Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 2765

ऊर्जा संतुलित करणारं मार्जार आसन

$
0
0

डॉ. सुरक्षित गोस्वामी, योगगुरू

मार्जार आसन हे नाव मांजरीवरुन देण्यात आलं आहे. हे आसन पाठीचा कणा लवचीक करतं. मान, खांदे आणि कंबरेच्या स्नांयूंचं आखडणं या आसनामुळे दूर होतं. कंबरेचं दुखणं, सायटिकाचं दुखर्ण, स्लिप डिस्क, पाठीच्या कण्यात आलेला बाक या गोष्टींमध्ये हे आसन लाभदायक आहे. पचनसंस्थेला बळ देणारं हे आसन आहे. या आसनामुळे रक्तवाहिन्या आणि मज्जातंतूचं कार्य सुरळीत चालतं. हे आसन तुम्हाला तणावमुक्त करतं आणि ऊर्जा वाढवतं. विशेष म्हणजे ध्यान करण्यापूर्वी हे आसन केल्यास त्याचा ध्यान करताना फायदा होऊ शकतो.

काय काळजी घ्याल? गुडघ्याचं दुखणं असेल तर हे आसन करू नये.

कसं कराल? गुडघ्यावर उभे राहा. हात खांद्याच्या रेषेत सरळ जमिनीवर ठेवा. गुडघ्यांमध्ये थोडं अंतर असेल तर पायाचे तळवे जोडलेले राहतील. मान सरळ ठेवून समोर बघा. श्वास सोडून डोकं खाली झुकवून कंबर थोडी वर उचला. या स्थितीत थोडा वेळ थांबून, पुन्हा श्वास घेऊन डोकं वर उचला. कंबर अधिकाधिक खाली जाऊ द्या. थोडा वेळ थांबा. नंतर श्वास सोडता सोडता डोकं खालच्या बाजूला आणा. कंबर वरच्या बाजूला उचला. श्वास घेता घेता डोकं वर आणि कंबर खाली आणि श्वास सोडताना डोकं खाली आणि कंबर वरच्या बाजूला घेऊन जा. साधारण आठ-दहा वेळा असं करा. हे आसन तुमच्या शरीरातल्या ऊर्जेचं संतुलन करते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 2765

Latest Images

Trending Articles

<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>