Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 2765

घरी राहा, आरोग्य जपा!

$
0
0

मुंबई टाइम्स टीम

करोनाचा फैलाव रोखण्यासाठी घरी थांबणं आपल्या सगळ्यांच्या दृष्टीनं हितावह आहे. पण त्याचा परिणाम थेट तुमच्या आरोग्यावर होत असतो, असं एका संशोधनाअंती पुढे आलं आहे. वयस्कर व्यक्ती जर आजारपण, अपघात किंवा इतर कारणास्तव दीर्घ काळ निष्क्रीय असतील तर त्यांच्यामधील प्रतिकार शक्ती कमी होते. सध्याच्या काळात ज्येष्ठ नागरिकांनी फिट असणं गरजेचं आहे. ज्येष्ठ नागरिकांनी घरबसल्या आरोग्य जपण्यासाठी कोणते व्यायामप्रकार करावेत याविषयी...

० हालचाल करा

फोनवर बोलताना एका जागी स्थिर न बसता फेऱ्या मारत बोला. तुम्ही जर टीव्ही बघत असाल तर प्रत्येक ब्रेकमध्ये घरात एक फेरफटका मारा. तुमच्या घराबाहेर जिने असतील तर मास्क, ग्लोव्हज घालून जिन्या बाजूच्या दोन्ही कठड्याना धरून जिन्यांवर वर-खाली करा.

० व्यायामास प्राधान्य

घर बसल्या व्यायाम करण्यास प्राधान्य द्या. सोप्या आणि छोट्या आसनांपासून सुरूवात करा. एखादा व्यायामप्रकार करताना ज्या क्षणी खूप ताण पडतो आहे असं जाणवेल त्या क्षणी परत पूर्व अवस्थेत या. तुम्ही जास्त वेळ करू शकत असाल तर काही सेकंद विश्रांती घेऊन पुन्हा एकदा करा.

० स्नायूंना बळकटी देण्यासाठी...

हाताच्या स्नायूंची शक्ती वाढवायची असल्यास सूपचे कॅन किंवा पाण्याच्या बाटल्या उचला. या वस्तू हातांच्या बाजूनं तळव्यापुढे आणून, हळूहळू आपल्या कोपरामध्ये वाकून कॅन किंवा बाटली वरच्या बाजूस नेण्याचा प्रयत्न करा. ही क्रिया सतत करत राहा.

० सोप्या पुशअपचा पर्याय

भिंतीपासून काही अंतरावर एक जागा निश्चित करा. पाय भिंतीकडे करून त्या दिशेनं पुढे वाकण्याचा प्रयत्न करा. हात घट्ट धरून कोपऱ्यातून मागे-पुढे होण्याचा प्रयत्न करा. अशा प्रकारे तुम्हाला जमतील तितकेच पुशअप काढा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 2765

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>