Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 2765

राहा तणावमुक्त!

$
0
0

मुंबई टाइम्स टीम

कॉर्पोरेट कर्मचाऱ्यांसाठी नव्या संधी म्हणजे कामाचा वाढता व्याप असतो. टार्गेट्स पूर्ण करण्याची तयारी सुरुवातीपासून केला पाहिजे. म्हणजे जेव्हा नव्या जबाबदाऱ्या सोपवल्या जातात तेव्हापासून तयारी सुरु करणं गरजेचं आहे. तज्ज्ञांच्या मते, अशा वेळी त्यांना आणखी ताण देणं अथवा त्यांना त्रास देणं योग्य नाही. कारण ताण त्यांच्या मानसिक आरोग्यावर तर परिणाम करतोच शिवाय काम करण्याची क्षमतादेखील कमी होते. एका संशोधनाअंती असं सिद्ध झालं आहे की, ऑफिसमधील काम करण्याची जागा आणि कर्मचाऱ्यांचे मानसिक आरोग्य याचा परस्पर संबंध असतो. अयोग्य जागी बसण्याचे परिणाम थेट आरोग्यावर होतात. ३० वर्षीय सेल्स एक्झिक्युटीव्ह यतीन सांगतो की, मी कायम टार्गेट्स पूर्ण करण्याचा कामात व्यग्र असतो. त्यामुळे स्ट्रेस लेव्हल वाढली. याचा झोपेवरही परिणाम झाला. सेल्ससारख्या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींसाठी या गोष्टी सर्वसाधारण असतात, असा त्यानं समज करून घेतला होता. त्यामुळे दुर्लक्ष केलं. मागील वर्षी एका पॅनिक अटॅकमुळे रुग्णालयात दाखल झाल्यानंतर यतीनला एन्झायटी असल्याचं निदर्शनास आलं. यतीनसारख्याच बऱ्याच जणांना मानसिक आजारांविषयी कल्पना नसते.

वातावरण महत्त्वाचं

जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, जिथे बॉस आणि इतर कर्मचारी खेळीमेळीच्या वातावरणात काम करतात तिथं ताण नसतो. तसंच एकमेकांच्या आरोग्याची काळजी घेतात असं वातावरण कामासाठी उत्तम असतं.

मानसिक आरोग्यही महत्त्वाचं

अनेक कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये कर्मचाऱ्यांचं मानसिक आरोग्य जपलं जावं यासाठी प्रयत्नशील असतात. चर्चा करा आणि व्यक्त व्हा, असं देखील सांगितलं जातं.

व्यक्त व्हायला शिका!

डॉ. संदीप गोविल सांगतात की, 'मानसिक आजारांबाबतीत असणारे गैरसमज सध्या दूर होताना दिसत आहेत. मानसिक आजारातून जाणारे लोक आता उघडपणे व्यक्त होताना दिसत आहेत. माझ्याकडे उपचार घेण्यासाठी येणाऱ्या दहा रुग्णांपैकी चार रुग्णांना कामाच्या ठिकाणी होणारं राजकारण आणि टार्गेट पूर्ण करण्याच्या दडपणामुळे टेन्शन येतं'. तणावमुक्त आयुष्य जगण्यासाठी सर्वप्रथम स्वतःच्या भावना मनात दाबून न ठेवता सहकारी आणि आप्तेष्ठांशी बोला. तणावमुक्त राहण्यासाठी कामाच्या ठिकाणी पूर्ण वेळ व्यग्र न राहता काही काळ विश्रांतीसाठी आणि स्वतःसाठी राखून ठेवला पाहिजे.

आवड जोपासा!

मानसोपचारतज्ज्ञ उर्वशी बिष्ट सांगतात की, 'सध्या ऑफिसमध्ये स्वतःच्या असणाऱ्या पदाविषयी नाखूष अथवा संभ्रमित असणाऱ्या व्यक्तींचं प्रमाण जास्त आहे. आपण करत असलेलं काम आपल्यासाठी योग्य नाही या विचारानं ते तणावात वावरतात. त्यामुळे मनोविकार जडण्याची शक्यता अधिक असते. अशा वेळी मी त्यांना कामापेक्षा स्वतःची आवड, मूल्य आणि मानसिक शांतता जपण्याचा सल्ला देते'.

आकडेवारी सांगते की...

० असोसिएट चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री ऑफ इंडिया यांच्या अहवालानुसार, कॉर्पोरेट क्षेत्रात काम करणारे ५६ टक्के कर्मचारी मानसिक तणावामुळे सहा तासांपेक्षा कमी झोप घेतात.

० जवळजवळ ४६ टक्के कर्मचारीवर्ग हा कोणत्या ना कोणत्या कारणास्तव तणावपूर्ण आयुष्य जगत असतो.

० जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार, मानसिक आरोग्यामुळे दरवर्षी ७० लाख कोटी रुपयांचं नुकसान होत असतं.

संकलन- तेजल निकाळजे, साठ्ये कॉलेज

Reply

Forward

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 2765

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>