Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 2765

तुमच्या या सवयी वाढवू शकतात रक्तातील साखरेची पातळी, वेळीच घाला सवयींना आळा

$
0
0

शरीर योग्यरितीने कार्यरत राहावं यासाठी ऊर्जेची गरज भासते आणि ही ऊर्जा आपल्या सर्वांना नक्कीच अन्नातून मिळत असते. शरीरात गेलेले अन्न हे ग्लुकोजमध्ये परावर्तित होते आणि शरीराला ऊर्जा देण्याचे काम करते. पण शरीरामध्ये जर साखरेची पातळी वाढली तर मात्र अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. अधिक साखर पोटात गेल्यानंतर रक्तातील साखरेची पातळी वाढते याबाबत सर्वांनाच माहीत आहे. मात्र हे संपूर्णतः सत्य नाही. तुम्हाला कदाचित माहीत नसावे की, आपल्या अशा अनेक सवयी असतात, ज्या रक्तातील साखरेची पातळी वाढण्यास कारणीभूत ठरतात. अशाच काही सवयींबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, जेणेकरून तुम्ही तुमच्या या सवयींना वेळीच आळा घालून स्वतःच्या तब्बेतीची काळजी घेऊ शकता.

अर्ध्या तासापेक्षा अधिक काळ बसून राहणे

साखरेची पातळी संतुलित राखण्यासाठी आणि मधुमेह नियंत्रित करण्यासाठी तुम्ही तुमच्या लाईफस्टाईलवर अर्थात तुमच्या नियमित सवयींवर लक्ष ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. तुम्ही जर अधिक काळ एका ठिकाणी बसून राहिलात तर यामुळे तुमच्या रक्तातील साखर वाढण्याचा धोका वाढतो अर्थात ब्लड शुगर लेव्हल वाढण्यासाठी हे सर्वात महत्त्वाचे कारण आहे. त्यामुळे तुम्हाला दर अर्ध्या तासाने कामातून वेळ काढण्याचा आणि जागेवरून हलण्याचा सल्ला डॉक्टरांकडूनही देण्यात येतो. या सल्ल्याकडे दुर्लक्ष न करता आपल्या जागेवरून उठून दर अर्ध्या तासाने स्वतःच्या तब्बेतीसाठी ही काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. अन्यथा ब्लड शुगर लेव्हल वाढून वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जावे लागते.

आर्टिफिशियल स्वीटनेसचा वापर करणे

आपल्याला मधुमेह होऊ नये अथवा ब्लड शुगर वाढू नये यासाठी अनेकदा साखर पोटात जाऊ नये म्हणून अनेकजण आर्टिफिशियल स्वीटनरचे सेवन करतात. पण नियमित याचा वापर केल्यास, रक्तातील साखर वाढण्याची जोखीम अधिक वाढते. वास्तविक आर्टिफिशियल स्वीटनरमध्ये इन्शुलिन रेझिस्टन्स आणि साखरेची पातळी स्थिर राखण्यासाठी शरीराची क्षमता यावर उलट परिणाम करते आणि त्यामुळे साखरेची पातळी संतुलित राहण्याऐवजी वाढण्याकडे अधिक कल जातो. त्यामुळे तुम्हाला गोड खावेसे वाटत असेल तर पदार्थांमध्ये साखरेऐवजी आणि आर्टिफिशियल स्वीटनरऐवजी मध अथवा गुळाचा वापर करावा.


नाश्ता न करण्याची सवय

96005098

सकाळी अनेकदा घरातून निघताना न खाण्याची अनेक जणांना सवय असते. वेळ मिळत नसल्यामुळे नाश्ता न करण्याची अनेकांना सवय लागते. पण नाश्ता न करण्याची सवय अजिबात चांगली नाही. या सवयीमुळे केवळ तुमचे मेटाबॉलिजम कमी होत नाही तर यामुळे तुमचे वजनही नाहक वाढते. तर दुसऱ्या बाजूला नाश्ता न केल्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाणही वाढते. तुम्हाला जर ब्लड शुगर लेव्हल संतुलित करायची असेल तर झोपेतून उठल्यानंतर किमान ४० मिनिट्सच्या आत तुम्ही नाश्ता करायला हवा.

हाय सॅच्युरेटेड फूडचे सेवन करणे

हाय सॅच्युरेटेड फूड हे तुमच्या रक्तातील साखरेचे प्रमाण वाढवते, विशेषतः टाईप २ मधुमेह असणाऱ्यांना याचा अधिक त्रास होतो. तुम्हाला फॅट फूडचे सेवन करायचे असेल तर तुम्ही फॅटी नट्स, अव्हाकाडो अथवा साल्मन इत्यादी पदार्थांचे सेवन तुम्ही करत असाल तर तुम्ही ही सवय वेळीच बदलायला हवी. यामुळे तुमचे अधिक नुकसान होते आणि शरीरात साखरेची पातळीदेखील वाढते.

मासिक पाळीदरम्यान त्वचेची काळजी घेण्यासाठी सोप्या टिप्स

मनावर अधिक तणाव घेणे

आजकाल प्रत्येक व्यक्ती कोणत्या ना कोणत्या कारणाने तणावग्रस्त असल्याने दिसून येते. याचा सर्वात जास्त परिणाम होतो तो म्हणजे मानसिक आरोग्यावर. मात्र हे शरीरासाठीही तितकेच वाईट ठरते. तणावग्रस्त असल्यामुळेच टाइप २ मधुमेहाला सामोरे जावे लागते. तुमच्या शरीरातील साखरेची पातळी वाढते आणि त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त तणावापासून दूर राहण्याचा प्रयत्न करावा. अन्यथा शरीरातील साखरेची पातळी वाढण्यासाठी कारणीभूत ठरणारे हे कारण आहे.
या सर्व सवयींपासून तुम्ही दूर राहण्याचा नक्की प्रयत्न करा. जेणेकरून तुमच्या साखरेची रक्तातील पातळी संतुलित राहण्यासाठी मदत होते.
(फोटो क्रेडिटः Freepik.com)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 2765

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>