Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 2765

बाहेर जेवायला जाताना…

$
0
0

संकलन - कल्पेश वाणी,कॉलेज क्लब रिपोर्टर

सुट्टीच्या दिवशी बऱ्याचदा घरच्यांसोबत, मित्रांसोबत संध्याकाळी बाहेर फिरण्याचा, चित्रपट पाहण्याचा आणि डिनरचा प्लॅन केला जातो. त्यावेळी मजा-मस्तीच्या मूडमध्ये असल्याने आपण काय खातोय-पितोय याकडे दुर्लक्ष होतं आणि घरी आल्यावर त्याचे परिणाम दिसू लागतात. अशावेळी फिट व निरोगी राहण्यासाठी या टिप्स नक्कीच पाळा.

घरून बाहेर पडण्यापूर्वी हलकं-फुलकं काहीतरी खाऊन बाहेर पडा. याने तुम्हाला लगेच भूक नाही लागणार आणि हॉटेलमध्ये काहीवेळ ताटकळत बसावं लागलं तरी अडचण येणार नाही.

चित्रपटगृहातील समोसे किंवा इतर तळलेले पदार्थ, शीतपेयं घेणं टाळा. त्याऐवजी पाणी, चहा-कॉफी आणि त्यासोबत पॉपकॉर्न, चाट खाणं कधीही चांगलं.

हॉटेलमध्ये जेवण ऑर्डर करताना कमी तेल वापरलेले पदार्थ निवडा किंवा तुमच्या आवडीचं जेवण कमी तेल वापरून बनवण्यास सांगा. तसंच बटर, चीज, डिप फ्राइड पदार्थ खाण्याचं टाळा. आपल्याला लागेल तेवढंच ताटात वाढून घ्या. इतरांसोबत तुमची डिश शेअर करा आणि नवीन पदार्थ ऑर्डर करण्याआधी दुसऱ्याच्या डिशमधील पदार्थ एकदा चाखून पहा. एक छोटासा घासही कधीकधी तुमची तल्लफ भागवू शकतो.

जेवणसोबत तुम्ही काही पित असाल तर स्टार्टर घेणं टाळा. त्याऐवजी फ्रेश गाजर किंवा काकडी खाण्यास प्राधान्य द्या.

मेन कोर्स ऑर्डर करण्याआधी सलाड नक्की खा. कमी चरबी असलेलं सलाडही जिभेला तृप्त करू शकेल.

जेवणानंतर डेझर्टच्या नावाखाली खूप गोड खाणं टाळा. त्याऐवजी लो-कॅलरी आईस्क्रीम खा, नाहीतर दातांना व्यायाम देणारं एक आपलं मसाला पान हासुद्धा चांगला पर्याय आहेच.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 2765

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>