Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 2765

पाय सांगतात काय ?

$
0
0

मुंबई टाइम्स टीम

आपला मूड कसा आहे, हे चेहरा बघून सांगू शकतो. तसंच पायांवरुन तुमच्या आरोग्याविषयीचे अनुमान बांधता येतात, हे एका संशोधनातून समोर आलं आहे. काही मिनिटं पायांचं सूक्ष्म निरीक्षण करुन तुम्हाला आरोग्यविषयक कोणकोणत्या समस्या भेडसावत आहेत, हे डॉक्टरांना समजू शकतं. याबद्दल डॉ. अजय सांगतात की, 'तुमचे पाय तब्येतीविषयी खूप काही सांगतात. निरीक्षण केल्यास काही लक्षणं आढळून येतात'. बहुतेक जण पायांकडे दुर्लक्ष करतात. पण तेच पाय तुमच्या तब्यतेविषयी खूप काही सांगत असतात. पायांवरुन एखाद्या आजाराची किंवा कमतरतेची लक्षणं कशी ओळखावीत, याविषयी आजच्या लेखातून जाणून घेऊ या...

० पांढरी नखं काय सांगतात?

शरीरात कॅल्शियमची कमतरता असल्यावर नखं पांढरी पडतात. तुम्ही पौष्टिक आहार घेत नसाल तर ते नखांवरुन लगेच कळून येतं. यासाठी तुमच्या आहारात दूध, ताक किंवा इतर दुग्धजन्य पदार्थांचा समावेश असणं गरजेचं आहे. तसंच डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार कॅल्शिअमच्या गोळ्याही घेऊ शकता.

० हिमोग्लोबीनची कमतरता

तुमच्या पायांची नखं जर पिवळी असतील तर तुमच्या रक्तातील हिमोग्लोबीनचं प्रमाण कमी झालं आहे, असं समजावं. यामुळे नखांचे आकारही बदलू लागतात. नखं सतत तुटणं, हळूहळू वाढणं किंवा त्यांचा आकार बदलणं ही हिमोग्लोबीन कमी असण्याची लक्षणं आहेत.

० भरपूर पाणी प्या!

तुमच्या टाचांना भेगा पडतात? पावलांची त्वचा कोरडी आहे? म्हणजेच तुम्ही पाणी कमी पिता. पाणी कमी प्यायल्यानं टाचांना भेगा पडतात. डॉ. अखिलेश सांगतात की, 'हिवाळ्यात हवेतील कोरडेपणामुळे टाचांना भेगा पडतात. पण इतर ऋतूतही तुमच्या टाचांना भेगा पडत असतील तर तुम्ही पाणी कमी पित असल्याचं ते लक्षण आहे. त्यामुळे जास्तीत जास्त पाणी किंवा फळांचा रस पिणं तुमचं आरोग्य जपण्याच्या दृष्टीनं हितावह असतं'. तसंच भेगांमुळे जंतुसंसर्ग होण्याचा धोका असतो. त्यामुळे टाचांची काळजी घेतली पाहिजे.

० मधुमेहाची लक्षणं

तुमच्या पायांना अनेक दिवसांपासून सूज आहे का? तर मग तुम्ही लवकरात लवकर डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. कारण ते मधुमेहाचं लक्षण असतं. तसंच तुम्ही घालत असलेल्या चपला पायासाठी योग्य नसल्या तर पाय लगेच सूजतात.

लक्षात ठेवा...

० नियमित व्यायाम करा.

० जास्तीत जास्त पाणी किंवा फळांच्या रसाचं सेवन करा.

फूट बाथचा पर्याय

एका बादलीत कोमट पाणी घ्या. नंतर पायांना टॉवेल घट्ट बांधून ते पाण्यात ठेवा. असं केल्यानं शरीराचं तापमान वाढून घाम येईल. असं करणं तुमच्या आरोग्यासाठी चांगलं असतं. पुन्हा गरम पाणी घ्या. आता पायांना टॉवेल न बांधता किमान १५ ते २० मिनिटं ठेवा. नंतर लगेच पाय थंड पाण्याखाली धरा. असं केल्यानंतर तासभर तरी घराबाहेर जाऊ नका. फूट बाथ घेतल्यानं रक्ताभिसरण सुरळीत पार पडतं.

संकलन- कौस्तुभ तिरमल्ले, कॉलेज क्लब रिपोर्टर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 2765


<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>