ शकतात. त्यामुळे ध्वनीप्रदूषणावर मात करायची असेल तर स्वतःपासून सुरुवात करा. आधी तुम्ही करत असलेला आवाज आटोक्यात आणा.

मित्र - चकित झालात ना? मित्र आणि ताणाचा काय संबंध? तर तो आहे. आपल्या मित्रांकडूनही आपल्याला मानसिक, भावनिक आणि शारीरिकदृष्ट्या ताण येऊ शकतो. लहानसहान गोष्टींवरून होणारे वाद, गैरसमजामुळे निर्माण होणारा तणाव आपल्याला त्रासदायक ठरतो. त्यामुळे असल्या गोष्टी जिथल्या तिथे सोडवणं, किंवा त्या फार काळ मनात न ठेवणं, हा यावरचा उपाय होऊ शकतो.

नेटस‌र्फिंग आणि चॅटिंग - आता इंटरनेट हेच आपलं जीवन झालंय. तासनतास चालणारं नेटसर्फिंग आणि चॅटिंग ही अक्षरशः डोकेदुखी झालीय. किमान झोपण्यापूर्वी एक तास आधी मोबाइल, इंटरनेट बंद ठेवा. व्हर्च्युअल जगातून रिअल जगात या. बघा खूप बरं वाटेल.

अपुरी झोप- कामाचा व्याप, त्यातून येणारा ताण त्यावर मद्यपान, इंटरनेट अॅडिक्शन, मोबाइल गेम्स अशाप्रकारचे शोधले जाणारे उपाय... आणि या सर्वाचा परिपाक म्हणून कमी होणारी झोप. झोप कमी झाली की ताण पुन्हा वाढत जातोच. मग कामावरही परिणाम होतो. मग पुन्हा तेच दुष्टचक्र सुरु होतं. त्यामुळे दिवसभरात कमीतकमी ७ ते ८ तासांची झोप घ्या.

व्यायाम - नियमीत व्यायाम केलात तर तुमचा ताण बराच कमी होऊ शकतो. कारण व्यायाम न केल्यास शरीरातील ऑक्सिजनचं प्रमाण कमी होतं. म्हणून सकाळ-संध्याकाळ किंवा दिवसत्रभरातला काही वेळ तरी व्यायामासाठी द्याच.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 2765

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>