Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 2765

हॉटेलात खायचंय ?

$
0
0

नमिता जैन

क्लिनिकल एक्सरसाइज, लाइफस्टाइल अॅण्ड वेट मॅनेजमेण्ट एक्सपर्ट

तुम्ही डाएटिंगवर आहात म्हणजे हॉटेलात जेवायचंच नाही, असं नाही. कधीतरी हॉटेलमध्ये जायलाही काही हरकत नाही. अर्थात तोंडावर नियंत्रण ठेवूनच.

रोज घरचं जेवण जेवून कंटाळा आला की, कधीतरी हॉटेलात जेवायला जायला काहीच हरकत नाही. रोजच्या डाएटिंगमधून थोडासा बदल हवा म्हणून हा पर्याय चांगला आहे. परंतु हॉटेलमध्ये खायच्या पदार्थांची योग्य निवड केली तर तुमच्या डाएटवर त्याचा फारसा परिणाम होणार नाही.

प्रत्येक हॉटेलमध्ये अनेक पदार्थ उपलब्ध असतात. बटरचं प्रमाण कमी असणाऱ्या पदार्थांची निवड करा. जेवणाबरोबर लिंबू पाणी, शहाळं किंवा ताक घ्या. ग्रीन सलाड किंवा मिक्स सलाड आणि भाज्यांचं सूप मागवा. एक वाटी सूप प्यायल्याने बरीच भूक भागते. नंतरच्या जेवणात कमी तेलकट पदार्थ घ्या. उकडलेले, वाफवलेले किंवा भाजलेले पदार्थ सॉसबरोबर खायला हरकत नाही. पोट भरतंय असं वाटलं की लगेच थांबा. जेवणाची सांगता फ्रूट सलाड किंवा फ्रूट ज्यूसने करा. चॉकलेट खावंसं वाटलं तर चॉकलेट मूस इतरांबरोबर वाटून खा.

कधीतरी फास्ट फूड खाल्लं तरी चालतं. रोजच्या रोज ते खाणं वाईटच. पण त्यातल्या कोणत्या पदार्थांची निवड करायची हे मात्र आधीच ठरवा.

तळलेले पदार्थ न खाल्लेलेच बरे! फोडणीच्या तेलाचा कमीत कमी वापर करायच्या सूचना आधीच हॉटेलात द्या. ऑलिव्ह तेल आरोग्याला चांगलं असलं तरी त्यात कॅलरीज असल्याने त्याचाही जपून वापर करा.

बटर लावलेला ब्रेड खाणं टाळा.

सोड्यामध्ये ताजं लिंबू, मीठ आणि कमी साखर घालून घेऊ शकता.

ताजी फळं, कडधान्य, सॅलड, कोशिंबिरी किंवा लो फॅट पनीर असलेले पदार्थ मागवा.

भरपूर तेलातुपात आणि लोण्यात तयार केलेल्या, मसालेदार भाज्या मागवू नका.

चीझ सॉसपेक्षा टोमॅटो सॉस घ्या

तेलकट कुलचा किंवा पराठा खाण्यापेक्षा कोरडी तंदुरी रोटी खायला हरकत नाही

सँडविच खाणार असाल तर ऑल व्हीट ब्रेड वापरायला सांगा. त्यात चीज, मेयोनिज यांचा वापर पूर्णपणे टाळा.

पिझ्झा खायचा तर कमी चीज किंवा अजिबात चीज न घालता बनवायला सांगा.

तुम्ही शाकाहारी असाल तर कडधान्य खायला हवीत. त्यातून प्रथिनं मिळतात.

मांसाहारी असाल तर तंदुरी चिकन किंवा मासे खायला हरकत नाही.

फ्राईड राईसपेक्षा साधा वाफवलेला भात मागवा.

शब्दांकन - आकांक्षा मारुलकर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 2765

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>