Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 2765

चेहरा है या...

$
0
0

मुंबई टाइम्स टीम

हातात येईल तो साबण पटकन चेहऱ्यावर फिरवण्याची सवय काहीजणींना असते. तर काहीजणी फक्त जाहीराती पाहून फेसवॉश आणतात. चेहरा चांगला दिसायला हवा असेल तर त्याची काळजीही नीटच घ्यायला हवी.

तुमच्या चेहऱ्याला सूट होतील असेच प्रॉडक्ट वापरा. महत्त्वाचं म्हणजे सौम्यात सौम्य असा फेसवॉश वापरा. फेसवॉश लावल्यानंतर त्वचेची आग होता कामा नये आणि खाजही येऊ नये. जास्तीत जास्त फेस म्हणजे उत्तम क्लिनिंग, हा समज चुकीचा आहे. अशा फेसवॉशमध्ये मोठ्या प्रमाणात डिटर्जंड असल्यानं तोटाच होतो. त्यामुळे शक्यतो कमी फेस होणारा आणि सुवासिक नसलेला फेसवॉश वापरा. यामुळे त्वचेला कोणतीही अॅलर्जी होणार नाही.

चेहरा धुताना पाण्याचं तापमानही समतोल असावं. खूप गरम आणि थंड पाणी असता कामा नये. यामुळे चेहऱ्याला मूळ पीएच बॅलेन्स बिघडतो. चेहरा कोरडा पडतो आणि रखरखीतही दिसतो.

तुम्ही वापरत असलेला फेशवॉश उन्हाळ्यात तीनदा लावा. त्यानंतर मॉइश्चरायझर लावायला विसरू नका. लोशन लावल्यानंतर लगेचच उन्हात, वाऱ्यात जाऊ नका. लोशन त्वचेत मुरल्यानंतर सनस्क्रीन लावा आणि मगच बाहेर पडा.

धुतल्यानंतर चेहरा चोळू नका. मऊ अशा कॉटनच्या नॅपकिननंच तो कोरडा करा. तीन मिनिटांच्या आत मॉइश्चरायझर लावा. तेलकट त्वचेसाठी ऑइल फ्री, तर कोरड्या त्वचेसाठी क्रीमी मॉइश्चरायझर लावा.

काहीजणींनी क्लिंझर, टोनर, मॉइश्चरायझर (सीटीएम) वापरण्याची सवय असते. मात्र, सगळ्यांनाच ते सूट होईल असं नाही. टोनरमध्ये अल्कोहोल असल्यानं अॅलर्जी उठण्याची शक्यता असते. त्यामुळे सीटीएम आपल्या चेहऱ्याला सूट होईल, की नाही ते तपासण्यासाठी ४८ ते ७२ तास आधी कानाच्या मागं ते प्रॉडक्ट लावून पाहा. आग किंवा काही रॅश उठली नाही, तर ते तुम्हाला सूट झालेत असं समजा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 2765

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>