Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 2765

पहिल्यांदाच कळले HIV शरीरात पसरतो कसा!

$
0
0

मुंबई: मानवी शरीरात एचआयव्ही हा विषाणू कसा पसरतो याचा शोध लावण्यात शास्त्रज्ञांना यश आले आहे. आतापर्यंत या विषाणूचा अभ्यास टेस्ट ट्यूबद्वारे केला जात होता. मात्र, पहिल्यांदाच या वेळी त्रिमितीय (थ्री-डायमेन्शनल) टिश्श्यूसदृष्य वातावरणात त्याची तपासणी केली गेली. अशा प्रकारचे वातावरण मानवी शरीरात असते. या संशोधनामुळे मानवी शरीरात पेशींद्वारे एचआयव्ही हा विषाणू कशा प्रकारे पसरतो हे स्पष्ट झाले आहे.

३० वर्षे मिळाले नव्हते उत्तर

गेल्या ३० वर्षांपासून सुरू असलेल्या संशोधनादरम्यान या प्रश्नाचे उत्तर शास्त्रज्ञांना सापडले नव्हते. आतापर्यंत हा विषाणू मानवी शरीरात कसा पसरतो हे तपासण्यासाठी प्लास्टिक ट्यूब किंवा मग प्लेटचा वापर केला जात होता. या पद्धतीमध्ये मानवी पेशींमध्ये या विषाणूचा प्रवास कळू शकत नव्हता.

मानवी शरीरातील वातावरणात विषाणू पसरण्याच्या कारणाचा शोध लावण्यासाठी शास्त्रज्ञांनी इमेज प्रोसेसिंग, सैद्धांतिक जीवभौतिकशास्त्र आणि गणिततज्ञांची मदत घेतली. याद्वारे त्यांनी ३डी वातावरणात पेशी आणि विषाणूंच्या परस्पर व्यवहाराचा अभ्यास केली आणि ती प्रक्रिया कंम्प्युटरवर तयार केली. यात शरीरात हा विषाणू पसरण्याबाबत महत्त्वाची माहिती मिळाली.

असा पसरतो एचआयव्ही

शरीरात असलेल्या कोशिकांची कार्यप्रणाली एचआयव्ही या विषाणूला पसरण्यासाठी उद्युक्त करते असे या संशोधनात आढळले. पेशींच्या वाढीबाबतचे ३डी वातावरण पेशी नसलेल्या विषाणूद्वारे होणारे संक्रमण रोखण्याचे काम करते. परंतु, असे झाल्यानंतर हा विषाणू थेट पेशींशी संपर्क करत इतर पेशींमध्ये पसरतो.

या संशोधनामुळे एचआयव्ही विषाणूबाधितांवरील उपचाराबाबत वैद्यकीय क्षेत्रात बदल होऊन एचआयव्हीला रोखण्यात मदत होणार आहे, असा विश्वास शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 2765

Latest Images

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>