Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 2765

घोरणं घातक

$
0
0

>> डॉ. श्रीपाल श्रीश्रीमाळ

घोरणं अनेक प्रकारे तुमच्या झोप आणि आरोग्याला घातक ठरू शकतं. याबद्दल जागरुकता कमी असल्यामुळे या समस्येकडे दुर्लक्ष केलं जातं. आफलं घोरणं सोबत झोपणाऱ्या व्यक्तीसाठी मोठी कटकट असते, हेदेखील अनेकजण विसरतात. घोरणं कदाचित एका गंभीर आजाराचं लक्षण असू शकतं. त्याला ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप अॅप्निया (ओएसए) म्हणतात.

ओएसएमध्ये श्वसन प्रक्रियेत अडथळा निर्माण होतो. त्यामुळे रक्तातल्या प्राणवायूचं प्रमाण कमी होतं. ते कमी झाल्यामुळे शरीरात अनेक रासायनिक प्रक्रिया घडतात. पर्यायानं उच्च रक्तदाब, हृदयविकार, पक्षाघात, मधुमेह असे प्राणघातक आजार होऊ शकतात, असं संशोधनातून समोर आलं आहे. या आजारांचं मूळ कारण असलेल्या घोरण्याकडे दुर्लक्ष केलं जातं.

ओएसएचा धोका कोणाला असू शकतो?

घोरणं, दिवसा थकवा किंवा मरगळ जाणवणं, डोकेदुखी, छातीत जळजळ होणं, सारखी लघवीला लागणं, अकारण वजन वाढणं यांपैकी कोणतंही लक्षण असल्यास ओएसए असण्याचा धोका संभवतो.

लहान मुलांमध्येही ओएसएचा धोका असतो. त्यामुळे मुलांमध्ये दीर्घकालीन संज्ञानात्मक समस्या उद्भवू शकतात. त्याचा त्यांच्या शैक्षणिक प्रगती व विकासावर वाईट परिणाम होऊ शकतो.

घोरण्यामुळे मेंदूच्या पेशींना बरंच नुकसान पोहोचतं. त्यामुळे संवेदना कमी होतात. हृदयाचा वेग, लय व रक्तदाब कमी-जास्त होत असतो. शिवाय एकाग्रता, स्मरणशक्ती कमी होते. लहान मुलांमध्ये ओएसएमुळे कामगिरी व विकासावर दुष्परिणाम दिसून येतो.

वेळीच केलेल्या निदान व उपाचाराचा आपल्या चांगल्या झोपेसाठी, चांगल्या जीवनशैलीसाठी व चांगल्या आरोग्यासाठी निश्चितपणे लाभ होऊ शकतो. हृदयविकाराच्या अंदाजे ५० टक्के रुग्णांना ओएसए असण्याची शक्यता असते. त्यावर वेळीच उपचार करणं आरोग्याला लाभदायक ठरतं.

घोरण्यावरील उपचार विना शस्त्रक्रिया व विना औषध होत असल्यानं आरोग्याच्या तक्रारींचं अगदी सोप्या पद्धतीनं निवारण होतं.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 2765

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>