Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 2765

सो व्हॉट?

$
0
0

मुंबई टाइम्स टीम

स्थूल व्यक्तीला कायम चेष्टेचा धनी व्हायला लागतं. त्यामुळे त्यांच्यात न्यूनगंडही वाढतो. लग्न ठरवतानाही याचा अडथळा होतोच. पण सगळं झिडकारून 'आहे मी जाड! सो व्हॉट?' असा अॅडिट्यूड काहीजणी दाखवतात.

'सुशिक्षित, नोकरी असल्यास प्राधान्य, गोरी, मध्यम बांधा, उंची ५-३ पेक्षा अधिक....' हे शब्द ओळखीचे वाटतात ना..? थोड्याफार फरकानं याच अपेक्षा वराला नियोजित वधूकडून असतात. मात्र, 'मध्यम' किंवा 'सुडौल' याऐवजी 'लठ्ठ' बांधा असलेल्या वधूचं स्थळ आलं तर..? कल्पनाही नकोशी वाटते ना..? हेच एकमेव कारण देऊन थेट नकारही कळवला जाईल. 'मी आहे ही अशीच आहे, सो व्हॉट..? पटलं तर स्वीकार' हा अॅटिट्यूड ठेवण्याची, 'लव्ह कम्स इन एव्हरी साइज' हे बिंबवण्याची गरज निर्माण झाली आहे का..?

आपल्या बायकोच्या कल्पनाचित्रात कुठलाच मुलगा 'स्थूल बायको' हा पर्यायच ठेवत नाही. 'दम लगा के हैशा' या नुकत्याच आलेल्या सिनेमामुळे हा विषय पुन्हा अधोरेखित झाला आहे. बायको 'स्लिम ट्रीम'च असावी, अशी अपेक्षा जवळपास प्रत्येक वराकडून ठेवली जाते. शिक्षण, वय, उंची, नोकरी, स्वभाव, विचार, सगळं जुळत असताना केवळ स्थूलतेमुळे नकार देणारे वरही आहेत. आपल्याला शोभणार नाही, लोक काय म्हणतील असा विचार यामागे दिसतो. असं असूनही एखाद्याची अशी जोडी जमलीच, तर केवळ मनाची तयारी नसल्यानं त्यांच्या आयुष्यात आणि भावविश्वात किती मोठे बदल घडू शकतात, याची कल्पना आपण करू शकतो.

या निमित्तानं घेतलेली काही मुलांची मतं बोलकी आहेत. समीर म्हणतो 'स्थूल मुलीचा 'बायको' म्हणून मी कधी विचारच केला नाही. म्हणजे तसा विचार कधी मनात आलाच नाही. असं स्थळ जर प्रत्यक्षात मला आलं, तर मी 'नाही'च म्हणेन.'

मंथनच्या मते, 'जाड मुलींप्रमाणेच जाड मुलांनाही मुलींचा नकार पचवावा लागतो. आपला जोडीदार आपल्याला शरीरयष्टीनंही शोभणारा असावा, असं वाटण्यात फारसं गैर नाही. पण जुलमाचा रामराम करून आयुष्यभर दुःखी राहण्यापेक्षा आधीच नकार दिलेला चांगला.'

'केवळ 'स्थूलता' हे एकमेव कारण नकारासाठी कसं असू शकतं? चौकटीबाहेर विचार करण्याची गरज आहे,' असं वेगळं मत विवेकनं व्यक्त केलं.

'बारीक राहणं आरोग्याच्या दृष्टीनं फायद्याचंच आहे; पण हा जोडीदार निवडीचा निकष कसा असू शकतो? अशा जोडीदारासह समाजात वावरण्याची लाज त्यांना वाटत असावी. स्थूल व्यक्तींसाठी असा नकार पचवणं किती अवघड असेल. समजा एखादी मुलगी किंवा मुलगा लग्नानंतर जाड झाले तर? मग काय करणार? ' असं स्पष्ट प्रश्न हर्षा विचारते.

तारतम्य हवं

'प्रत्येकाच्या मनात जोडीदाराची एक प्रतिमा असते. त्यामुळेच लग्न ठरवताना शरीरप्रतिमा महत्त्वाचा घटक असतोे. एक लग्न जवळपास जुळतच आलं होतं. त्या मुलानं मुलीस साखरपुडा होईपर्यंत थोडी बारीक होशील का, असं विचारलं. तिनं त्याला नकार दिला. खरं तर 'मी आहे तशी स्वीकार' हा अॅटिट्यूड इतर बाबतीत चांगला आहे; पण बदल आपल्या फायद्याचा असेल, तर तो करण्याची तयारी हवी. याचा तारतम्यानं विचार केला पाहिजे. दुसरा मुद्दा म्हणजे स्थूल जोडीदार स्वीकारताना तडजोड करण्याची मुलींची तयारी मुलांपेक्षा अधिक दिसते,'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 2765

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>