Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 2765

अॅसिडिटी टाळण्यासाठी...

$
0
0

पुणे टाइम्स टीम

खरं तर अॅसिडिटी हा आजार नाही. आपल्या जीवनशैलीमुळे निर्माण झालेला तात्पुरता शारीरिक बदल म्हणजे अॅसिडिटी. आपल्या भोजनामध्ये काही बदल केल्यास अॅसिडिटीचा त्रास टाळता येऊ शकतो. यासोबतच ताजा आणि आरोग्यदायी आहार घेतल्यास अॅसिडिटीवर सहज मात करता येते.

अॅसिडिटीची मुख्य लक्षणं

छातीमध्ये जळजळ आणि काही प्रमाणात वेदना.

तोंडात आंबट पाणी येणं.

अन्नाचं पचन योग्य प्रकारे न झाल्यामुळे जीव घाबरणं.

आंबट ढेकर येणं.

घशात जळजळ होणं.

अॅसिडिटी कशी टाळावी

आपल्या जेवणाच्या वेळा ठरवा.

वेळेच्या कमतरतेचं कारण देत आजकाल अनेक लोक न चावताच अन्न गिळतात. परिणामी पचनक्रिया योग्य प्रकारे होत नाही. अन्नाचे कण लाळेमध्ये योग्य प्रकारे मिसळण्यासाठी अन्न व्यवस्थितपणे चावून गिळणं गरजेचं आहे.

जेवढी भूक असेल त्यापेक्षा थोडं कमी अन्न खा.

तिखट, मसालेदार आणि जास्त तेल असलेले पदार्थ खाऊ नका.

भोजनानंतर लगेचच आराम करू नका. थोडा वेळ तरी इकडेतिकडे फिरा.

रोज किमान आठ ते दहा ग्लास पाणी प्या.

अॅसिडिटीची कारणं

तिखट आणि मसालेदार पदार्थ खाणाऱ्या तसंच अधिक प्रमाणात मद्यपान करणाऱ्या व्यक्तींना अॅसिडिटीचा सर्वाधिक त्रास होतो.

अधिक तेल आणि तुपाचे पदार्थ खाल्ल्यामुळे.

दुपारच्या जेवणानंतर झोपल्यामुळे.

अधिक काळपर्यंत तणावात राहिल्यामुळे आणि बराच वेळ भुकेलं राहिल्यामुळे.

अधिक प्रमाणात जंक फुडचे सेवन केल्यामुळे.

उपाय काय

आवळाः अॅसिडिटीवर आवळा गुणकारी आहे. अॅसिडिटीचा अधिक त्रास झाल्यास दोन चमचे आवळा पावडर आणि दोन चमचे साखर एकत्र करून ती पाण्यात मिसळून प्या.

दहीः आपल्या रोजच्या आहारात द‌ही आणि मठ्ठा असू द्या. दह्यात टाकून केलेली ताज्या काकडीची कोशिंबीरसुद्धा अॅसिडिटीवर परिणामकारक ठरते.

पाणीः दररोज भरपूर पाणी प्या. पाण्यामुळे केवळ पचनालाच मदत होते असं नाही, तर शरीरातील विषारी द्रव्यंसुद्धा बाहेर पडतात.

हिरव्या भाज्याः हिरव्या भाज्या आणि मोड आलेली कडधान्यं खा. यात व्हिटॅमिन बी आणि व्हिटॅमिन ई असतं. त्यामुळे अॅसिडिटी शरीराबाहेर काढण्यास मदत होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 2765

Latest Images

Trending Articles

<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>