Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 2765

हॉटमध्येही राहा कूल!

$
0
0

मुंबई टाइम्स टीम

उकाडा चांगलाच वाढल्याने सगळेजण हैराण झाले आहेत. घरातून थोडा वेळ जरी बाहेर पडलं तरी अंगातून घामाच्या धारा वाहू लागतात. या हॉट वातावरणात कूल कसं राहता येईल यासाठी 'मुंटा'ने दिलेलं हे गाइड.

उन्हाळ्याची सुरुवात झाली, की दुपारची वेळ त्रासदायक असते. त्यात ऑफिसमध्ये असणाऱ्यांना पेंगुळल्यासारखं होणं, कामात लक्ष न लागणं, उगाच दमल्यासारखं होणं वगैरे गोष्टींचा त्रास होऊ लागतो. या सगळ्याचा मानसिकतेवरही परिणाम होतो. सारंकसं सामसूम असं वाटायला लागतं. या उन्हाळी मानसिकतेवर मात करता येते. रोजचा दिवस फ्रेश आणि सुंदर होऊ शकतो.

मोगरा आणि गुलाब!

उन्हाळ्यामध्ये आपल्याला शांत आणि थंड ठेवण्यासाठी सुगंध हा महत्त्वाची भूमिका बजावतो. तुम्ही अत्तर वापरत असाल, तर या दिवसांत मोगरा आणि गुलाब अवश्य वापरा. वाळाही चांगला.

सेंट वापरत असाल, तर पारंपरिक गुलाब, मोगरा वापरा. इंपोर्टेडमध्ये अॅक्वा फ्रेग्नन्स वापरावा. यामध्ये कूल वॉटर, बर्बेरी ही उदाहरणं आहेत.

यू डी कोलन हाही उत्तम उपाय. याचे थेंब रुमालावर शिंपडा. बाहेरून आल्यावर किंवा तरतरीत वाटण्यासाठी चेहरा धुतल्यानंतर या रुमालानं पुसा. वेट टिश्यू वापरल्यासारखं वाटतं. यू डी कोलनमुळे तरतरी येते. त्याचा गंधही सुंदर असतो.

अत्तर हे मनगटाला आणि कानाच्या मागे लागावं. त्याचा खोलवर गंध घेतल्यानंतर त्याची अनुभूती मेंदूपर्यंत जाते. डोकंही शांत होतं. अत्तर वापरण्याच्या या आपल्या पारंपरिक गोष्टी आहेत. याचं आजचं रूप म्हणजे अरोमा थेरपी.

वाळा आणि मोगऱ्याची फुलं पाण्यात यासाठीच टाकतात. त्यांचा गंध असलेलं हे पाणी तजेला देतं. मोगऱ्याची तीन-चार फुलं टेबलवर ठेवली, तरी ती दिवसभर सुवास देत राहातात. मधेच कधीतरी त्यांचा खोलवर गंध घेतल्यावरही शांत वाटतं.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 2765

Trending Articles