Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 2765

करून दाखवलं!

$
0
0

मुंबई टाइम्स टीम

एका महत्त्वपूर्ण भूमिकेसाठी कलाकाराला विचारणा होते. पण, त्यासाठी अट असते वजन कमी करण्याची. तेही थोडं थोडकं नव्हे, तर तब्बल १४ किलो. दिग्दर्शक त्याला घेऊन फिटनेस ट्रेनरकडे जातो. पण त्याचं वय, त्याची व्यग्रता लक्षात घेऊन इतक्या कमी दिवसांत हे शक्य नसल्याचं फिटनेस सांगतो. पण, त्यानंतर तो कलाकारही हट्टाला पेटतो. इतका, की 'वजन कमी होत नाही म्हणजे काय?' असं म्हणत त्या भूमिकेसाठी तो स्वतः जीव तोडून मेहनत घेत वजन कमी करून दाखवतो. या कलाकाराचं नाव आहे किशोर कदम.

किशोर कदम यांनी यापूर्वीही अनेकदा भूमिकेत स्वतःला झोकून देऊन काम केलं आहे. अतुल जगदाळे दिग्दर्शित 'गणवेश' या सिनेमात किशोर यांची वीटभट्टी कामगाराची भूमिका आहे. किशोर यांच्यासह या सिनेमात मुक्ता बर्वे, दिलीप प्रभावळकर, स्मिता तांबे यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. या सिनेमासाठी किशोर यांना वजन कमी करायचं होतं. याबाबत बोलताना सिनेमाचा दिग्दर्शक अतुल जगदाळे म्हणाला, 'मधल्या काळात किशोरचं वजन खूप वाढलं होतं. ही भूमिका वीटभट्टी कामगाराची होती. त्यांचं एकूण जगणं पाहता त्यांचं तसं 'दिसणं' भूमिकेला पोषक नव्हतं. म्हणून आम्ही एका नामांकित ट्रेनरकडे गेलो. ४५ दिवसांत १४ किलो वजन कमी करायचं होतं. किशोर यांचं वय, त्यांची एकूण व्यग्रता लक्षात घेऊन ट्रेनरने हे होऊ शकणार नाही असं सांगितलं. मग मात्र किशोर हट्टाला पेटले. पुण्याच्या एका ओळखीच्या डाएटिशिअनकडून त्यांनी टिप्स घेतल्या. त्यानंतर ५० दिवस त्यांनी तसा आहार घेतला.'

या काळात त्यांनी मांसाहार वगैरे पूर्णपणे वर्ज्य केला होता. शिवाय रोज सकाळी ठरलेला व्यायाम सुरू केला. ५० दिवसांत त्यांच्या प्रयत्नांना यश आलं आणि भूमिकेला हवी तशी शरीरयष्टी बनली, असं अतुल सांगतो. 'फिटनेस ट्रेनरने हे वजन इतक्या कमी वेळेत हे होणं अशक्य असल्याचं सांगितल्यावर किशोर यांना ती गोष्ट लागली. त्यांनी ते सकारात्मक पद्धतीने घेतलं आणि चिकाटीने हे शक्य करून दाखवलं', असं अतुलने सांगितलं.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 2765

Latest Images

Trending Articles

<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>